कधीकाळी भारताच्या मिलटरी अकादमीत प्रशिक्षण घेतलेला आज तालिबानचा प्रमुख कमांडर आहे

तालिबानी संघटनांनी अफगाणिस्तानवर केलेला कब्जा हि आजवरची मोठी घटना मानली गेली.  मागच्या काही दिवसांपासून आपण या घटना बघतच आहोत. या घटनेमुळे भारताचे अफगाणिस्थान संबंध आणि समीकरण यावर जोरदार चर्चा सुरु झाल्या. अशीच एक घटना आहे ज्यात तालिबानी कमांडर भारतात मिलिटरी प्रशिक्षणासाठी आला होता, कोण होता तो तालिबानी कमांडर आणि त्याचा भारतातला प्रवास जाणून घेऊया.

शेर मोहम्‍मद अब्‍बास तनिकजाई तालिबानच्या प्रमुख ७ म्होरक्यांपैकी एक आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार,

शेर मोहम्मद हा १९८२ साली उत्तराखंडची राजधानी डेहराडून मधल्या इंडियन मिलिटरी अकादमी [IMA] मधून पासआऊट झाला होता. शेर मोहम्मदला त्याचे मित्रमंडळी शेरू म्हणून ओळखायचे. एक नवीन कॅडेट म्हणून शेर मोहम्मद २० वर्षाचा असताना आयएमएमध्ये पोहचला होता.

त्याच्या मित्रांच्या मते शेर हा कधीच कट्टर तालिबानी नव्हता. शेर मोहम्मद पॉलिटिकल सायन्सच्या शिक्षणानंतर आयएमएमध्ये आला होता. इथे त्याने दीड वर्षे ट्रेनिंग घेऊन लेफ्टिनंट अफगाण आर्मीमध्ये भरती झाला. रिपोर्ट्सनुसार तेव्हा भारतीय मिलिट्रीने अफगाणी लोकांना ट्रेनिंग द्यायला सुरवात केली होती. मात्र शेर मोहम्मद या घडीला तालिबानच्या पॉलिटिकल ऑफिसचा प्रमुख आहे.

एक रिटायर्ड मेजर जनरल यांचा शेर मोहम्मद हा आवडता होता. ते सांगतात कि शेर मोहमद हा इतरांपेक्षा उंच होता आणि तो मिशी ठेवायचा. त्यावेळी त्याच्या विचारात कधीही कट्टरता नव्हती. त्याच्या अजून एका कोर्समेटच्या मतानुसार तो कधीच कट्टर नव्हता उलट विकेंडच्या वेळी तो सगळ्यांसोबत ट्रेकिंगला आणि नदीवर जात असे.

रिटायर्ड कर्नल केसर सिंह शेखावत यांच्या मतानुसार एका फोटोग्राफमध्ये तेव्हा ते सगळे ऋषिकेशला गेले होते आणि तिथून दर्शन घेतल्यावरचे फोटो आणि त्यात त्यांची पूर्ण बॅच होती. आयएमएमधून ट्रेनिंग पूर्ण करून शेर मोहम्मद हा अफगाण आर्मीत भरती झाला. त्याने सोव्हिएत-अफगाण युद्ध आणि इस्लामिक लिबरेशन ऑफ अफगाणिस्थान वॉरमध्ये सहभाग घेतला होता.

तालिबानच्या पहिल्या शासनाच्या काळात शेर मोहमद हा विदेशी मंत्रालयात डेप्युटी मिनिस्टरच्या पदावर होता. बिल क्लिंटन ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा शेर मोहमद हा तालिबानच्या वतीने संवाद साधण्यासाठी अमेरिकेला जात असे.

२०१५ साली कतारमध्ये तालिबानी संघटनेचे पोलिटिकल ऑफिस प्रमुख म्हणून शेर मोहम्मद यांनी जबाबदारी पार पाडली होती. आज घडीला या बातमीची चर्चा जोरात होत आहे. यावर बऱ्याच लोकांनी टीका सुद्धा केली आहे. एकेकाळी विद्यार्थी दशेत असलेला शेर मोहम्मद भारतात आला आणि पुढे तो वेगळ्या वळणाला लागून कट्टर तालिबानी बनला हि घटनाच मोठी धक्कादायक आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.