लस आणि अँटीबॉडी जरी फेल झाली तरी ओमिक्रोनवर नवीन तोडगा मिळालाय

जवळपास २ वर्षांपूर्वी कोरोनाने चीनमधून एन्ट्री मारली. हळू- हळू हा व्हायरस अख्ख्या जगात पसरला. ज्याने आतापर्यंत करोडो लोकांचा जीव घेतलाय. या महामारीवर तोडगा काढण्यासाठी जगभरातले अनेक संशोधक कित्येक दिवस रिसर्च करत होते. अखेर या प्रयत्नांना यश आलं आणि  वेगवगळ्या देशांना लसी विकसित झाल्या.

पण या दरम्यान कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट समोर येत होते, ज्यामुळे संक्रमणाच्या भीतीचे सावट डोक्यावर होत. पण आतापर्यंतच्या या व्हेरियंटवर लसींनी आपला परिणाम दाखवला, त्यात अँटीबॉडीवर सुद्धा काम गेले. त्यामुळे संक्रमितांच्या आकड्यात मोठया प्रमाणात घट झाली.

दरम्यान, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंट असणाऱ्या ओमिक्रोनने एन्ट्री केलीये. ज्याने सगळ्या देशभरात पुन्हा दहशत निर्माण केलीये. दाक्षित आफ्रिकेत याचा पहिला रुग्ण सापडला होता, मात्र आता अनेक देशात या नवा व्हेरियंट जाऊन पोहोचलाय.

पण टेन्शनची गोष्ट म्हणजे लस घेतलेल्या लोकांना देखील हा नवा व्हायरस आपल्या जाळ्यात ओढतोय. काही दिवसांपूर्वीच युकेमध्ये या व्हेरियंटमुळे एकाचा  जीव गेला. त्यात कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांमध्ये हा ओमिक्रॉन व्हेरियंट वेगाने पसरतोय. यासोबतच  म्युटेशनच्या ३० प्रकरणांची सुद्धा नोंद झालीये. आणि धक्कादायक म्हणजे असं समोर आलंय कि ना लस, ना अँटीबॉडी या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर परिणामकारक ठरतायेत.

दरम्यान, या भीतीच्या वातावरणात आता अमेरिकेच्या एका अहवालाने पॉझिटिव्ह बातमी आणलीये. या अहवालानुसार शरीराच्या प्रतिकारशक्तीमध्ये आढळणारा टी-सेल प्रकार कोरोनाच्या या ओमिक्रॉन व्हेरियंटचा मुकाबला करण्यात सक्षम आहे. याचा फायदा कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना होणार आहे.

आता हे टी सेल काय असतात तर, टी-सेल हे आपल्या रक्तामध्ये आढळणाऱ्या पांढऱ्या पेशींसारखे असतात जे रोगाशी लढण्यासाठी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या टी-सेल संक्रमित पेशी नष्ट करण्यासाठी आणि अँटीबॉडीस तयार करण्यासाठी प्रोटीन रिलीज करण्यात मदत करतात. त्यामुळेचं कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरियंटवर सुद्धा या टी- सेल आपला प्रभाव टाकत असं या अभ्यासातून समोर आलंय.

यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अँड इंफेक्शियस डिसीज आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने हा अभ्यास केलाय. जो bioRxiv नावाच्या पोर्टलवर पब्लिश करण्यात आला होता. दरम्यान या अभ्यासाचा संपूर्ण आढावा घेणे अजून बाकी आहे.

या अभ्यासात एप्रिल-मे २०२० मध्ये कोरोना संसर्गातून बरे झालेल्या ३० लोकांचे ब्लड सॅम्पल घेतले गेलेत. त्यातल्या डेटानुसार, सध्याचा SARS-CoV-2 CD8+ T-सेल सगळता प्रकरणांमध्ये ओमिक्रोन ओळखण्यास सक्षम आहेत. CD8+ T-सेल अशा सेल्स आहेत ज्या संक्रमित पेशी मारण्याचे काम करतात.

या अभ्यासात लसीकरण झालेल्या लोकांना समाविष्ट केलेले नाही, फक्त कोरोना संसर्गातून बरे झालेल्या सॅम्पलवर टी-सेलचा प्रतिसाद तपासण्यात आलाय. मात्र अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे कि, ज्यांना आधी कोरोनाची लागण झालेली नाही पण त्यांनी लस घेतली आहे. अश्या लोकांमध्ये सुद्धा टी-सेल प्रतिसाद देऊ शकतात.

आता या अभ्यासाचा जेव्हा संपूर्ण आढावा घेतला जाईल, तेव्हा निकाल समोर येईल. पण सध्या तरी अमेरिकेच्या या अहवालाने लोकांमधली थोडी भीती कमी केलीये, असं म्हणता येईल.

हे ही वाच भिडू :

English Summary:

Corona entered China about 2 years ago. Gradually, the virus spread throughout the world. Which has claimed the lives of millions of people so far. Researchers from around the world have been working for days to find a solution to this epidemic. Eventually, these efforts were successful and vaccines were developed in different countries.

WebTitle : Omicron Update : Although vaccines and antibodies have failed, a new solution has been found on Omicron

 

Leave A Reply

Your email address will not be published.