एका माणसाच्या धोरणामुळे बांग्लादेश रेडिमेड कपडे निर्यात करण्यात टॉप वर पोहचलाय

आज कुठलीही वस्तू घ्यायला गेल्यावर त्यावर मेड इन चायना लिहलेलं असणार हे आपण गृहीतच धरून चालतो. परवा युरोप वरून आलेल्या मित्राने कपडे आणले. मात्र तिथं वेगळीच स्कीम दिसली.

त्या सगळ्या कपड्यांवर ‘मेड इन बांग्लादेश’ची पट्टी दिसली.

तेव्हा न राहवून मित्राला विचारलं. हे कपडे खरंच तू युरोप मधून आणलेस ना? मित्र म्हणाला असं काही नाही. अख्या युरोपमध्ये कुठंही गेलास तरी रेडिमेड कपड्यांवर ‘मेड इन बांग्लादेश’ची टॅग दिसले. हे ऐकल्यावर मला जरा उत्सुकता लागली.

आपल्या शेजारी असणाऱ्या लहानशा देशानं कपड्यांच्या बाबत चांगलीच मजल मारल्याचे लक्षात आलं. म्हणलं जरा याबाबत जा गुगल करून माहिती गोळा करावी. तर आलेले रिजल्ट जरा चकित करणारे होते. 

रेडिमेड कपड्याच्या निर्यातीच्या बाबतीत बांग्लादेशच्या पुढे फक्त चीन आहे.

मोठं मोठ्या देशांना मागे टाकत बांग्लादेश रेडिमेड कपड्यांची निर्णयात करून आपले आर्थिक गणित सेट केले आहेत. बांग्लादेशाच्या एक्सपोर्टच्या ८० टक्के हिस्सा हा रेडिमेड कपड्यांच्या आहे.

बांग्लादेश रेडिमेड कपड्यांच्या बाबतीत पुढे जाण्यासाठी एक गोष्ट महत्वाची ठरली. ती म्हणजे १९७८ मध्ये स्वातंत्र्याच्या अवघ्या ७ वर्षानंतर एका सचिवाने बांग्लादेश मधील १३० तरुणांना दक्षिण कोरियाला प्रशिक्षणासाठी पाठविले होते.

रेडिमेड कपडे कशा प्रकारे बनविण्यात येतात याचे प्रशिक्षण घेण्यासाठी हे तरुण दक्षिण कोरियात पाठविण्यात आले होते. बांग्लादेशच्या रेडिमेड कपड्यांच्या उद्योग खरी सुरुवात इथूनच झाली.

दक्षिण कोरियातून आलेल्या याच १३० तरुणांमुळे बांग्लादेशने एवढी मजल मारली. 

यातील अनेक तरुण हे रेडिमेड कपड्यांची निर्यात करणाऱ्या व्यापारी ठरले. अनेकजण अजनूही रेडिमेड कापडाची निर्यात जगभर करत आहेत. 

तर भविष्याचा विचार करून दक्षिण कोरियाला आपले कामगार पाठवणारे सचिव होते नुरुल कादर खान.

बांग्लादेश मध्ये नुरुल कादर खान हे देशभक्त म्हणून ओळखले जातात.

कपड्यांच्या बाबतीत बांग्लादेश अगोदरपासून स्वयंपूर्ण होता. पण त्याचा देशाला म्हणावा तसा आर्थिक फायदा होत नव्हता. जर हे कापड आपण तयार करून निर्यात केले तर त्याचा अधिक फायदा होईल असा विचार करूनच नुरुल कादर खान यांनी बांग्लादेश मधील १३० जणांना दक्षिण कोरियाला पाठविले होते. त्याचा फायदा आता येतोय.    

आजच्या घडीचा विचार करायला गेलं तर बांग्लादेश मध्ये रेडिमेड कपडे तयार करणाऱ्या ५ हजार कंपन्या आहेत. रेडिमेड कपड्यांच्या निर्यातीतून बांग्लादेशला ३० बिलियन डॉलरची कमाई करतो. 

