अधिकारी म्हणत होते एकही जण हुतात्मा झाला नाही तर मग त्यांना स्वातंत्र्यसैनिक का म्हणायचे ?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक राजवटी या आपल्या देशात सामील होण्यासाठी तयार नव्हत्या. त्यात भारत स्वतंत्र होऊन १९५४ साली ७ वर्ष झाली होती. इंग्रज माघारी गेल्यानंतर फ्रांसने एका तहानुसार पॉंडिचेरी, कारिकल आणि चंद्रनगर हे भाग भारताच्या स्वाधीन केले होते.

पण इंग्रजी सत्तेनंतर आलेल्या पोर्तुगीजांनी मात्र भारतातच आपलं बस्तान बसवायचं ठरवलं होतं. भारत स्वतंत्र होऊनही पोर्तुगीज राजा सालाजार भारत सोडून जायला तयार नव्हता.

पोर्तुगीजांनी राजा राममोहन रॉय यांच्या नेतृत्वात चालू असलेल्या सत्याग्रह आंदोलनाला पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय देऊन टाकला. गोवा, दीव-दमण आणि दादरा नगर हवेली हे प्रदेश स्वतंत्र होण्याचं स्वप्न धोक्यात आलं होतं. भारताच्या काही धाडसी तरुणांनी पोर्तुगिजांचा हा कट उधळून लावण्याचा निर्णय घेतला होता. पण भारत सरकार यात सहभागी व्हायला तयार नव्हतं. तरुणांनी स्वतंत्र क्रांती करण्याचा निर्णय घेतला. 

महाराष्ट्र गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या दादरा नगर हवेली हा मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांती करण्याचे निश्चित करण्यात आले.

स्वातंत्र्यानंतरही दादर-नगरहवेली पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. १९५३-५४ मध्ये पुण्यातील काही तरुणांनी हा प्रदेश स्वबळावर मुक्त करून स्वतंत्र भारतात सामील करावा अशी योजना आखली होती. त्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील ५० ते ७५ तरुण एकत्रित झाले होते. त्यांना मिळेल ते हत्यार घेऊन लढण्यासाठी सांगितले होते.

१९५३ मध्ये ही तरुण मंडळी आरएसएसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन सुरतच्या मार्गाने सेल्वासाकडे गेले होते. या तरुणांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संगीतकार सुधीर फडके, क्रीडा प्रशासक राजाभाऊ वाकणकर, शब्दकोशाचे निर्माते विश्वनाथ नरवणे, नाना काजरेकर, श्रीकृष्ण भिडे प्रभाकर कुलकर्णी, बिंदू माधव जोशी , श्रीधर गुप्ते आणि अजून अशी २५-३० तरुण दिग्गजाची फौज होती.

पोर्तुगीज सरकारने भारतावर दादरा नगर हवेली प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला होता. यावर तोडगा म्हणून पंडित नेहरूंनी अभ्यासक आणि संशोधकांची एक समिती स्थापन केली होती. तरुण संशोधक म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष समावेश पंडित नेहरूंनी केला होता.

दादरा नगर हवेली मुक्ती लढा हा सशस्त्र क्रांती लढा जरी असला तरी बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून  प्रबोधन तरुणांना केलं होत. अहिंसेच्या काळात झालेलं हे पहिलं सशस्त्र क्रांती युद्ध होतं. यात बाबासाहेब पुरंदरेंसोबतच अनेक तरुणांनी जीवाची बाजी लावली होती. या क्रांतीत सहभागी झालेल्या युवकांनी कधीच प्रसिद्धीची हाव धरली नाही, या लढ्यात अनेक तरुणांनी यशस्वी झुंज दिली आणि लढा यशस्वी केला.

पुण्यातून गेलेले हे तरुण दादरा नगर हवेलीच्या स्वातंत्र्य संग्रामात ६-७ महिने कार्यरत राहिले.

या तरुणांनी अनेक अडचणी आणि संकटावर मात करून दादर-नगरहवेलीचा प्रदेश मुक्त केला. तो प्रदेश महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात देऊन पुण्यातून गेलेले आरएसएसचे स्वयंसेवक परत आले. त्यांचे ठीकठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.

आपल्या जीव धोक्यात घालून या तरुणांनी दादर-नगरहवेलीचा प्रदेश मुक्त केला होता. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने या सर्वांना स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान दिला नाही. अनेक वर्षानंतर काही जणांनी ही गोष्ट तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री राम नाईक यांच्या लक्षात आणून दिली होती.

मग राम नाईक यांनी दादर-नगरहवेली मुक्त करणाऱ्यांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून सन्मान करावा असा प्रस्ताव त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे मांडला. दादर-नगरहवेली मुक्तिसंग्रामात सहभाग घेणाऱ्याना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देण्यास अधिकारयांचा विरोध होता.

त्यानंतर राम नाईक यांनी गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून  त्यांच्या विरोधाचे कारण विचारले.

अधिकारयानी दिलेले उत्तर ऐकून राम नाईक थक्क झाले. सेल्वासा जिंकणाऱ्या तरुणांपैकी एकही जण हुतात्मा झाला नाही. मग त्यांना स्वातंत्र्यसैनिक कसे म्हणायचे. असा सवाल उपस्थितीत केला होता. राम नाईकांनी गृह विभागाची ही भूमिका लालकृष्ण आडवाणी यांना सांगितली.

लालकृष्ण आडवाणी यांनी राम नाईक यांची भूमिका ऐकून घेत दादर नगरहवेली मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या पुण्यातील तरुणांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देण्याचे ठरविले. दादर-नगरहवेली सर्व वीर हे अधिकृत स्वातंत्र्य सैनिक झाले.

या स्वातंत्र्यसैनिकांचा योग्य सन्मान करण्याच्या निर्णय घेण्यात आला. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे तत्कालीन उपपंतप्रधान तथा गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार व सन्मान सोहळा घेण्यात आला होता.

तारुण्यात देशासाठी स्वीकारलेल्या धोक्याचा योग्य सन्मान करण्यासाठी ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी जावा लागला. राम नाईकांनी केलेले प्रयत्नामुळे दादर-नगरहवेली मुक्ती संग्रामात सहभागी होणाऱ्या तरुणांचा योग्य सन्मान झाला. अधिकाऱ्यांनी मध्ये आढकाठी करण्याचा प्रयत्न केला होता.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.