कोल्हापूरच्या “ब्लॉगवाल्या आजींच्या” गोष्टी ६.५ लाख लोक वाचतात.

रिटायर्ड माणसाचं आयुष्य आणि त्याने वेळ कसा घालवायचा यावर आता आपल्या देशात लोखो रुपये खर्च करून वर्कशॉप वैगेरे होतात. एकदा का वय झालं कि मग म्हाताऱ्या आईबापानी तीर्थयात्रा कराव्यात, किंवा एखाद विरंगुळा केंद्रात जाव, नाहीच तर मग उगाच हसण्यासाठी म्हणून लाफिंग क्लब वैगेरे जॉईन करावा असा, सरास समज आपल्याकडे आहे.

पण आईबापाचं वय झालं कि मुलाने काठी व्हावं अस म्हणतात. त्या काठी होण्याचा अर्थ आपल्या प्रत्येकाच्या हिशोबाने वेगळा असतो. मग कोण त्यासाठी पैसा पुरवत किंवा कोणी सुख सुविधा ज्याला जमेल तस आणि भागेल तेवढ.

पण काही मुल मात्र भन्नाट कल्पना लढवतात, ते आपल्या आई बापाला सुकलेल पान न समजता आपल्या वयस्कर  आईबापाची ओळख आपल्या सो कॉल्ड तरुण पिढीच्या जगण्याशी करून देतात.

कोल्हापूरच्या ब्लॉग वाल्या चिवटे आजी याचेच एक उदाहरण. प्रदेशातील मुलाने आपल्या आईशी बोलता याव म्हणून आईला वेबकॅम, लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन घेऊन दिल आणि एका आजीबाईंचा टेक्नोलॉजी सोबतचा प्रवास सुरु झाला आणि त्या आता एक प्रसिद्ध ब्लॉगर झाल्यात.

मुळच्या कोल्हापूरच्या असणऱ्या वसुधा श्रीकांत चिवटे. वयाच्या ७६ वर्षी फक्त दहावी पास शिक्षण झाले असताना त्यांची बोट कीबोर्डवर असतात. त्यांचा मुलगा परदेशात असतो, आपल्या आईशी बोलता याव म्हणून त्याने वसुधा आजींना लॅपटॉप शिकवला. आपल हे काम नाही आणि आता या वयात हे शिकून काय करू असाच सूर तेव्हा आजींचा होता. पण मग शेवटी त्यांनी प्रयत्न करायला सुरवात केली आणि त्यांना लॅपटॉप वापरण्यात इंटरेस्ट यायला लागला, आणि त्या उत्सहाने मुलाकडून शिकून घेऊ लागल्या.  

सुरवातीला त्याने आपल्या आईला इमेल कसा वापरायचा हे शिकवलं. या ईमेलचा वापर करून त्या आपल्या मुलाशी बोलू लागल्या, त्यामुळे त्यांना अधिकच इंटरेस्ट आला. हळू हळू त्या इंग्रजी टायपिंग शिकल्या. त्यांना मग कॉम्प्युटरची माहिती असणरी काही पुस्तक त्यांच्या मुलाने आणून दिली. त्यात वाचून त्या कॉम्प्यूटर कसे वापरायचे, काय काय करता येते हे शिकू लागल्या.

इमेल, टायपिंग, व्हिडिओ कॉलिंग, गुगलचा वापर त्या अगदी सहज करू लागल्या. गुगल ट्रान्सलेटर वापरून त्या लेखन करायला लागल्या. तिथून पुढे लेखन हाच त्यांचा छंद झाला. लोकांची आयुष्य, पाककला, रांगोळी, अशा कितीरी विषयांवर त्या लिहू लागल्या. त्याच आवडीतून त्यांनी मराठी टायपिंग देखील शिकून घेतलं आणि लिखाण हाच त्यांच्या रोजच्या दिवसाचा महत्वाचा भाग झाला.

काहीच दिवसात या आजीबाईंचा मुलगा पुष्कर भारतात आला. त्याने आपल्या आईचं सगळ लिखाण वाचल. हे वाचून त्यानेच वसुधा आजींना ब्लॉग काढून दिला, आणि हे सगळ लिखाण त्यांना ब्लॉगवर पोस्ट करायचं शिकवलं. चिवटे आजींनी या ब्लॉगला “वसुधालय” असे नाव दिले आणि २०१० साली या ब्लॉगर आजींच्या ऑफिशियली ब्लॉगर म्हणून प्रवासाची सुरवात झाली.

आज त्यांचा ब्लॉग प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. त्यांचे तब्बल ६.५ लाख वाचक आहेत.

नुकतेच त्यांना कोल्हापूरच्या गृहिणी गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या ब्लॉगची एक खासियत म्हणजे त्या प्रत्येक ब्लॉगची सुरवात “ॐ” अशीच करतात. अत्यंत सोपी भाषा आणि साधे विषय यामुळे त्यांचा वाचक वर्ग देखील मोठा आहे. या त्यांच्या जिद्दीचा आणि आपल म्हातारपण तारुण्यात घालवण्याच्या पद्धतीची आता सगळेच स्तुती करता आहेत.

हे ही वाचा भिडू.