ही भाषा बोलू शकणारी जगभरात एकच महिला जिवंत आहे

जगभरात अनेक जाती – जमातीचे, विविध धर्माचे लोक राहतात. त्यांची बोलीभाषा देखील वेगळी आहेत. असही प्रत्येक ४ किलोमीटरवर भाषा बदलत जाते. कदाचित त्यामुळेच जगातील भाषांवर नजर ठेवणाऱ्या एथनोलॉग या प्रकाशनानुसार जगातील विविध भागात एकूण ७ हजार ०९७ भाषा बोलल्या जातात.

यापैकी कित्येक भाषा अशा आहेत ज्या हजारो वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे त्यातील काही भाषा काळाच्या ओघात अस्तित्त्वात हरवून बसल्या किंवा ती बोलणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक उरले आहेत.

अशीच एक भाषा म्हणजे यघान.

अर्जेंटिनामधल्या बेटावरची ही मूळ भाषा आता जवळजवळ संपली आहे. कारण या भाषेची ओळख असणरी आणि ती बोलू शकणारी सध्या एकमेव वृद्ध महिला उरली आहे. ही भाषा अर्जेटिना आणि चिली दरम्यान स्थायिक झालेल्या टिएरा डेल फुएगो नावाच्या बेटाच्या आदिवासींची मूळ भाषा होती. यघान नावाची ही भाषा संस्कृत सारखीच मानली जाते.

आता ती बोलणाऱ्या एकट्या वयस्क महिलेचे नाव आहे क्रिस्टीना काल्डेरन. या महिलेला स्थानिक लोक अबुइला म्हणतात, अर्थात स्पॅनिशमध्ये आजी.

क्रिस्टीनाचा जन्म ३ मे १९२८ साली चिली नवारिनो आयलँडवरील पोर्टो विल्यम्स येथे झाला. या महिलेचे कुटुंब देखील फार मोठे आहे. १४ नातवंडे आणि कितीतरी पणतू असूनही क्रिस्टीनाशी आता तिच्या मूळ भाषेत बोलायला कोणीही नाही. ही भाषा जाणणारे तिच्या जवळचे तिच्या बहिणी मरण पावल्या आहेत आणि कुटुंबातील इतर सदस्य स्पॅनिश किंवा इंग्रजी भाषा बोलतात. अनेकांना ही भाषा समजते मात्र, ते बोलू शकत नाहीत.

एकटीने संपूर्ण भाषा जपून ठेवल्यामुळे क्रिस्टीनाला अनेक सन्मानही मिळाले आहेत. २००९ मध्ये, चिली सरकारने तिला “लिव्हिंग ह्युमन ट्रेझर” पुरस्कार देऊन तिचा गौरव केला. ही पदवी युनेस्कोच्या अंतर्गत येते, ज्यांनी संस्कृती जतन करण्यात मोठी भूमिका बजावली त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते.

यघान ही केवळ एक भाषा नाही तर बंजारा समुदायाचे एक नाव होते. ज्यांनी दक्षिण अमेरिकेतून जात चिली आणि अर्जेंटिना गाठले होते. १५२० मध्ये पोर्तुगीजांना पहिल्यांदा या कुळाचा शोध लागला. मात्र, कालांतराने, भाषा आणि संस्कृतीसंस्कृतीने खूप समृद्ध असलेला हा समुदाय विखुरला गेला.

आता क्रिस्टीना यघान ​​भाषेला सरकारच्या मदतीने जिवंत ठेवण्यासाठी मोहीम राबवित आहे. ती अर्जेन्टिनाच्या शाळांमधील लहान मुलांना ही भाषा शिकवण्याचे काम करतेय. तसेच, दरवर्षी ती यघान कुळात सहभागी असलेल्या महोत्सवाचे आयोजन देखील करते, ज्यात अर्जेटिनातील दूरदूरचे लोक येतात. पण अजूनही या आजींना ही भाषा पुन्हा रुजवण्यात यश आलेल नाही.

२००५ मध्ये तिची नात क्रिस्टिना झर्रागा आणि तिची बहीण इरसुला काल्डेरन यांच्याबरोबर तिने ‘Hai Kur Mamashu Shis (मला तुम्हाला एक कथा सांगायचीय) हे यघान कथांचं पुस्तक प्रकाशित केलं.

एथिनोलोग असे नमूद करते की, जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या केवळ २३ भाषांमध्ये राहत आहे. भाषांच्या जन्माविषयी बोलताना असे मानले जाते की मानवांनी सुमारे १ लाख वर्षांपूर्वी स्वतःला व्यक्त करण्याचा एक मार्ग शोधला होता. ती कोणती भाषा होती, अद्याप याची योग्य माहिती अद्याप पुढे आलेली नाही.

सध्या जगात चिनी भाषा बोलणारे लोक सर्वाधिक आहेत. या भाषेचा इतिहास सुमारे ३ हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते, जी जगभरातील १.२ अब्ज लोक किंवा जगातील १६ टक्के लोक बोलतात. हे पहिल्या लिखित भाषेतही आहे आणि याच कारणास्तव चिनी भाषेचे नावही गिनीज बुकमध्ये नोंदलेले आहे.

चीनशिवाय ही भाषा तैवान आणि सिंगापूरचीही भाषा आहे. थोड्याशा बदलानंतर चिनी भाषा मेंन्डारिन आणि कॅन्टोनिज ची भाषा देखील बनली.

भारतातील संस्कृत भाषा अनेक वर्षे जुनी आहे. या भाषेचे पहिले उदाहरण उत्तर प्रदेशातील अयोध्यात असल्याचे मानले जाते. प्राचीन संस्कृतची पुष्कळ पुरावे गुजरातमध्येही सापडली आहेत. संस्कृत ही अद्याप भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे, शाळांध्ये देखील ती शिकवली जाते, परंतु सध्या ती गायब होत चाललेल्या भाषेत आहे, ज्याचे मूळ भाषिक केवळ १४ हजार लोक आहेत.

 हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.