२०३२ चे स्वप्न तुटले मात्र मोदी २०३६ जिंकायची तयारी करत आहेत..

२३ जुलै पासून टोकियो येथील ऑलम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी २०३२ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

भारत सुद्धा २०३२ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यास इच्छुक होता. मात्र ही संधी हुकली असून २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिकचे यजमानपद अहमदाबादला मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्नशील आहेत.

यासाठी अहमदाबाद शहरात जोरदार तयारी करण्यात येत आहे. करोडो रुपये खर्च करून खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

अहमदाबाद कशा प्रकारे तयारी सुरु आहे, ऑलम्पिकचे आयोजन करायचे असल्यास काय करावे लागते , आयोजनाचे फायदे काय आहेत याचा बोल भिडूने घेतलेला हा आढाव.

ऑलम्पिकचे यजमानपद कस मिळते

ऑलम्पिकचे आयोजन करण्यासाठी शहराची निवड आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक कमिटी करत असते. दर दोन वर्षांनी जगभरातील मोठे शहर यासाठी नावनोंदणी करत असतात. साधारण ७ वर्षापूर्वी ऑलम्पिक खेळासाठी शहराची निवड करण्यात येते. यावेळी शहर निवडतांना अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवण्यात येते.

त्यात मैदान परिसरात खेळाडू आणि पर्यटकांसाठी सुविधा, खेळाडू, पत्रकारांसाठी राहण्याच्या जागा, सक्षम सार्वजनिक वाहतूक, चांगली मैदाने, सरावाच्या जागी सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे उपलब्ध करून देऊ शकतात अशा शहराला ऑलम्पिकचे यजमानपद ऑलम्पिक कमिटी देते.   

भारतातील ऑलम्पिकसाठी अहमदाबादची निवड का?

ऑलम्पिक आयोजनासाठी लहान-मोठ्या मैदानांची गरज असते. तसेच जगभरातून येणाऱ्या खेळाडूंना राहण्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यावा लागतात. त्याअनुषंगाने अहमदाबाद मध्ये ऑलम्पिकचे आयोजनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

स्पोर्ट फॅसिलिटी, ट्रेनिंग फॅसिलिटी आणि नॉन स्पोर्ट फॅसिलिटीची तयारी अहमदाबाद येथे सुरु करण्यात आली आहे. अहमदाबाद मधील नारायणपुरा येथे ६०० कोटी खर्च करून स्पोर्टस कॉम्प्लेक्स तयार करण्यात येत आहे.

तसेच सरदार पटेल कॉम्प्लेक्स मध्ये स्पोर्ट विलेज तयार करण्यात येत आहे. तेथे २ ते ४ बीचके flat  असणाऱ्या ३ हजार अपार्टमेंट तयार करण्यात येत आहे. येथे १२ हजार पेक्षा जास्त खेळाडू राहण्याची सोय करण्यात येत आहे. तर याच कॉम्प्लेक्स मध्ये हॉटेल, दुकाने सुद्धा असणार आहे.

२०३६ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिकची घोषणा २०२६ मध्ये होणार आहे. आता त्यासाठी केवळ ५ वर्ष शिल्लक राहिले आहेत. नुकतेच अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडीयम तयार करण्यात आले आहे.

याबाबत  भारतीय ऑलम्पिक संघाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी २०३६ मधील ऑलम्पिक अहमदाबाद येथे घेण्यासाठी भारत इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्या अनुषंगाने अहमदाबाद शहरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

तसेच ऑलम्पिकचे उद्घाटन आणि समारोप करण्यासाठी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल खेळ परिसर सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे.

आयोजनासाठी किती खर्च येतो

ऑलम्पिक आयोजनासाठी साधारण २ लाख कोटी खर्च येतो. टीकियो ऑलम्पिक ७.३ अरब डॉलर खर्च अपेक्षित होता. मात्र आता पर्यंत २५ अरब डॉलर खर्च झाल्याचा मिडिया रिपोर्ट आहे. तसेच २०१६ मध्ये झालेल्या रिओ ऑलम्पिकसाठी २० अरब डॉलर खर्च आला होता.

एकाच शहरासाठी ऑलम्पिक आयोजनासाठी  एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत असल्याने सरकारवर टीका सुद्धा करण्यात येते.

ऑलम्पिकचे आयोजनाचे फायदे

ऑलम्पिक आयोजनामुळे त्या देशात खेळाच्या पायाभूत सुविधा उभ्या राहतात. त्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते.

तसेच मुख्य फायदा मध्ये म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा फायदा होत असल्याचे इतिहासातील उदाहरणावरून पाहायला मिळते. २०१२ मध्ये लंडन मध्ये झालेल्या ऑलम्पिक नंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला बुस्टर मिळाला होता. तसेच  २०१६ मध्ये झालेल्या ब्राझील येथे झालेल्या ऑलम्पिक नंतर शहराचे चेहरामोहरा बदलला होता.

भारतात आता पर्यंत एकदाही ऑलम्पिकचे आयोजन केले नाही. १९५१ आणि १९८२ मध्ये आशियाई खेळांचे तर २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन केले आहे. हे तीनही स्पर्धा दिल्ली येथेच झाल्या आहेत. त्यामुळे अहमदाबादला ऑलम्पिकचे आयोजनचा मान मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते.

हे ही वाच भिडू 

खरंच अदानींनी मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवलं आहे का?

दोघेही महान खेळाडू होते पण कॅप्टन आणि कोच म्हणून त्यांचं जमलं नाही

भारताला पहिलं ऑलम्पिक मेडल जिंकवून देणारा पुढे जाऊन हॉलिवूडचा फिल्मस्टार बनला

Leave A Reply

Your email address will not be published.