अमेरिका रशियाच्या राड्यात पेप्सी कंपनी जगातली सहावी मोठी नेव्ही झाली होती
आता आपण अनेक मल्टिनॅशनल कंपन्या रेव्हेनुमुळे अनेक देशांच्या GDP च्या पुढे गेल्याचं आपण बघतोयच. एवढंच काय भांडवलाच्या जीवावर या कंपन्या आज देशाची धोरण देखील बदलवतात मात्र हद्द तेव्हा झाली जेव्हा एका कंपनीने स्वतःची आर्मीचा उभारली
१९५९ च्या उन्हाळ्यात अमेरिकेच्या राजधानीत म्हणजेच न्यूयॉर्कमध्ये रशियाने सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याच्या हेतूने एक प्रदर्शन आयोजित केले होते. त्यानंतर अमेरिकेने सेम तसेच एक प्रदर्शन मॉस्को येथील सोकोलन्की पार्क मध्ये भरवले. खरं तयार ते प्रदर्शन भरवून अमेरिकेला आपलं एखाद प्रॉडक्ट तिथं खपतंय का ते बघायचं होत.
त्या प्रदर्शनात अमेरिकने सांस्कृतिक गोष्टी सोडा आपली उत्पादनच स्टॉलवर लावली.
यात गाड्या, कला, फॅशन, डिस्ने, डिक्सी कप इंक, आयबीएम यांसारख्या गोष्टी होत्या. आता त्यात एका अमेरिकन स्टायलच्या घराचं मॉडेल पण ठेवण्यात आलं होत. यात अमेरिकेला असं दाखवायचं होत की, बघा आमची लाइफस्टाइल कसली भारी आहे. कारण आमच्याकडे भांडवलशाही आहे. त्यात एक लक्षवेधी ड्रिंकिंग ब्रॅन्डपण होता. आपली पेप्सी.
त्या प्रदर्शनात रशियन लोकांनी पहिल्यांदाच पेप्सीची टेस्ट घेतली. पण सगळ्यात पहिला नंबर सोव्हिएत प्रमुख निकिता ख्रुश्चेव्ह यांनी लावला होता. २४ जुलैला या प्रदर्शनसाठी अमेरिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी ख्रुश्चेव्ह यांना आमंत्रित केलं होत.
आमंत्रण आल्यावर त्या दोघांची भेट अमेरिकेच्या मॉडेल म्हणून उभ्या केलेल्या घरात झाली. त्या दृश्यात उभे असताना निक्सन आणि ख्रुश्चेव्ह यांनी कम्युनिझमविषयी आणि सोव्हिएतच्या सत्तेखाली असलेल्या बंदीवान राज्यांविषयी तसेच नुकत्याच झालेल्या अमेरिकन ठरावाबद्दल चर्चा केली.
आता चर्चा झाल्यावर ख्रुश्चेव्ह यांचा घसा सुकला असेल म्हणून निक्सनने ख्रुश्चेव्हला प्रदर्शनातल्या एका बूथकडे नेले. तो बूथ होता पेप्सीचा. निक्सनने ख्रुश्चेव्हला पेप्सीच्या दोन बॅचेस ऑफर केल्या.
एक अमेरिकन पाण्यात मिसळलेला, दुसरा रशियन पाण्यात. खरं तर हे प्रतीकात्मकपणे होत. की बघा तुमचा नेता अमेरिकन भांडवलशाहीचा प्याला पिला.
आता ख्रुश्चेव्हला हा प्याला पाजण्यासाठी पेप्सीच्या डोनाल्ड एम. केंडलने निक्सनकडे आधीच सेटिंग लावली होती.
खरं तर तो एक सेटअप होता…..
आदल्या रात्री पेप्सीचे कार्यकारी डोनाल्ड एम. केंडल अमेरिकन दूतावासात निक्सनजवळ गेले. केंडल हे पेप्सीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख होते. ज्यावेळी त्यांना समजलं कि ख्रुश्चेव्ह प्रदर्शनाला भेट देणार आहेत. तेव्हा त्यांना पेप्सीसाठी एक संधी दिसली. त्यांनी निक्सनला विनंती केली की, काही पण करा पण ख्रुश्चेव्हच्या हातात पेप्सी द्या.
निक्सनने अगदी तसच केले. आणि एका फोटोग्राफरने ती मुमेंट आपल्या कॅमेऱ्यात कॅच केली. त्या फ्रेममध्ये सोव्हिएतच्या सर्वोच्च नेत्याने पेप्सीचा कप पकडला होता. आणि दुसऱ्या बाजूला केंडल उभा राहून दुसरा कप ओतत होता.