आजच्या घडीला बांग्लादेशात एक कोटींपेक्षा अधिक जणांना या उद्योगातून रोजगार मिळतो. त्यात महिलांचे प्रमाण हे ८० टक्के आहे. बांग्लादेश अर्थ व्यवस्थेत टेक्स्ट टाईल्स उद्योगाचा मोठा वाटा आहे.

तिथली अर्थव्यवस्था सुधारण्यातही रेडिमेड कपड्यांची इंडस्ट्रीचा मोठा वाटा आहे. 

 कोण होते नुरुल कादर खान

बांग्लादेश रेडिमेड कपड्यांच्या निर्यातदार बनण्यामागे वर सांगितल्या प्रमाणे नुरुल कादर खान यांचा मोठा वाटा आहे.  नुरुल खान हे सुरवातीला फायटर प्लॅनचे पायलट होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. नोकरीचा राजीनामा देऊन परत विद्यापीठात शिक्षण सुरु केले होते. यावेळी त्यांचा विद्यार्थी चळवळीशी जवळचा संबंध आला आणि पुढे ते स्वातंत्र्य संग्रामात आले. 

कॉलेज झाल्यानंतर १९६० मध्ये नुरुल खान हे पाकिस्तनाच्या नागरी सेवेत दाखल झाले होते. १९७१ च्या युद्धात ते बांग्लादेशच्या बाजूने उभे होते. देश स्वातंत्र्य झाल्यावर पहिल्या सरकार मध्ये नुरुल सचिव म्हणून काम पाहू लागले होते. 

१९७४ मध्ये नुरुल यांनी व्यवसाय करायचा म्हणून नोकरीचा राजीनामा दिला. 

 त्यानंतर त्यांनी रेडिमेड कपड्यांची निर्णयात कशी करता येईल या संदर्भात पाऊले उचलायला सुरुवात केली होती. १९७७ मध्ये त्यांनी देशी गारमेंट नावाची रेडिमेड कपडे निर्यात करणारी कंपनी सुरु केली. 

नुरुल खान यांनी सुरु केलेल्या देशी गारमेंट या कंपनी पासून खरी रेडिमेड कपड्यांच्या निर्यातीला सुरुवात झाली. १९७४ मध्ये विकसित देशांनी कापड उद्योग नियंत्रित करण्यासाठी काही नियम लागू केले होते. परिणामी अनेक देशांना टॅक्स फ्री धोरण राबवत उत्पादन करणाऱ्या उद्योगांना सवलती दिल्या.

याचा फायदा सगळ्यात आधी नुरुल खान यांनी घेतला. या सगळ्या निर्णयावर नुरुल खान यांचे लक्ष होते. यापूर्वीच त्यांनी रेडिमेड कापडाच्या उद्योगात पाऊल ठेवले होते. मात्र, त्यांना कुशल मनुष्यबळाची गरज जाणवू लागली होती. यासाठी १९७६ मध्ये बांग्लादेश मधील १३० जणांना कोरियाला पाठविले होते. 

नुरुल खान यांनी दक्षिण कोरियाला पाठवलेल्या १३० जणांनी परत येऊन देश गारमेंट जॉईन केले. पुढे यातील अनेक जण मोठे निर्यातदार ठरले. युरोपच नाही तर अमेरिकेसारख्या विकसित देशात सुद्धा बांग्लादेश मधून मोठ्या प्रमाणात रेडिमेट कपड्यांची निर्यात होते..

नुरुल खान यांचे १९९८ मध्ये निधन झाले.

बांग्लादेशला रेडिमेड कपड्यांच्या निर्यातदार देश बनविण्याची किमया नुरुल खान यांनी करून दाखवली. अजूनही तो देश याच मार्गावर सुरू आहे. 

हे ही वाच भिडू        

Leave A Reply

Your email address will not be published.