UP च्या भिडूला ५ वेळा कोरोनाच वॅक्सीन दिलंय तरी सहाव्यांदा घ्या म्हणून मॅसेज आलाय.

देशात कोरोना वॅक्सीन एक अत्यावश्यक गोष्ट झाली आहे. अत्यावश्यक म्हणण्यापेक्षा जीवनावश्यक म्हंटल तर वावगं ठरू नये. त्यात आणि लसींचा तुडवडा भासू नये म्हणून सरकार आणि औषध निर्मात्या कंपन्या लसींच उत्पादन वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. पण तरी लसींचा तुडवडा भासतोयच.

मग पर्यायाने लोकांच व्हॅक्सिनेशन रखडतंय. पण युपीच्या एका भिडूला ५ वेळा कोरोनाच वॅक्सीन दिलंय. आणि सहाव्यांदा घ्या म्हणून मॅसेज आलाय. म्हणजे इथं एकदा वॅक्सीन मिळता मुश्किल, यांना सहादा वॅक्सीन मिळालंय. कस ?

नक्की प्रकार काय आहे समजून घेऊया. 

उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील तालुका सरधना इथं एक अजब प्रकार घडलाय. इथं राहणाऱ्या ७३ वर्षीय चौधरी रामपाल सिंह यांना कागदपत्रांमध्येच पाच वेळा लसीकरण करण्यात आलं आहे. आता तुम्ही म्हणाल कसं ?

तर रामपाल यांनी १६ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला आणि दुसरा ८ मे २०२१ रोजी. त्यानंतर आरोग्य केंद्रात जाऊन लस घेतल्यानंतर त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्रही देण्यात आले. पण नंतर जेव्हा त्यांनी त्यांचे प्रमाणपत्र ऑनलाईन काढले, तेव्हा त्यांना आणखी दोन लसीकरण झाल्याची  प्रमाणपत्रे मिळाली. तिसऱ्या प्रमाणपत्रात फक्त एक डोस देण्यात आला आहे. आणि पुढील डोससाठी डिसेंबर २०२१ ची तारीख देण्यात आली आहे.

प्रत्यक्षात रामपालने यांनी फक्त दोनच डोस घेतले आहेत. आणि ते पण मार्च ते मे दरम्यान. दुसऱ्या पूर्ण लसीकरण प्रमाणपत्रात लसीकरणाची तारीख १५ मे आणि १५ सप्टेंबर अशी लिहिली आहे. आता हे झालं, पण रामपाल सिंग यांच्या प्रमाणपत्रात थोड्या विचित्र गोष्टी दिसल्या.

प्रमाणपत्रावर वॅक्सीन दिलेल्या नर्सचं नाव असत. रामपाल यांच्या प्रत्येक प्रमाणपत्रावर एकाच नर्सचं नाव आहे.

एका सर्टिफिकेटवर वयवर्ष ७३ तर दुसऱ्या प्रमाणपत्रावर ६० वयाचा उल्लेख आहे. 

पहिल्या सर्टिफिकेटवर ओळखपत्र म्हणून आधारकार्ड तर दुसऱ्या सर्टिफिकेटवर पॅन कार्डचा उल्लेख आहे.

यावर सहावेळा लसीकरण झालेला व्यक्ती काहीच बोलला नाही का ?

तर रामपाल आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराबद्दल बोलले. त्यांनी आरोपही केले. त्यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत म्हण्टलंय की, त्यांना त्यांचे कोविड व्हॅक्सिनेशनच सर्टिफिकेट ऑनलाईन मिळवायचे होते, तेव्हा ते मिळाले नाही. यानंतर त्यांनी सरधनाचे आरोग्य विभाग कार्यालय गाठले आणि आपल्या समस्येबद्दल सांगितले. आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी मात्र त्यांना दादच दिली नाही. १०० दा फेऱ्या लावून पार्ट हा भोंगळ कारभार केल्याचा आरोप त्यांनी केलाय.

यावर मेडिकल ऑफिसर्सनी आपली बाजू मांडली. मुख्य शल्यचिकित्सक डॉ.अखिलेश मोहन म्हणतात, आज पहिल्यांदाच असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं. असं वाटतंय कोणी तरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने पोर्टलशी छेडछाड केली असावी. किंवा पोर्टल हॅक करून हा प्रकार केला असावा.

आता डॉक्टर साहेब म्हणतायत म्हणून ठीक आहे. नाहीतर सोशल मीडियात लोक म्हणत होते, मोदींच्या बड्डेनिमित्त संख्या दाबून वाढवण्यासाठी हा प्रकार होतोय. बाकी आणि असं पोर्टल वैगरे हॅक करणं ते पण रामपाल सिंगसाठी. कशाला कोणी करेल असला कारभार. लोकांना काय तेवढाच रिकामा वेळ आहे का ? 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.