पहिल्या निवडणुकीवेळी मुलायम सांगायचे,” मला दिलेला १ रुपया व्याजासकट परत करेन.”

मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशाच्या राजकारणातील एक चर्चित नाव. असं म्हंटल जात कि, एक काळ असाही होता जेव्हा उत्तर प्रदेशाचं राजकारण त्यांच्या नावाने ओळखलं जायचं. सैफई या छोट्या गावातील एका साध्या कुटुंबातून आलेले मुलायम सिंह यांनी यूपीच्या राजकारणात मात्र आपली एक ओळख तयार केली. 

राज्याच्या राजकीय वर्तुळात नेताजी म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि एकदा देशाचं संरक्षणमंत्रीपद सांभाळलं आहे.  विशेषतःआपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत असतात. त्यांच्याशी संबंधित अनेक किस्से आजही राजकीय वर्तुळात मोठ्या चवीने सांगितले सांगतात. त्यातलाच एक किस्सा म्हणजे त्यांच्या पहिल्या निवडणुकीचा.  

आपल्यातल्या चांगल्या लीडरशिप क्वालिटीमुळे मुलायम सिंह यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. तो काळ होता १९६६ – ६७ दरम्यानचा. मुलायम सिंह यांना ‘किसानों के मसीहा’ म्हणून ओळखलं जायचं. आता नवा नवखा माणसानं निवडणुकीत उतरायचं म्हंटल्यावर काही वेगळी स्ट्रॅटेजी पाहिजे ना, आणि त्यात ते मुलायम सिंह होते म्हंटल्यावर साहजिकचं. 

दरम्यान त्याआधी मुलायम सिंह यांच्या गावातील मंडळींनीच एका वृत्तसंस्थेला त्यांच्या पहिल्या निवडणुकीबद्दल एक किस्सा सांगितलाय तो पाहूया. 

तर मुलायम सिंह यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेता खरा, पण निवडणूक लढवायची म्हंटल्यावर पैसा तर लागतोच. पण नेताजी एका सध्या कुटुंबातील माणूस. त्यामुळं पैशाचा जुगाड कसा करायचा असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मुलायम सिंह यादव निवडणूक लढवण्यासाठी पैशांची जुळवा-जुळावं करण्यात गुंतले होते. पण फिक्स केलेला रकमेचा आकडा काय गाठता येत नव्हता. पण त्यांच्या गावातली सगळीच मंडळी त्यांच्यासोबत होती.

त्यामुळं त्यांनी गावकऱ्यांची मदत घ्यायचं ठरवलं. यासाठी एक दिवस निवडला आणि  नेताजींच्या घराच्या गच्चीवर संपूर्ण गावकऱ्यांची बैठक जमली. ज्यात सगळ्या जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. याच दरम्यान नेताजींच्या एका समर्थकान उभं राहून सभेला संबोधित करताना म्हंटल कि, 

मुलायमसिंह यादव आपले आहेत. त्यांना जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी निवणूक लढवायची आहे. पण फंड जमा होण्यात अडचण येतेय.  त्यांना निवडणूक लढवण्यासाठी आपण गावकरी मदत करू यासाठी आपण गावकरी एक वेळचे जेवण जेवणार नाही. एकवेळचे जेवणं केलं नाही तर  कोणी मरणार नाही. पण एक दिवस जेवण सोडलं तर मुलायम सिंह यांची गाडी आठ दिवस धावेल. 

मुलायम सिंहाच्या त्या समर्थकांच्या प्रस्तावावर सगळ्याच गावकऱ्यांनी एकत्र पाठिंबा दिला आणि तेच घडले.

मुलायम सिंह यादव ‘एक वोट एक नोट’ या स्ट्रॅटिजीने  पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आणि त्यांची या स्ट्रॅटेजीने त्यांना लोकांमध्ये वेगळी ओळख निर्माण करून दिली.  मुलायमसिंह यादव आपल्या भाषणात लोकांना एक मत आणि एक नोट अर्थात एक रुपया देण्याचे आवाहन करायचे. नेताजी म्हंटले कि, 

जर मी आमदार झालो तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमचा एक रुपया तुम्हाला व्याजासकट परत केला जाईल.”

 नेताजींचा हे म्हणणं ऐकताचं लोकांमध्ये हश्या तर पिकलाचं पण सोबत  कडकडून टाळ्यांचा प्रतिसादही मिळाला. एवढंच नाही तर लोकांनी उदार मनाने दानही दिले. आपल्या पहिल्याच प्रयत्नात लोकांची मन जिंकण्यात ते पास झाले होते. असंच चित्र पुढच्या अनेक भाषणात पाहायला मिळायचं बोललं जात. 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.