बाळासाहेब ठाकरेंनी शरद जोशींना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती

शरद जोशी.

आजही देशातील शेतकरी संघटनेत आदराने घेतले जाणारे नाव. कधीकाळी ‘सगळे पक्ष चोर’ म्हणणारे शरद जोशींना सक्रिय राजकारणात यावे लागले होते. ८० च्या दशकात राजकारणविरहितता हे शेतकरी संघटनेचे मोठे आकर्षण होते. मात्र यात हळूहळू फरक पडत गेला. तसेच आजूबाजूची परिस्थिती बदलत होती. त्यामुळे त्यांना राजकारणापासून जास्त काळ दूर राहता आले नाही. आणि ते शेतकऱ्यांना ते शक्य नव्हते.

शेतकरी हा ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, पतसंस्था, बाजार समित्या, साखर कारखाने इथल्या  निवडणुकांशी  जोडलेला असतोच. 

त्यामुळे शेतकरी निवडणुकांसापासून फार काळ अलिप्त राहू शकत नव्हता. तसेच शेतकरी हिताचे निर्णय अंतिम निर्णय हे केंद्र सरकार घेतं त्यामुळे शरद जोशी यांच्या राजकारणाकडे जवळ कल वाढत गेला. तसेच शरद जोशींनी अगोदर एखादी अराजकीय संघटना काढता येईल का याची चाचपणी सुद्धा केली होती. 

त्यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन अनेक नेत्यांच्या बैठका सुद्धा घेतल्या होत्या. त्यावेळी मधू लिमये यांनी शरद जोशींना सांगितले होते की, चळवळ ही कायम स्वरूपात चळवळ म्हणून किंवा आंदोलन म्हणून टिकत नाही. केव्हा ना केव्हा तिला राजकीय स्वरूप द्यावेच लागेल.

या सगळ्यात २२ नोव्हेंबर १९८४ ला पुण्यात झालेल्या शेतकरी संगटनेची एक बैठक झाली आणि राजकारणप्रवेशावर शिक्कामोर्बत झाली.

मात्र त्याच वर्षी इंदिरा गांधी यांच्या हत्या करण्यात आली आणि काँग्रेसला मोठा जनाधार मिळाला होता. जर काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले तर शेतकऱ्यांच्या विरोधात मोठे निर्णय घेण्यात येतील अशी भीती त्यांना वाटत होती. तसा प्रचारही त्यांनी सुरु केला होता. काँग्रेस विरोधातील पक्षांना पाठिंबा सुद्धा दिला होता. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलट काँग्रेस प्रचंड प्रमाणात यश मिळाले आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले.

त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेस (आय)च्या विरोधात  शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पुरोगामी लोकशाही दलाला पाठिंबा दिला होता. आणि पुलोदच्या समर्थनार्थ राज्यभर प्रचार सुद्धा केला. पुढे शरद पवार काँग्रेस मध्ये गेले त्यामुळे शरद जोशी पवारांपासून लांब गेले.

पुढे शेतकरी संघटनेने  शिवसेनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला.

चाकण जवळील आंबेठाण येथे शरद जोशी राहत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना त्यांनी शरद जोशी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपल्याला शेतकरी आंदोलनाबाबत आदर असल्याचे सांगितले. होते.

एकदा शरद जोशी आंबेठाण आंदोलनाला बसले होते. त्यावेळी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी शरद जोशी यांची भेट घेतली होती. त्यानंतर  दिवसानंतर बाळासाहेब ठाकरे आणि शरद जोशी यांची मातोश्रीवर भेट झाली होती. बाळासाहेब काँग्रेसला नेहमी ढवळे बगळे म्हणत. ते फक्त फक्त दोघांनाच भितात तुम्हाला आणि आम्हाला.  

तुम्ही गावं सांभाळा, आम्ही शहर सांभाळतो. आपण मिळून निवडणूक जिंकू असं बाळासाहेब ठाकरे जोशींना म्हणाले होते आणि शरद जोशींना त्यांनी मुख्यमंत्री बनवायचीही ‘ऑफर’ दिली होती.

मात्र पुढे शिवसेनेने शेतकरी संघटनेला मुंबईतील त्यांचे विरोधक समजले जाणारे कामगार नेते दत्ता सामंत यांच्याशी संबंध ठेवायची नाही अशी अट घातली. त्याच बरोबरशेतकरी संघटनेने दर्यापूर येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला नाही म्हणून या दोन्ही पक्षाचे फाटले. त्यामुळे शरद जोशी आणि बाळासाहेब ठाकरे लांब गेले. 

यानंतर शरद जोशी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक घटक म्हणून भाजपशी जुळवून घेतले.

पुढे जोशी राज्यसभेचे सदस्यही बनले होते. भाजप बरोबर शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. स्वतः शरद जोशी निवडणुकीत कधीच निवडून आले नाही. पण संघटनेच्या तिकिटावर मोरेश्वर टेमुर्डे, वामनराव चटप, वसंतराव बोन्डे, शिवराज तोंडचिरकर, सरोजताई काशीकर हे निवडून आले होते.  टेमुर्डे तर पुढे विधानसभेचे उपसभापती सुद्धा झाले. त्यांचे इतर सहकारी मात्र इतर पक्षात गेले.   

संदर्भ-अंगारवाटा… शोध शरद जोशींचा, लेखक भानू काळे   

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.