ओमिक्रॉनमुळे पुन्हा लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे का ?

कसंबसं आपण कोरोनातून बाहेर पडत होतो, केसेसही कमी होत होत्या. रोजची रुग्णसंख्या कमी होत चालली होती..आता कोरोना जवळपास संपुष्टात आलाच असं वाटतंच होतं कि, एका नव्या व्हेरियंटने जगभरातल्या देशांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.  

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरातले शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. याच सगळ्या गोंधळात ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. हा व्हेरिएंट कोणत्याही प्रमुख सिंड्रोमच्या सौम्य आजाराचं कारण ठरत असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी सांगितलंय.  

त्यामुळे अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहेत.  अमेरिका, युरोप, कॅनडा, इजराईल, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रवासावर बंदी घातली आहे.

लक्षणे काय आहेत ?

दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष एंजेलीक कोएट्जी यांनी सांगितल्यानुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सौम्य आजार होण्याची शक्यता असल्याचं सांगितलंय. तसेच या व्हेरिएंटची सौम्य लक्षणं दिसत आहे. 

ती लक्षणे म्हणजे, स्नायू दुखणे, थकवा जाणवणे, अथवा दोन दिवस आजारी राहण्यासारखी लक्षणं दिसत आहेत. आतापर्यंत या व्हेरिएंटमुळे वास न येणं यासारखी समस्या कुणामध्येही जाणवली नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये थोड्याफार प्रमाणात कफ होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉनने संक्रमित झालेले रुग्ण घरातच उपचार घेत आहेत असंही सांगण्यात आलं आहे. 

पण भारत आणि महाराष्ट्र काय करतोय ?? 

ओमिक्रॉन व्हेरियंट भारतात पसरू नये म्हणून केंद्राने प्रत्येक राज्यांना सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या सचिवांना पत्रांद्वारे ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्याबद्दलच्या सूचना केल्या आहेत.

त्या सूचना पुढीलप्रमाणे –
त्या-त्या राज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवावी आणि त्यांना वेळोवेळी या 
ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत सूचना करण्यात यावी.  या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी मागील काही कालावधीत केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती, तपशील त्यांच्याकडून घेण्यात यावी.  तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या  संसर्गाची जोखीम असलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात यावी आणि त्याचे नमुने  तत्पर INSACOG लॅबमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात यावे, अश्या काही महत्वाच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.

केंद्राकडून सूचना मिळाल्यानंतर तातडीने सगळी राज्ये कामाला लागली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील तातडीची बैठक बोलवत ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासन आणि आरोग्य विभागाला दिल्या आहे.

त्या सूचना पुढीलप्रमाणे –

  • मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या महत्वाच्या शहरात आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावले जातील.
  • १३ देशातून आलेल्या प्रवाशांना आता क्वारंटाईन अनिवार्य करण्यात येणार आहे.
  • तसेच या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली जाणार आहे.
  • दर आठ दिवसानंतर त्यांची आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात येणार आहे.
  • तसेच देशाअंतर्गतविमान प्रवास करणाऱ्याना देखील ४८ तासांच्या आतील निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक असणार आहे.
  •  तसेच या सर्व पार्श्वभूमीवर जुनकीय बदलाचे निरीक्षण करणाऱ्या लॅब वाढवण्याच्या सूचना देखील या बैठकीत करण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

याच बाबतीत, शनिवारी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि सर्व  जिल्हाधिकारी आणि टास्क फोर्स यांची बैठक झाली होती. या बैठकीत ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत सर्वविस्तर माहिती दिली होती. 

सगळ्या धास्तीत या व्हेरिएंट किती घातक आहे? गंभीर रुग्ण किती आहेत? याची लक्षणं आणखी काय असू शकतात? या व्हेरिएंटवर लसीकरणाचा परीणाम होऊ शकतो का? आरटीपीसीआरच्या चाचण्यांमधून या व्हेरिएंटचं निदान होऊ शकते का? हे पडताळून पाहण्याचं काम सुरु आहे, या सर्व गोष्टींवर जागतिक आरोग्य संघटना अभ्यास करत आहे. असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे सांगितलं. या व्हेरिएंटचा संसर्गदर अतिशय जास्त असल्यामुळे राज्य आवश्यक ती काळजी घेत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सागितलं आहे.

पण WHO च्या मते, व्हेरिएंटवर केलेल्या निरीक्षणातून आणि पुराव्यातून असं समोर आलेय की, जे लोकं आधीच कोरोनाबाधित आहेत, ते पुन्हा ओमिक्रॉन व्हेरिएंटनं संक्रमित होऊ शकतात. हा व्हेरिएंटच्या संसर्गाची गती डेल्टापेक्षाही जास्त आहे त्यामुळे पुन्हा संक्रमाणाची भीती व्यक्त केली जातेय….

आणि जरी भारत देशात आणि त्यातल्या त्यात राज्यात कदाचित तिसरी लाट आली तर त्याची तयारी म्हणून बेड, मेडिसिन, ऑक्सिजनची तयारी करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यानी केल्या आहेत. त्यामुळे याच ओमिक्रॉनचे संक्रमण होऊ नये, जरी आपल्याकडे याचा एकही रुग्ण सापडला नसला तरीही काळजीचा एक भाग म्हणून देशात आणि राज्यात पुन्हा लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. या याबाबतीत राज्य आणि केंद्र काय भूमिका घेते ते लवकरच स्पष्ट होईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.