कधी काळी सिग्नलवर फुलं विकणारी सरिता माळी आज अमेरिकेला Phd साठी जातेय

झोपडपट्टीतील १० बाय ८ ची खोली. एकाच खोलीत स्वयंपाकापासून ते झोपण्यापर्यंत सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. तर वडिलांची मदत म्हणून सिग्नलवर फुले विकावे लागायची. एकीकडे कसरत सुरु असतांना दिसायला सावली असल्यामुळे लोकांचे टोमणे ऐकायला मिळायचे. 

मात्र, तिने कधीच याकडे लक्ष दिले नाही.तिला पक्क माहित होतं या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचा असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे शिक्षणाचा. आज मुंबईत सिग्नलवर फुले विकणाऱ्या तरुणीला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरोबरचं युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन या दोन्ही विद्यापीठात पीएचडीला ऍडमिशन मिळालं आहे.

तिने कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीची निवड केली आहे.   

सरिता माळी असं तरुणीचं नाव आहे. तसेच अमेरिकेतील सगळ्यात प्रतिष्ठेची असणारी चॅन्सलर फेलोशिप तिला मिळाली आहे. 

ती सध्या जेएनयू मध्ये हिंदी लिटरेचर मध्ये पीएचडी करत आहेत. जुलै महिन्यात पीएचडी पूर्ण होणार असून त्यानंतर ती अमेरिकेला जाणार आहे.

तिच्या वडिलांचे नाव रामसूरत माळी. ते मूळचे उत्तरप्रदेश मधील जौनपूर जिल्ह्यातील. कामासाठी मुंबईत आले होते. ते मुंबईतील सिग्नलवर फुले विकायचे काम करायचे. तर तिची आई रात्रभर त्या फुलांची माळ बनवत. 

सरिताची मोठी बहीण, दोन भाऊ आणि आई- वडील असं सगळे घाटकोपर मधील झोपडपट्टीत १० बाय ८ च्या खोलीत राहत. तिथंच स्वयपांक, तिथंच अभ्यास, आईच्या कामाचं ठिकाणसुद्धा तेच. असं सगळं त्या खोलीत चालतं.  

सरिता थोडी मोठी झाल्यावर ती सुद्धा वडिलांन सोबत जाऊन सिग्नलवर थांबणाऱ्या गाड्यांच्या पाठीमागे धावून फुले विकत. आपला शाळा, अभ्यास सांभाळून सरिता हे काम करायची. दिवसभर फुले विकून सरिता आणि तिच्या वडिलांना ३०० रुपयेच मिळायचे. मुंबई सारख्या शहरात ३०० रुपयांत काय होत हे सगळ्यांनाच माहित आहे.

सरिता ही महानगर पालिकेच्या शाळेत होती. वडील घेत असलेले कष्ट तिला माहित होती. त्यामुळे आपण जर चांगले शिक्षण घेतले तरच यातून सगळ्यांची सुटका होऊ शकत हे तिला पक्क माहित होत.

सरिताला दहावीला चांगले मार्क मिळाले. त्यानंतर तीने झोपडपट्टीतील मुलांना शिकवायला सुरुवात केली. यातून मिळालेल्या काही पैसे मिळत होते. तिने हे सगळे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा ठेवले होते. १२ वी नंतर सरिताने के जे सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स येथे ऍडमिशन घेतले. 

आपल्या बहिणीचे चाललेलं शिक्षण पाहून तिचे भाऊ बहीण सुद्धा जोमाने अभ्यास करायचे. वडिलांचे शिक्षण फक्त ५ वी पर्यंत झाले होते. आपली मुलगी बीए, एमए करतीये म्हणजे काय करतीये हे सुद्धा माहित नव्हते. मात्र, ती हे शिक्षण घेऊन मोठी होणार एवढं त्यांना फिक्स माहित होत.

बीए मध्ये सरिताने टॉप केलं होत. त्यानंतर तिला दिल्लीतील जेएनयु  बद्दल माहिती कळाली होती. तिने एन्ट्रन्स फॉर्म भरला. शेवटच्या दिवशी शेवटची जागा सरिताला मिळाली होती. तो पर्यंत सरिताने फक्त दिल्ली हे नाव बातम्या, टीव्हीवर ऐकलं बघितलं होत. 

ऍडमिशन तर मिळालं पण त्यानंतर खरी लढाई सुरु झाली. दिल्लीत जाऊन राहण्याचा, खाण्याचा, शिक्षणाचा, येण्या जाण्यासाठी लागणारे पैसे कसे जमवायचे हा प्रश्न उभा राहिला होता. काही दिवसापूर्वीच मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. त्यामुळे सरिताच्या वडिलांवर कर्ज झाले होते.  

तरीही सरिताला जेएनयू सारख्या मोठ्या युनिव्हरसिटी मध्ये ॲडमिशन मिळाल्याने त्यांनी पैशांची व्यवस्था केली आणि तिला दिल्लीला पाठविले होते.   

याबाबत सरिता माली हिने फेसबुक पोस्ट लिहली असून ती म्हणते की, रस्त्यावर फुल विकणारे वडील आम्हा भावंडाना सांगायचे की, आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडायचे असेल तर चांगले शिक्षण घेतले पाहिजे. जर तुम्ही चांगलं शिक्षण घेतले नाही तर, स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी सगळं आयुष्य खर्ची घालावं लागेल. या देशाला आणि समाजाला आपण काही देऊ शकणार नाही. असं तिचे वडील तिला नेहमी सांगायचे.  

या सगळ्या गोष्टीची जाणीव सरिताला होती. २०१४ मध्ये २० व्या वर्षी सरिता जेएनयू मध्ये एमए करण्यासाठी गेली होती. जेएनयू मध्ये तिने एमए, एमफिल आणि पीएचा थिसीस जमा करून पुन्हा एकदा पीएचडी करण्यासाठी अमेरिकेत जाणार आहे.       

तिचा पहिला विमान प्रवास हा मुंबई ते कॅलिफोर्निया असा असणार आहे. तिने यापूर्वी फक्त आकाशात विमान उडताना पाहिले होते. 

 हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.