सगळ्या लोकांनी आपल्या नेत्याचं ख्रुश्चेव्हच अनुकरण केलं असं ख्रुश्चेव्हचा मुलगा त्यावेळची आठवण सांगताना म्हणतो. त्यानंतर बर्याच रशियन लोकांना पेप्सी पिल्यावर शुवॅक्स सारखा वास आला. पण, तो पुढे म्हणाला की, प्रदर्शन संपल्यानंतरही ती पेप्सी लोकांनी लक्षात ठेवली.
केंडलसाठी, हा फोटो म्हणजे एक प्रकारचा विजयच होता. त्याच्या ब्रँडच्या विस्तारासाठी त्याच्याकडे मोठ्या योजना होत्या. आणि ख्रुश्चेव्हच्या एका फोटोने त्याच्या पेप्सीला रशियात स्थान मिळवून दिलं होत. अमेरिकन राष्ट्रीय प्रदर्शनाच्या अवघ्या सहा वर्षांनंतर, केंडल पेप्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. कारण,
यू.एस.एस.आर. ही केंडलला मिळालेली एक नामी संधी असलेली जमीन होती. त्याने त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. १९७२ मध्ये, कोला ड्रिंक बनवणाऱ्या मक्तेदारांशी बोलणी करुन १९८५ पर्यंत कोका-कोला आपल्या खिशात घालायला तो पुरता यशस्वी झाला.
कोला सिरपच्या नद्या आता सोव्हिएत युनियनमधून वाहू लागल्या. पेप्सीच्या बाटल्या स्थानिक पातळीवर तयार करण्यात आल्या. ही एक तख्तापलट होती. न्यूयॉर्क टाइम्सने म्हटल्यानुसार, युएसएसआर मध्ये कोला हे “पहिले भांडवली उत्पादन” होते ज्याची पायोनिर पेप्सी कंपनी होती.
आता यातून पेप्सीला तुफान पैसे मिळू लागला. पण हा पैसा सोव्हिएत रुबल या रशियन चलनात होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे चलन निरुपयोगी होते. त्यांचे मूल्य क्रेमलिनने निश्चित केले होते. तर दुसरीकडे सोव्हिएत कायद्यानुसार रुबल हे चलन परदेशात नेण्यासही बंदी होती.
त्यामुळं यू.एस.एस.आर. आणि पेप्सी यांनी बार्टर पद्धतीचा वापर सुरु केला. कोलाच्या बदल्यात, पेप्सीला अमेरिकेत वितरण करण्यासाठी स्टोलीचनाया हा रशियन वोडका प्राप्त झाला. आता पेप्सी इथं पण पैसा छापू लागली.
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, रशियन लोक वर्षामध्ये जवळजवळ पेप्सीचे अब्जावधी सर्व्हिंग्ज पित होते. १९८८ मध्ये पेप्सीने स्थानिक टीव्हीवर पैसे देऊन जाहिराती प्रसारित केली. ज्यात मायकेल जॅक्सन होता. आता रुबलच्या बदल्यात पेप्सीला स्टॉलीचनाया वोडका पण मिळत होता. आणि हा वोडका अमेरिकेत खूपच फेमस झाला होता.
थोडक्यात बार्टरिंग कार्य चांगल सुरु होत…
पण सोव्हिएत-अफगाण युद्ध सुरु झालं. आणि यावर उत्तर म्हणून अमेरिकेन स्टॉलीचनाया वर बहिष्कार टाकला. आणि पेप्सीला तोटा होऊ लागला.
त्यामुळं आता पेप्सीला आपला पैसे रशियाच्या बाहेर काढण्यासाठी काहीतरी व्यापार करण्यासाठी काहीतरी वेगळे हवे होते.
आणि १९८९ मध्ये पेप्सी आणि सोव्हिएत युनियनने एक करार केला. रशियाने स्क्रॅप म्हणून विकण्यासाठी काढलेल्या गोष्टींमध्ये फ्रिगेट, क्रूझर, विनाशकासह १७ जुन्या पाणबुडी आणि तीन युद्धनौका होत्या.
आता पेप्सीची स्वतःची नेव्ही झाली होती. आणि ही नेव्ही केवढी मोठी तर जगातली सहावी सगळ्यात मोठी नेव्ही. मात्र पेप्सी सारख्या खाजगी कंपनीनं नेव्ही उभारणं अमेरिकेसारखा देशाला मान्य होणार नव्हतं. अखेर काही जहाज सोडले तर आपली सर्व सामुग्री पेप्सीला भंगारात काढावी लागली.
हे ही वाच भिडू :
- पेप्सी कोलाला भारतात एन्ट्री साठी जनता सरकारने एक अट घातली होती
- पेप्सी, कोका-कोला खरी टक्कर दिली ती अस्सल भारतीय ब्रँड ‘गोल्ड स्पॉट’ ने…
- किट बॅगेत जॅमची बॉटल घेऊन फिरणारा राहुल स्टार बनल्यावरही वडिलांच्या कंपनीला विसरला नाही