भिडू ! ओमायक्रॉन झालाय कि व्हायरल झालंय ओळखायचं कसं ?
आमचं गण्या आज लै भेदरलं हुतं… कारण काय तर म्हणे ओमायक्रॉन झालाय.
साधी टेस्ट करायला न्हाई गडी आणि म्हणतुय ओमायक्रॉन झालाय. असा कुणाला बी होत नसतोय असं म्हणणं न्हाई माझं, पण ओमायक्रॉन झाला तर ते तपासायला काहीतरी शास्त्रमार्ग असतंय. तर बघूया काय असतोय त्यो शास्त्रमार्ग.
तर शास्त्रज्ञ SARS-CoV-2 RT-PCR या टेस्टनेच ओमायक्रॉन या नव्या कोविड-19 व्हेरियंटची पडताळणी करत आहेत. मग यात हे पाहिले जातय की लस देऊन रुग्ण बरा होऊ शकतो की नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवून तो बरा होऊ शकतो ? हा व्हेरियंट खूप वेगाने पसरू शकतो का ? या सगळ्या दरम्यान, तुम्हाला ओमिक्रॉनमधल्या हरवलेल्या S जीनबद्दल माहीत नसेल. कारण हाच नवा फॅक्टर आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने आपल्या एका अहवालात म्हटलय की,
S जीन ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंट मध्ये दिसत नाही. म्हणजे याआधीच्या कोरोनाच्या व्हेरियंट मध्ये तो दिसला होता. SARS-CoV-2 साठी डब्ल्यूएचओचा एक तांत्रिक सल्लागार गट आहे. TAG-VE यांनी हा अहवाल देताना सांगितलं की RT-PCR मध्ये तीनपैकी एक जीन्स गायब आहे.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, नोव्हेंबर २०१९ मध्ये, दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी खाजगी लॅब Raquel Viana यांनी कोरोनाव्हायरसच्या ८ नमुन्यांमधून जीन्सचे अनुक्रम काढले.
पुढं या जीन्सचं सॅम्पल टेस्टिंग लॅन्सेट लॅब मध्ये करण्यात आलं. तोपर्यंत या कोरोनाच्या जीन्स मध्ये मोठ्या प्रमाणात म्यूटेशन झालं होतं. हा वायरस स्पाईक प्रोटिनच्या रुपात ह्युमन बॉडीमध्ये एन्ट्री करतो. आणि त्याच्या या रुपामुळे त्याला ह्यूमन सेल मध्ये लगेच एन्ट्री मिळते.
ज्यावेळी आफ्रिकेत हा रिसर्च सुरु होता तेव्हाच PCR Lab ने काही महत्वपूर्ण माहिती बाहेर काढली. त्यावेळी त्यांना कोरोनाच्या एका म्युटेशन मध्ये S जीन सापडलाच नाही. आता हा जीन सापडला म्हणून टेस्ट निगेटिव्ह आल्या का ? तर नाही बाकीच्या जीन्स मध्ये कोविडची नवी लक्षण दिसतच होतीत.
PCR टेस्ट प्रत्येक प्रकारच्या कोविडच्या व्हेरियंटला पकडू शकतो.
ही टेस्ट हे सांगू शकत नाही की हा कोणत्या प्रकारचा म्युटेशन सॅम्पल आहे. पण एवढं आहे की हा कोरोना आहे हे त्यावरून कळत. ही टेस्ट बेसिकली जिनोम सिक्वेन्सिंग करते. जर यात S जिनोम आढळला नाही तर तो ओमीक्रोन पेशंट आहे हे समजतं.
ThermoFisher Scientific या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार,
ओमायक्रॉन व्हेरियंट मध्येच आत्ता पर्यंत ६० ते ७० प्रकारच्या जिनोमचं म्युटेशन झालं आहे. या सगळ्या म्युटेशन मध्येच तो S जिनोम गायब झाला आहे. बाकी कोरोनाच जसं आहे अगदी तसंच आहे.
या ओमायक्रॉन लक्षणं काय असतात ?
