बॉक्सिंग डेच्या दिवशी रिकी पॉंटिंगला एका स्पेलमध्ये इशांत शर्माने घाम फोडला होता…..

इशांत शर्मा भारतीय संघात येण्यापूर्वी हा तो काळ होता जेव्हा बोटावर मोजता येतील इतकेच फास्टर बॉलर भारताकडे होते. बॅट्समन आणि स्पिन बॉलिंग यामध्येच बरेच लोकं गुंतलेले होते. कारण फास्टर बॉलर म्हणल्यावर दुखापती आल्या,संघातून बाहेर बसणं आलं आणि स्वतःला तितकं मेंटेन ठेवण आलं. पण इशांत शर्मा हा काय साधासुधा गडी नव्हता.

नाईट वॉचमन म्हणून तो भारतीय संघात फेवरेट होता पण त्याहीपेक्षा तो स्लेजिंगचा बादशहा होता. ऑस्ट्रेलिया सारख्या संघाला तो डीवचायचा इतकंच काय तर ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिंगला त्याने घाम फोडला होता. तर इशांत शर्माबद्दल आज जाणून घेऊया.

२ सप्टेंबर १९८८ रोजी दिल्लीमध्ये इशांत शर्माचा जन्म झाला. इशांत जेव्हा क्रिकेटकडे वळला तेव्हा इतर खेळाडू एकतर बॅट्समन बनत होते तर काही स्पिनर बनत होते. पण इशांत शर्माला लहानपणापासूनच फास्टर बॉलर बनायचं होतं. त्याच्या बॉलिंगमध्ये एक धारदारपणा आणि जबरदस्त स्पीड होता त्यामुळे कोच वैगरे मंडळी त्याच्यावर कायम खुश असायचे. उंची जास्त असल्याने त्यांच्या बॉलिंगमध्ये भेदकपणा आणि बाऊन्स होता.

शाळेत आणि ज्युनिअर लेव्हलवरचा ब्लॉकबस्टर गेम इशांतला अंडर १९ च्या संघात घेऊन गेला. अंडर १९ च्या संघातून इशांतने २००६ साली इंग्लंडचा दौरा केला. पाकिस्तानविरुद्ध जेव्हा २००७ साली अंडर १९ ची मॅच इशांत खेळला तेव्हा पाकिस्तानमध्ये सुद्धा त्याचे बरेच लोकं चाहते झाले होते.
अंडर १९ संघाकडून ६ वनडे आणि २ टेस्ट खेळण्याची संधी इशांतला मिळाली होती.

वयाच्या केवळ १८ व्या वर्षी इशांत शर्मा साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात निवडला गेला पण खेळण्याची संधी इशांतला मिळाली नाही. पुढे २००७ मध्ये मुनाफ पटेलच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून इशांत शर्माला बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात संधी मिळाली. इशांत शर्माच्या अगोदर भारतीय संघात फक्त असे मोजकेच फास्ट बॉलर होते ज्यांनी शंभर पेक्षा जास्त विकेट मिळवलेल्या होत्या त्यात कपिल देव,जवागल श्रीनाथ आणि झहीर खान सामील होते.

पण इशांत शर्माने आपल्या बॉलिंगच्या जोरावर या दिग्गज लोकांमध्ये आपली जागा निर्माण केली. सुरवातीच्या काही मॅचमध्ये इशांतला चांगली कामगिरी करता आणि नाही मात्र पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट पटकावून इशांत शर्माने पुनरागमन केलं.

यानंतर इशांतला संधी मिळाली ऑस्ट्रेलिया टूरसाठी. पहिल्या मॅचमध्ये त्याला संधी मिळाली नाही पण दुसऱ्या मॅचमध्ये झहीर खानच्या जागी त्याला संघात निवडण्यात आलं. या मॅचमध्ये त्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही. पण तरीही त्याला तिसऱ्या टेस्टसाठी जागा मिळाली.

ही ती मॅच होती त्यामुळे इशांत शर्मा जगभरात ओळखला जाऊ लागला. तिसऱ्या टेस्टमध्ये इशांत शर्मा विरुद्ध रिकी पॉंटिंग ही जुगलबंदी पाहायला मिळाली. खरंतर यात इशांतचं वजन जास्त होतं, कारण त्याने पॉंटिंगला टाकलेला स्पेल ऑस्ट्रेलिया आणि खुद्द पॉंटिंगची झोप उडवणारा होता.

जगभर तेच फक्त याच स्पेलची चर्चा होती पण शेवटी इशांतने पॉंटिंगला बाद केलंच होतं. पॉंटिंगची विकेट मिळाल्याने भारताचा विजय झाला होता.

यानंतर इशांत शर्माची गाडी सुसाट धावत सुटली. सीबी सिरीजमध्ये सुद्धा इशांतने जबरदस्त बॉलिंग केली होती. जस जसा काळ बदलत गेला तस तसा इशांत शर्माचा खेळ सुरेख होत गेला. महेंद्रसिंग धोनीचा तो लाडका फास्टर बॉलर होता. इशांत शर्माचे लांब केस असलेली स्टाईल सुद्धा गाजली होती. स्लेजिंग मध्येसुद्धा इशांत मागे नव्हता. स्टीव्हन स्मिथला केलेला वाकडा चेहरा हा जगभरात मीम मटेरियल म्हणून फिरत होता. आज घडीला इशांत शर्मा भारताच्या महत्वाच्या बॉलर्स पैकी एक आहे आणि अजून तो खेळतोच आहे.

भारतीय संघात टोपणनाव लंबू असल्याने इशांत कधी चिडायचा नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये आजवर त्याच्या ३११ विकेट्स आहेत तर वनडेमध्ये ११५ विकेट्स त्याने मिळवल्या आहेत. वनडेमध्ये आता सध्या तो दिसत नाही पण टेस्टमध्ये त्याचा जलवा कायम आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.