दिग्विजय सिंहांमुळे एकदा नरेंद्र मोदींचा ताफा अडवलेला..

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबला गेले होते, निमीत्त पंजाबच्या विधानसभा निवडणुकांचं. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पंजाब आपल्या गोटात आणायचा म्हंटल्यावर पंतप्रधानांंना तिथं सभा घेणं गरजेचं होतं.

तर  ठरलेल्या टाईमटेबल नुसार पंतप्रधान पंजाबला गेले. विमानतळावर उतरल्यानंतर आपल्या वाहनाने  पुढचा प्रवास करणारं होते. 

आता पंतप्रधान येणार म्हंटल्यावर ट्रॅफिकची आधीच सेटिंग लावायला  लागती. पण नेमकं पंतप्रधानांना ट्रॅफिक लागलं. काही आंदोलकांंनी ते ट्रॅफिक अडवून धरलं आणि पुढचं सगळं प्लानिंग फिसकटलं. मग काय वातावरण पेटायला टाइम थोडीना लागतो. 

भाजप  समर्थकांनी पंतप्रधानांशी वागण्याचे  नियम कायदे सगळे समजून सांगत, पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा उचलून धरला. 

असो… पण तसं पाहिलं तर नरेंद्र मोदी यांना ट्रॅफिक मध्ये अडवून धरण्याची ही काही पाहिली वेळ नाही.  याआधी काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांच्यामुळं नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवला गेला होता. 

 दिग्विजय सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातला वाद काही नवा नाही. 

तर किस्सा आहे 1998 मधला,  विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदींना मध्य प्रदेश भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.  मोदी रायपूरहून भोपाळला परतले आणि विमानतळावरून भाजप कार्यालयाकडे निघाले होते.  दोन कारमध्ये काही पत्रकार सुद्धा त्यांच्यासोबत होते. पण वाटेत हमीदिया हॉस्पिटलजवळ  चौकात मोदींची गाडी थांबवली गेली.

जरी नरेंद्र मोदी त्यावेळी पंतप्रधान जरी नसले तरी भाजपचे बडे नेते होतेचं. पण तरीही त्यांचा ताफा अडवण्यात आला. कारण मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा ताफा तिथूनचं जाणार होता.  मोदी तेथे पोहोचताच पोलिसांनी चौकाचौकात वाहतूक बंद केली होती. 

मोदींच्या कार ड्रायव्हरने पोलीस अधिकाऱ्याना जाब विचारायला सुरुवात केली, पण पोलीस अधिकारी अजिबात डगमगले  नाही.

त्यानंतर गाडीत बसलेल्या भाजप कार्यकर्त्याने नरेंद्र मोदी हे स्वतः गाडीत असल्याचं सांगितल. पण याचाही काही परिणाम झाला नाही. मग ड्रायव्हरनं थोड्या धमकीच्या आवाजात सुनावलं की, ‘काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे.  त्यानंतर भाजपचे सरकार येईल, फिर देख भाई सबका हिला बराबर होगा.’

एवढं सगळं होऊनसुद्धा  पोलीस अधिकारी जैसे थे… आणि मग काय सांगून सांगून थकलेले ड्रायव्हर आणि कार्यकर्ते गुपचूप आपल्या गाडीत जाऊन बसले. दिग्विजय यांचा ताफा जाईपर्यंत मोदींना तिथचं थांबाव लागलं. तेव्हा या घटनेची कल्पनाही कदाचित दिग्विजय यांना नसावी.

पण काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा मोदींच्या रिपोर्ट कार्डला पहिल्यांदाच लाल चिन्ह मिळाले.  दिग्विजय यांच्या पॉलिटिकल मॅनेजमेंट समोर मोदींचा प्रत्येक डाव फसला आणि सलग दुसऱ्यांदा दिग्विजय सिंह मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.

 

मोदींच्या कारकिर्दीतील हे पहिले अपयश होते.  यापूर्वी ते गुजरात आणि हिमाचल प्रदेशचे राज्य प्रभारी होते आणि दोन्ही राज्यात भाजपचे सरकार स्थापन झालेले. आता नशीब प्रत्येक वेळी साथ देते अशातला भाग नाही. पण आपल्या इथं कधी कधी एक पराभव बाकीच्या विजयांवर पडदा टाकतो. आणि असचं मोदींना सुद्धा फेस करावं लागलं.

 तसं या पराभवाला भाजपचे अनेक ज्येष्ठ नेतेही तितकेचं जबाबदार आहेत.

कारण निवडणूकीच्या वेळी जेव्हा मोदी राज्य प्रभारी म्हणून भोपाळला आले होते, तेव्हा ते राज्यात।सुंदरलाल पटवा आणि कृष्णमुरारी मोघे यांच्यासारख्या नेत्यांचा बोलबाला असायचा. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे सरकार स्थापन होईल असा विश्वास स्थानिक नेत्यांना वाटत होता, पण प्रश्न होता श्रेयवादाचा, या नेत्यांना बाहेरच्या कुणाला भाव खाऊ द्यायचा नव्हता.  यामुळे त्यांनी मोदींवर जवळपास बहिष्कार टाकल्याचं म्हणतात.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.