पिक्चरच्या स्पॉटबॉयने देशाला सांगितलं, ‘रोटी कपडा मकान बरोबर वीज, बॅण्डविड्थ मूलभूत गरज आहे’

भारतातल्या लाखो लोकांचं जीवन हे आयटी क्षेत्रामुळे बदललं आहे. आयटी क्षेत्राचे फायदे भारतातल्या तळागाळापर्यंत कसे पोहचवता येतील याच सेगमेंट एका व्यक्तीने दिलं होतं. सॉफ्टवेअर उद्योगात काम करणाऱ्या लोकांना स्वप्न दाखवणाऱ्या व्यक्तीचा आजचा किस्सा जो सुरवातीला स्पॉटबॉय म्हणून काम करायचा पुढे त्याने आयटी क्षेत्रावर मोहर उमटवली.

भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता हे भारतातील महत्वाचं नाव.

पण इतक्या मोठ्या पदावर पोहचण्याची यशोगाथा सुद्धा रंजक आहे.

१० ऑगस्ट १९६२ रोजी गुजरातमध्ये देवांग मेहतांचा जन्म झाला. वडिलांच्या बदलीमुळे दिल्लीत प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. पुढे महाविद्यालयीन जीवनात देवांग मेहता यांची इच्छा डॉक्टर बनण्याची होती. पण ती काही पूर्ण झाली नाही. आर्टमध्ये प्रवेश घेऊन पुन्हा त्यातून कॉमर्सचा अभ्यास करून पुढे मेहतांनी सीए म्हणून काम पाहिलं. 

देवांग मेहता हे एका क्षेत्रात स्थिर राहिले नाही. पुढे पत्रकारितेत त्यांना स्वतःच्या लिखाणाबाबतचा शोध लागला. नंतर ते सिनेमा क्षेत्राकडे वळले तेही जाहिरात आवडते म्हणून. श्याम बेनेगलांच्या सिनेमामध्ये ते स्पॉट बॉय म्हणून काम करू लागले. पुढे कॅमेऱ्याची समज येऊन त्यांनी ग्लिम्प्स ऑफ इंडिया नावाचा माहितीपट तयार केला जो वर्ल्ड रीलमध्ये सिलेक्ट झाला.

नंतर देवांग मेहता हळूहळू सॉफ्टवेअर क्षेत्राकडे वळले. आयटी क्षेत्रावर ते भरभरून लिहू लागले बोलू लगे. आयटी क्षेत्रामुळे देशाची दिशा ठरली जाते याचक त्यांना ज्ञान आलं आणि ते या विषयाकडे गंभीरतेने वळले. त्यांच्या एका हरीश मेहता मित्राने नॅसकॉमची जबाबदारी देवांग मेहतांवर टाकली. नॅसकॉम हि अल्पावधीत लोकप्रिय करण्याचं श्रेय पूर्णपणे दिवांग मेहतांच आहे. 

सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्राचे पैलू लक्षात घेऊन देवांग मेहतांनी नॅसकॉमला भरपूर प्रमोट केलं. अगदी सरकारी योजनांमध्येही नॅस्कॉमला सरकारने सामील करून घेतलं. आयटी संबंधित विभागामध्ये कार्यरत असलेल्या लोकांशी संवाद आणि चांगली वागणूक यामुळे नॅसकॉम चांगलंच गाजलं.

सॉफ्टवेअर आयातीवर शून्य शुल्क पासून ते सॉफ्टवेअर निर्यातदारांसाठी महत्वाच्या आयकर सवलती, कडक कॉपीराईट कायदे, आयटी कायद्याचा परिचय आणि परिणामी सायबर कायदे यामुळे नॅसकॉमवर लोकांचा विश्वास बसू लागला.

परदेशातूनही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पैसे मिळवता येतो आणि सेवा देऊनही आर्थिक फायदा होतो याच गणित लढवून देवांग मेहतांनी इंडिया इंक क्रुसेड लॉन्च केलं. तिथे त्यांनी वयक्तिकरित्या देशातील सॉफ्टवेअर उद्योग जगासमोर सादर केला. २०१८च्या आकडेवारीनुसार आज सॉफ्टवेअर क्षेत्राने १५४ अब्ज डॉलर निर्यातीची अपेक्षा बाळगली होती.

देवांग मेहतांनी भारताला आयटी क्षेत्राची दिशा दाखवली जेणेकरून काम सोपं होईल. अनेक राज्य आणि केंद्राला देवांग मेहतांनी आपली सेवा पुरवली आहे. अनेक सोयीसुविधा या सॉफ्टवेअर कंपनीच्या आधाराने मिळतात याची ओळख देवांग मेहतांनी करून दिली. देवांग मेहता हे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आदर्श होते. 

देवांग मेहता यांचं एक आवडतं घोषवाक्य होतं ते म्हणजे रोटी, कपडा, मकान, बिजली आणि बँडविड्थ या २१ व्या शतकातील भारताच्या गरजा आहेत.

१२ एप्रिल २००१ या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने देवांग मेहतांच निधन झालं. पण नॅसकॉमचे प्रणेते म्हणून देवांग मेहता हे नाव कायम राहील.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.