तर COVID-19 च्या लक्षणांमध्ये हलका ताप, घसा खवखवणे किंवा दुखणे, नाक वाहणे, खोकला-शिंका येणे, अंगदुखी आणि रात्री जास्त घाम येणे, विशेषत: ओमायक्रॉन प्रकरणांमध्ये यांचा समावेश होतो. काही संक्रमित व्यक्तींमध्ये त्वचेवर पुरळ उठण्याची समस्या देखील नोंदवली गेली आहे.
सध्या थंडीचा सिजन सुरू आहे. थंडीच्या सिजनमध्ये सामान्य सर्दीचे प्रमाणही वाढते. त्यामुळे कोरोनाची काही लक्षण जसं की सर्दी सिजनल फ्लूसारखी असू शकते. पण सिजनल फ्लू आणि कोरोना मधला फरक ओळखणं महत्वाचं आहे.
सर्दी आणि घसा खवखवणे ही लक्षणे नेहमीच कोरोनाची नसतात. या कोविड -१९ आणि सामान्य सर्दीची काही लक्षणे सारखी असू शकतात. म्हणून या दोघांमधील फरक समजून घेणे फार महत्वाचं आहे.
थंडीच्या फ्लू मध्ये काय लक्षणं असतात ?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हंगामी फ्लूमुळे ताप किंवा थंडी वाजून येणे, खोकला, धाप लागणे, थकवा येणे, घसा खवखवणे, नाक बंद होणे, स्नायू किंवा शरीरात दुखणे होऊ शकते. कोविड-19 आणि सीझनल फ्लू या दोन्ही आजारांची प्रकरणे या मोसमात दिसून येत असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
साधा फ्लू आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये फरक काय?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोविड-19 आणि साधा फ्लू यात सहज फरक ओळखणे कठीण असते. काही लक्षणे दोन्हींमध्ये भिन्न असतात. कोविडची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे म्हणजे सतत खोकला, हाय टेम्प्रेचर आणि चव आणि वास कमी होणे.
सिजनल फ्लूमध्ये ही लक्षणं तीव्रतेनं दिसत नाहीत. ओमायक्रॉन झालेल्या रुग्णाला सध्या चव किंवा वास येत नाही अशी कोणतीही समस्या नाही. सर्दी तापाची लक्षण दोन ते चार दिवस टिकून राहिल्यास ओमायक्रॉनची शक्यता नाकारता येत नाही.
ओमायक्रॉन भारतासह जगातल्या सगळ्याच देशांमध्ये वाढायला लागलाय. वाढत्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी बहुतांश देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केलीय. भारतात झपाट्याने वाढणारा हा धोका लक्षात घेऊन आरोग्य तज्ज्ञांकडून सर्व लोकांना त्यापासून विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
काळजी काय घ्याल ?
बेसिक काळजी म्हणजे लोकांनी कोरोनाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हाताची स्वच्छता या नियमांचे पालन करावे. महाराष्ट्रात जेवढ्या RT-PCR लॅब्स आहेत त्यांना निर्देश देण्यात आले की, S-gene ड्रॉप डिटेक्शन किट वापरुन ओमायक्रॉनची टेस्ट करा. मग आता तुम्हाला समजलं असेलच की, RT-PCR करूनच ओमायक्रॉन नावाच्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची टेस्ट करायची.
हे ही वाच भिडू
- कोरोनापायी लोकं बेरोजगार झालीत, तिकडं भावानं रिलीफ फंडातून लॅम्बोर्गिनी घेतली
- कोरोनाशी लढायला पहिली गोळी आलिये
- दिल्लीत लॉकडाऊन लागलंय, पण कोरोनामुळं नाही
English Summary:
Swabs from polymerase chain reaction (PCR) tests, which are sent to labs for analysis, can show if the variant causing the infection looks like Omicron, Delta or something else.
Between a third and a half of UK labs – but not all – have the required technology to detect suspected Omicron cases. That means some parts of the country may identify more Omicron cases more quickly.