दोस्ताने वाचवलं नसतं तर तेव्हाच नसिरुद्दीन शहांचा चाकूहल्ल्यात जीव गेला असता…

नसिरुद्दीन शहा हे बॉलिवूडमधले सगळ्यात मोठे अभिनेते मानले जातात. आजवर बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त वेगवेगळे रोल करण्याचा बहुमान त्यांना मिळतो. पण नसिरुद्दीन शहा यांच्या आयुष्यात घडलेला एक अत्यंत हिंसक अपघात बऱ्याच लोकांना माहिती नसेल. जवळच्याच मित्राने नसिरुद्दीन शहांवर यांच्यावर चाकू हल्ला केला होता. तेव्हा जर ओम पुरींनी नसिरुद्दीन शहांचा जीव वाचवला नसता तर आज बॉलिवूड एका मोठ्या अभिनेत्याला मुकलं असतं.

१९७७ चं साल होतं. नासिरुद्दीन शहा यांनी आपल्या आत्मचरित्रात अँड देन वन डे ; या मेमोयर मध्ये आपल्या जीवनातल्या एका महत्वाच्या घटनेबद्दल लिहून ठेवलेलं आहे. श्याम बेनेगल यांच्या भूमिका या सिनेमाची शूटिंग सुरु होती. सिनेमाच्या सेटपासून जवळच एक ढाबा होता आणि त्या ढाब्यावर नसिरुद्दीन शहा जेवण करत होते. त्याचवेळी नसिरुद्दीन शहा यांच्यासोबत जेवण करत असलेल्या मित्राने बघितलं कि एनएसडी आणि एफटीआयआय मध्ये त्यांच्यासोबत शिकणारा त्यांचा मित्र जसपाल येत आहे. 

जसपाल हा नसिरुद्दीन शहांचा एक चांगला मित्र होता. पण जसपाल समोर न बसता शहांच्या पाठीमागे जाऊन बसला. शहा आपल्या आत्मचरित्रात लिहितात कि जसपाल हा कितीही चांगला मित्र असला तरी तो माझ्या यशावर जळत होता. नसिरुद्दीन शहा यांचं लक्ष नसताना जसपालने चाकूने शहांवर हल्ला केला. नसिरुद्दीन शहा खाली कोसळले. जसपाल पुन्हा एकदा शहांवर हल्ला करणार होता पण तेवढ्यात धाब्यावर जेवण करणारा शहांचा मित्र त्या मित्रावर तुटून पडला.

नसिरुद्दीन शहांचा जीव वाचवणारा तो मित्र होता ओम पुरी. नसिरुद्दीन शहा आणि ओम पुरी यांची चांगली मित्र होती. एनएसडीमध्ये दोघे एकत्र शिकायला होते. चार वर्षे अभिनयाचा अभ्यास दोघांनी केला होता. यानंतर दोघे एफटीआयआय पुण्यामध्ये सुद्धा एकत्रच शिकले. जेव्हा नसिरुद्दीन शहांवर हल्ला झाला तेव्हा ओम पुरी तिथेच जेवण करत होते. ओम पुरींनी जसपालला थांबवण्याची भरपूर पराकाष्ठा केली.

जसपालला रोखून धरणे ओम पुरींना जड जा थोटे मात्र त्यांनी मित्राच्या मदतीसाठी जसपालला पळून जाऊ दिले नाही. एवढ्या गडबडीत ढाब्याचा मालक चिडला आणि तो जखमी नसिरुद्दीन शहांना हॉस्पिटलमध्ये जाऊ देण्यास नकार देऊ लागला. जोवर पोलीस येत नाही तोवर इथून कुणी हलायचं नाही असा सज्जड दम त्याने दिला. नसिरुद्दीन जखमी अवस्थेत विव्हळत होते. एका बाजूला ओम पुरींनी जसपालला रोखून ठेवलेलं होतं, आणि ओम पुरी नसिरुद्दीन शहांना किचनमध्ये जाऊन जखमेवर काहीतरी इलाज करायला सांगत होते. 

पण ढाब्यावाला काय ऐकायला तयार नव्हता. नसिरुद्दीन शहांनी या घटनेचं वर्णन करताना लिहिलेलं आहे कि रक्ताने त्यांचा शर्ट पूर्ण भरला होता. हळूहळू रक्त वाहत होतं आणि तितक्यात पोलीस आले पण ते तिथं विचारपूस करण्यात मग्न झाले. ओम पुरी यांना हे दृश्य बघवेना म्हणून त्यांनी जसपालला पोलिसांच्या ताब्यात दिल आणि नसिरुद्दीन शहांना पोलिसांच्या गाडीत टाकून हॉस्पिटलला नेलं.

ओम पुरींमुळे नसिरुद्दीन शहांचा जीव वाचला होता यावरून ओम पुरी आणि नसिरुद्दिन शहा यांची दोस्ती काय लेव्हलची असेल याची कल्पना येते. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.