हे मदर इंडिया आधी इतिहास वाच ! 

मीच पहिली स्त्रीवादी अभिनेत्री असा दावा कंगनाने केला आणि मग एका मोठ्या लेखिकेने खुले पत्र लिहले. 

मैथिली राव यांनी कंगनाला इंग्लिशमधून धुतलं. कंगणाची भूमिका, ती काय मत मांडते याच्याशी त्यांना काहीच प्रोब्लेम नाही. तसा तो कोणालाच असता कामा नये. पण आपल्या मुलाखतीतून ती अस एखादं वाक्य फेकते की भल्याभल्यांच्या फ्यूजा उडतात.

काही दिवसांपूर्वीच्या मुलाखतीत कंगना म्हणाली, 

मी हिंदी सिनेमा जगातली पहिली स्त्रीवादी भूमिका करणारी अभिनेत्री आहे. 

तिचं हे वाक्य वाचून फिल्म समिक्षक व लेखिका असणाऱ्या मैथिली राव यांनी कंगणाला खुलं पत्र लिहलं. ते लिहलं इंग्लीशमधून पण बोलभिडूने आपल्या स्टाईलमध्ये याचा स्वैर अनुवाद केला. 

तर त्या काय लिहतात ते वाचा… 

प्रिय राणौत, 

काल रात्रीच्या एका मुलाखतीत तू दावा केलास की हिंदी सिनेमा जगतात तू पहिली स्रीवादी भूमिका करणारी अभिनेत्री आहेस. टाईम्स नाऊ सहीत अनेक पत्रकारांनी तूझ्या या वाक्यावर चकार शब्द काढला नाही. तुझे जे काही बोलतेस ते खरच अशा प्रकारे सर्वांनीच तुझ्या हा मध्ये हा मिसळला. 

आत्ता मला जितकं माहित आहे त्यावरून सांगते महिला प्रमुख भूमिकेत असणारे तू दोन सिनेमे केलेस. क्विन आणि तनू विड्स मनू. या सिनेमाबद्गल तुझं अभिनंदनच. पण हे सिनेमे एकतर तू लिहले नाहीस, त्यांची निर्मीती केली नाहीस की त्यांच दिग्दर्शन केलेलं नाहीस. या सिनेमात तू प्रमुख भूमिका करण्याइतपत मर्यादित होतीस. या दोन्ही सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले. सो या सिनेमांसाठी तुझं अभिनंदनच ! 

पण हिंदी सिनेमा जगातील तू पहिली स्त्रीवादी भूमिका करणारी अभिनेत्री आहेस यावर माझा आक्षेप आहे.

आपल्या पंतप्रधानांनी ज्याप्रमाणे एन्टायर पॉलिटीकल सायन्स किंवा इतर विषयात जस ज्ञान मिळवलं आहे त्याचंप्रमाणे एन्टायर इंडियन सिनेमा चं ज्ञान तूला आहे असं तूझं मत असेल. पण एन्टायर इंडियन सिनेमा राहूदे निदान हिंदी सिनेमाचा थोडासा इतिहास तरी तूला माहिती असला पाहीजे. 

तू व्ही शांताराम यांच्या दुनिया न माने या सिनेमाबद्दल कधी ऐकलं तरी आहेस का? ते जाऊदे पण मदर इंडिया हे नाव तरी कधी कानावर आलंच असेल. किंवा नुतन, बिमल रॉय यांच्या सिनेमे माहित असतील. साहेब बिवी और गुलाम, गाईड सिनेमातील वहिदा रहमानची भूमिका या गोष्टीतरी तूला ऐकून माहित असाव्यात. 

मला माहित नाही की समांतर सिनेमे काय भानगड असते आणि ते तू बघितले आहेस का नाहीत ते पण शबाना आझमी, स्मिता पाटील, दिप्ती नवल, रोहिणी हट्टगंडी या महिलांनी स्त्री वादी केलेल्या भूमिकांनाच एक वेगळी उंची दिली नाही तर भारतीय महिलांच्या आवाजाला आपल्या अभिनयातून मोकळं केलं. 

शबाना आणि स्मिता पाटीलने तर मेनस्ट्रिम सिनेमात देखील काम केल आहे. अर्थ आणि आखिर क्यों सारखे सिनेमे खरे कौतुकास पात्र होते, शबानाची गॉडमदर मधली भूमिका एक ऐतिहासिक गोष्ट म्हणून ओळखली जाते. 

अजून एक गोष्ट, तू तूझ्या अपशब्दांनी जया बच्चन यांना निशाण्यावर घेतलसं पण त्यांनी हिंदी सिनेमाला गुड्डी, अभिमान, कोरा कागज, हजार चौरासी कि मॉं असे सिनेमे दिलेत हे समजून घेतलस का? 

तूला हा इतिहास वाटत असेल तर सांगते जेव्हा आपण २१ व्या शतकात पदार्पण करत होतो तेव्हा तब्बू सारखी अभिनेत्री अस्तित्व आणि चांदणी बार सारख्या सिनेमातून स्त्रीवादी भूमिका करत होती. त्याला नवे आयाम देत होती. तूझ्या सोबत असणाऱ्या विद्या बालन, दिपीका, तापसी पन्नू, स्वरा भास्कर अशा कितीतरी अभिनेत्रींनी महिलांची बाजू मांडणारे सिनेमे केले आहेत. 

सो प्लीज तूझ्या हेकडीवर जरा लगाम लाऊन बॉलिवूड्या योद्धाच्या भूमिकेत जाण्यापूर्वी जरा आपला इतिहासही वाचून घे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.