अरारारारा खतरनाक !! वयाच्या ९६ व्या वर्षी हे आजोबा ‘बाप’ बनले आहेत.

मुल व्हावं म्हणून कोण कोण नवस करत असतेत, कोण कुठल्या देवाचा आशीर्वाद घेतेत, कुठल्यातर बुवा गुरुजीचा फळ खातेत पण देव सगळ्यानाच प्रसन्न होतो असे नाही. पण हरयाणातल्या रमजीत राघव नावाच्या आजोबांवर देव वयाचं ९४ वं वर्ष गाठल्यावर प्रसन्न झालाय . आज १०३ वर्ष वय असलेले हे आजोबा दोन मुलांचे बाप आहेत.

होय तुम्ही ऐकले ते खरे आहे .

रमजीत यांचा जन्म १९१६ सालचा. त्यांचं पहिल लग्न वयाच्या चोविसाव्या वर्षी झाल होत पण ते लवकरच मोडलं.  त्यानंतर डायरेक्ट वयाच्या ८७ व्या वर्षी म्हणजे २००३ साली त्यांनी सध्याची पत्नी शकुंतलादेवी बरोबर लग्न केले. शकुंतला अत्यंत गरीब होती तिला घरदार नव्हते आसरा नव्हता. रमजीतनी तिला जागा घरात जागा दिली आणि तिच्याशी लग्न केले.

शकुंतला तेव्हा बावन्न वर्षांची होती. लग्न झाले गरिबीत संसार सुरु झाला. आजोबा रामजीत शेतात कामाला जायचे. आजोबा प्रचंड रोमांटिक आहेत ते बायकोची खूप काळजी घेत. सकाळी चुलीवर पाणी तापवण्यापासून ते भाजी चिरून देण्यापर्यंत घरकामात तिला मदत करत.

परिसरात आजोबा रमजीत आणि त्याचा संसार हा चेष्टेचा विषय बनला होता. लोक या वयात हे म्हातारं  लग्न करून काय करणार आहे  असे म्हणत आणि खिदळत. पण आजोबा पण प्रचंड आशावादी होते त्यांचे मन तरुण होते. सचिन तेंडूलकर त्याच्या टीकाकारांना तोंडानी उत्तर देत नाही कामगिरीतून देतो तसच काहीसं आजोबांनी ठरवलं आणि एकदिवस असा आला की कुचेष्टा करणार्यांना हसावे की रडावे कळेना.

२०१० साली वयाच्या ९४ व्या वर्षी चमत्कार घडला, आजोबा रमजीत बाप झाले. संसाराच्या झाडाला गोड फळ लागले. त्याच नाव ठेवलं विक्रमजीत. खरोखरच विक्रम म्हटला पाहिजे कारण त्यावेळी त्याबाळाच्या आईचंही वय ५९ वर्ष होते. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर दोन वर्षांनी त्यांना अजून एक मुलगा झाला. रमजीत बाबांचं वय होतं ९६.

 ज्या वयात लोकं आपल्या परतीच्या प्रवासाची वाट बघत असतात त्या वयात रामजीत यांनी हा महापराक्रम करून दाखवला होता. त्यांच्या या पराक्रमाची चर्चा गावभर झाली. रामजीत अचानक सेलिब्रिटी झाले.  स्थानिक वृत्तपत्रांनी तर ही बातमी छापलीच पण मोठमोठ्या न्यूजचनलनी ही या आजोबा कम सुपरडॅडच्या मुलाखती घेतल्या.

४५-५५ वजनी गटातला देह घेऊन हे आजोबा टीवी चॅनेल्सना एखादी मोहीम गाजवलेल्या सेनापती सारखे अत्यंत आत्मविश्वासात मुलाखती देऊ लागले. जगातील सर्वात वयस्कर पिता झाले असा दावा केला गेला. त्यांच्या दिनक्रमा पासून ते त्यांच्या आहारापर्यंत ते काय करतात याची उत्सुकता सगळ्यांना असणे सहाजिक होते. तर मिडियाने विचारले,

“आजोबा तुमच्या ताकदीच राज काय आहे ?”

तर आजोबा रामजीत यांनी आपल्या फैझल खान attitude मध्ये सांगितले,

“मी पैलवान होतो. पैलवान असताना रोज तीन किलो दुध प्यायचो, केळी खायचो, दिवसाला अर्धा किलो बदाम आणि अर्धा किलो तूप ही झोकायचो. त्यानंतर भरपूर व्यायाम करायचो. एवढं करून शेतात ही दिवसभर घाम गळायचो त्यामुळे माझे शरीर कसदार बनले. “

आजोबा राघव यांच्या मते पैलवान असताना त्यांचा काळ त्यांनी गाजवला आहे. भिडूनो काही गोष्टींवर विश्वास बसने कठीण असते पण म्हणून तथ्याना डावलून चालत नाही.

एका खोडसाळ पत्रकाराने आजोबाना त्यांच्या सेक्स लाईफ बद्दल विचारले. आजोबा ही बोल्ड आहेत त्यांनी ही न कचरता सर्व गोष्टी सांगितल्या. तुमच्या स्टॅमिना चा राज काय आहे असे विचारल्यावर आजोबांनी तोंडाचा चंबू करत सांगितले.

“मी जन्मापासून शाकाहारी आहे मी फळभाज्या खाण्यावर भर देतो, कड धन्य ही आवडीने खातो.त्यामुळेच या वयात ही माझं स्टॅमिना आणि उत्साह चांगला आहे. मी आजही दिवसातून चारवेळा संभोग करतो. “

मी जर ठरवलं तर रात्रभर स्ट्राईक टिकवू शकतो असं आजोबांनी सांगताच पत्रकारच काय तर तरुण ही क्लीन बोल्ड झाले.

“मी रोज सकाळी सहा वाजता उठतो. घरातील कामे उरकून मी मग शेतात जातो. आठवड्याला मला ८०० ते १०० रुपय मिळतात. मी बायकोला आणि मुलांना ही बरोबर घेऊन जातो. मला त्यांच्याशी बोलायला खूप आवडते. मी मुलांना आवरतो त्यांना अंघोळ घालणे कपडे बदलणे हि सर्व कामे मी आनंदाने करतो. बायको कामात असताना मुलांना घेऊन बसतो.”

आज ते १०३ वर्षांचे आहेत सोनीपत जिल्ह्यातील खरखौदा या त्यांच्या गावी ते राहतात. नोव्हेंबर २०१२ साली आजोबा रामजीत यांना PETA People For Ethical Treatment Of Animals या अमेरिकन संघटनेने त्यांचा जागतिक अ‍ॅम्बेसेडर बनवले होते.

तुम्ही म्हणाल प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेने यांना का अ‍ॅम्बेसेडर केले तर विषय असा आहे की रामजीत हे आयुष्भर शाकाहारी राहिले तरीही इतकी वर्ष ते जगले शिवाय इतका उत्साह की ९४ व्या वर्षी बाप झाले हि गोष्ट PETA ला अधोरेखित करायची होती. उद्या मॅनफोर्स किंवा तत्सम कोंडमच्या जाहिरातीत आजोबा रमजीत दिसले तर आश्चर्य वाटू देऊ नका.

तर भिडू लोक आयुष्य मोठं असतंय शिस्तीत घ्या.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.