एक माणूस बदलला आणि काँग्रेसची सोशल मीडिया टीम मैदानाप्रमाणंच आक्रमक झाली…

पहिला घटना 

स्तंभ लेखिका तलवीन सिंह यांनी न्यूज चॅनल वरील डिबेट दरम्यान आरोप केला होता की, मनमोहन सिंग यांच्या सरकार मध्ये सोनिया गांधी यांच्याकडे कुठलेही पद नव्हते. मात्र त्यांच्याकडे सगळ्या महत्वाच्या फाईल्स पाठवल्या जात होत्या. त्यामुळे ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचे उल्लंघन होत असे. 

तर दुसरीकडे काँग्रेसचे बाजू प्रवीण चक्रवर्ती हे मांडत होते. तलवीन सिंह यांनी केलेल्या दाव्याला विरोध करत चक्रवर्ती यांनी सोनिया गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाचे पुरावे द्यावे अन्यथा मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल अशी तंबी दिली. त्यावेळी तलवीन सिंह यांनी पुरावे नंतर देतो म्हणून वेळ मारून नेली. मात्र दोन दिवसानंतर सुद्धा त्यांना कुठलेही पुरावा मिळाला नसल्याने त्यांनी माफी मागितली. 

तर दुसरी घटना आहे राहुल गांधी यांच्या संदर्भातील होती. 

झी न्यूजच्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांचा वायनाड येथील व्हिडीओ उदयपुरचा म्हणून दाखववण्यात आला होता. उदयपूर येथील हत्याकांडा संदर्भात बोलतांचा व्हिडीओ असल्याचे सांगत होते.  

याच व्हिडिओची क्लिप भाजपचे नेते राज्यवर्धन राठोड यांनी ट्विट करून गांधी यांना संवेदना नसल्याचे म्हटले होते. भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्तांनी हाच व्हिडीओ रिट्विट केला होता. 

यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी राठोड यांना हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने कट करण्यात आल्याचे सांगत डिलीट करायला सांगितला होता. तसेच दुसरे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करत राहुल गांधी हे नेमके काय म्हणाले होते ते सांगितले. यानंतर संबंधित पत्रकाराला माफी मागावी लागली होती.   

काँग्रेस पक्ष अचानकपणे सोशल मीडियावर आक्रमक झाला नाही. त्याला कारणीभूत ठरली आहे काँग्रेसची नवीन सोशल मीडिया टिम        

मतदारांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून नॅरेटिव्ह कसं सेट करायचं, त्याचा फायदा कसा घ्यायचा हे भाजपाला चांगले जमले आहे. अगोदरपासून काँग्रेसवर एक टिका होत असते.  मैदानावर आक्रमक असणारी काँग्रेस सोशल मीडियावर थंड आहे.  पक्षावर एक प्रकारची टिका करण्यात येते की, काँग्रेसला सोशल मीडिया मॅनेजमेंट करता येत नाही, त्याचा वापर योग्य प्रकारे वापर केला जात नाही. 

आता काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावरचा वावर वाढवला तर आहेच. तसेच काँग्रेस विरोधात घेण्यात येणाऱ्या भूमिकेला तशाच प्रकारचे उत्तर देण्याचे काम काँग्रेसची टिम करत आहे. याच कारण म्हणजे काँग्रेसची नवी सोशल मीडिया टिम. 

१६ जूनला काँग्रेसच्या वतीने नवीन मीडिया आणि कम्युनिकेशन टिमची घोषणा केली. 

माजी मंत्री जयराम रमेश यांना काँग्रेसच्या मीडिया आणि कम्युनिकेशन टिमचे प्रमुख करण्यात आले आहे. तर पवन खेरा यांची मीडिया आणि प्रसिद्धी प्रमुख तर सुप्रिया श्रीनाते यांची सोशल मीडिया आणि डिजिटल प्लँटफॉर्मच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

त्यापूर्वी जयराम रमेश यांच्या पदावर रणदीप सुरजेवाला हे होते. काँग्रेसच्या मीडिया आणि कम्युनिकेशनच्या प्रभारी पद हे तीन वर्षांसाठी असतांना सुरजेवाला हे ७ वर्ष या पदावर होते. जेव्हा काँग्रेस पक्षाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होत होता. त्यावेळी सुरजेवाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी विनंती पक्षाकडे केली होती मात्र अनेकवर्ष स्वीकारला गेला नाही. मात्र शेवटी जून महिन्यात तो स्वीकारण्यात आला. 

जयराम रमेश यांच्या टिम मध्ये तीन सचिवांची नियुक्ती करण्यात आली. 

त्यात राष्ट्रीय सचिव म्हणून विनीत पुनिया, वैभव वालीय, अमिताभ दुभे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. जयराम रमेश यांची केंद्रीय टिम राज्यातील काँग्रेसच्या टिमशी संपर्कात असते. एकीकडे काँग्रेस एक एक करत सगळ्या निवडणूक हरत होती. असे असतांना सुद्धा मीडिया टीम मध्ये कसलाही बदल केला जात नव्हता. पक्षाचे कामकाज पारंपरिक पद्धतीने चालत होते. 

जयंती, पुण्यतिथी, कार्यक्रमाची माहिती एवढंच उपडेट केलं जात होत. मात्र जयराम रमेश यांनी पदभार स्वीकारताच भचावात्मक भूमिका सोडली. याच उदाहरण म्हणजे झी न्यूज विरोधात घेण्यात आलेली भूमिका.

यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने चुकीच्या, फेक बातमी विरोधात बोललं जात नव्हते. तर दुसरीकडे पक्षाच्या वतीने जास्तीस्त प्रेस कॉन्फरंस घेण्यात याव्यात आणि त्यात मूलभूत प्रश्नावर चर्चा घडवून आणण्याची सांगितले. 

तसेच जयराम रमेश हे मीडिया आणि कॅम्युनिकेशनचे प्रभारी झाल्यानंतर त्यांनी देशातील मुख्य संपादकांची बैठक बोलून चर्चा केली होती. यावेळी रमेश यांनी काँग्रेस संदर्भात येणाऱ्या बातम्या आणि टीव्ही तिबेट वर घेण्यात विषयावर चर्चा केली होती. 

तसेच टिव्ही वरील चर्चेत सहभागी होण्यासाठी  गौरव वल्लभ, सुप्रिया श्रीनाते, अलका लांबा, रागिणी नायक, पवन खेरा आणि आलोक शर्मा सारख्या आक्रमक प्रवक्त्याची निवड केली. तसेच जे काही चॅनेल काँग्रेस विरोधी भूमिका घेत असतील त्यांच्याकडे प्रवक्ता न पाठवण्याची भूमिका सध्या घेतली. 

अशा प्रकारे जयराम रमेश यांनी प्रभारी पद स्वीकारल्यानंतर मैदानावर आक्रमक असणारी टीम सोशल मीडिया टीम आक्रमक झाली आहे. 

हे ही वाच भिडू 

 

   

    

 

Leave A Reply

Your email address will not be published.