‘ऑपरेशन कॅक्टस’मुळे मालदीवकर भारतीयांच्या सदैव उपकाराखाली राहतील…

3 नोव्हेंबर 1988 रोजी सकाळी 9 वाजता भारतीय पंतप्रधान राजीव गांधींनी मंत्रिमंडळाची एक तातडीची बैठक बोलावली. कारण मालदीव बेटावरती एक संकट ओढवले होते. याबाबतीत पंतप्रधानांच्या ऑफिसमधील रोनन सेन यांनी प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना सांगितले की,

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मालदीव बेटाची राजधानीवर म्हणजे माले शहरावर एका सशस्त्र  गटाने आक्रमण केले. त्यांनी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान ताब्यात घेतले. राष्ट्राध्यक्ष गयूम हे त्या गडबडीत कसेबसे निसटून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांनी भारताकडे मदतीची मागणी केली आहे.

नंतर असे कळले की, सुमारे शंभरएक भाडोत्री सैनिकांनी हा हल्ला चढवला होता. या हल्ल्यामागे अब्दुल लुथूफी ही तस्करी करणारी श्रीमंत व्यक्ती होती.

लुथूफीच्या गटाला आता आपले तस्करीच्या धंद्यांचे जाळे पसरायचे होते. मादक पदार्थ आणि हत्यारे यांचा तुफान फायदा देणारा चोरटा व्यवसाय वाढवायचा होता. त्यासाठी एक सुरक्षित स्थळ स्थापन करण्यासाठी त्यांना मालदीव बेट हवे होते.

जरी हल्लेखोरांनी राष्ट्राध्यक्षांचा राजवाडा, नभोवाणी केंद्र व दूरदर्शन केंद्र यावर आपला कब्जा केला होता तरी टेलिफोन एक्सचेंजचा ताबा त्यांनी घेतला नाही.

नंतर पंतप्रधानांना आणि भारतीय लष्कराला कळले की, त्यांनी विमानतळाचा ही ताबा घेतला नव्हता. ही त्यांनी एक मोठीच घोडचूक केली होती. मालदीव चा परराष्ट्रमंत्री फतूल्ला जमील याने मग पहाटे 5 वाजता घाईघाईने भारतात राजीव गांधी यांना फोन लावून मदतीची मागणी केली.

मालदीवला हल्लेखोरांना पासून मुक्त करण्याचा निर्णय राजीव गांधी यांनी त्याचक्षणी घेतला व अशा रीतीने ‘ऑपरेशन कॅक्टस’ या मोहिमेचा जन्म झाला.

मालदीवमधल्या एकूणएक टेलिफोन लाईन्स मात्र व्यवस्थित चालू होत्या. मग भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील मालदीवसंबंधी कामकाज पाहणारे जॉईंट सेक्रेटरी कुलदीप सहदेव आणि रोमन सेन हे तेंव्हापासून सतत निरनिराळ्या व्यक्तीशी फोनवर बोलण्यात गुंतले होते.

पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला सारे मंत्री आणि तीनही दलांचे प्रमुख हजर राहिले. त्या बैठकीत असे ठरले कि,

राष्ट्राध्यक्ष गयूम यांना मदत करण्यासाठी ताबडतोब सशस्त्र जवान पाठवावेत आणि यापुढच्या घडामोडींवर लक्ष ठेवून टप्प्याटप्प्याने कारवाई करत जाण्याचा प्रिन्सिपल सेक्रेटरी बी.जी देशमुख यांना आदेश देण्यात आला.

त्यावेळी सैन्याचे प्रमुख जनरल शर्मा हे होते. त्यांनी सुचवले कि, सैन्याची एक पॅरा ब्रिगेड विमानाने उतरावावी आणि प्रथम विमानतळ ताब्यात घ्यावा. म्हणजे मग पुढील सर्वं कारवाईसाठी एक सुरक्षित तळ आपल्याला लाभेल. पण तरीही शत्रूच्या संख्याबळाचा अद्याप नीट अंदाज न आल्याने ते विमानतळ नंतरही एक सुरक्षित तळ म्हणून वापरता येईल की नाही याबद्दल थोडी शंकाच होती.

जनरल शर्मा म्हणाले की, सर्व सैनिक विमानातून पॅराशुट ने खाली उतरतील, विमानतळाच्या दिशेने चाल करत जातील, व त्यांच्यावर हल्ला करून आपला कब्जा करतील. त्यावर राजीव गांधीं यांनी शर्मा यांना सांगितले कि,

“हे शक्य नाही. कारण त्या भागात विमानतळाशेजारी सर्वत्र दलदल आहे. म्हणून प्रथम नीट तिथल्या नकाशाचा अभ्यास करा”.

त्यानंतर कॅबिनेट सेक्रेटरीएटमध्ये एक बैठक बोलावली. सैन्याचे उपप्रमुख जनरल रोड्रिग्ज बैठकीला आले होते. त्यांनी माहिती दिली कि, सारे पॅराशूट पर सैनिक आग्र्याला गोळा होत असून ते दुपारपर्यंत निघतील.

त्यांना मालदीवला घेऊन जाण्यासाठी वायुदल तयारी करीत आहे. त्यांच्या विमानातून सैनिकांना नेले जाईल. दरम्यान आरमारला एक विमान माले शहराच्या विमानतळाकडे पाठवून त्याचे छायाचित्र घेण्यास सांगितली आहेत. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी परत एकदा फोन करून भीमा निघाली की नाही याची चौकशी केली. पण सैन्याने निघण्यासाठी बराच वेळ घेतला. शेवटी ती विमाने दुपारी तीन वाजता मालेला जाण्यासाठी निघाली.

या प्रदीर्घ मार्गावरती वाटेत पुन्हा एकदा इंधन भरून घेऊन ती विमाने रात्री साडेनऊ वाजता मालेला पोहोचली.

दुपारनंतर मालिकेमधील हल्लेखोरांना कळले की मालेकडे भारतीय सैनिक पाठवले जात आहेत. मग त्यांच्यात घबराट पसरली गेली. ते गोंधळून जाऊ लागले. एवढे समजूनही त्यांनी विमानतळावर कब्जा केला नाही. एका जहाजावर चढून त्यांनी आश्रय घेतला व मालेहून प्रयाण केले. मात्र जाता जाता त्यांनी 27 जणांना  त्यांच्याबरोबर ओलीस म्हणून नेले. ज्यावेळी भारतीय सिनेमाला पोहोचले तेव्हा हे जहाज सैन्याच्या माऱ्याच्या टप्प्या बाहेर निसटले होते.

हल्लेखोर जहाजातून वेगाने पळून जात होते त्या जहाजाचे नाव होते प्रोग्रेस लाईट.

मालदीवच्या आसपासच्या भागात त्यावेळी आयएनएस गोदावरी हे जहाज होते. त्यांना निरोप दिला गेला की त्यांनी ताबडतोब हल्लेखोरांच्या जहाजाचा पाठलाग करून त्यांना अडवावे. त्यानुसार ते जहाज पाठलागावर निघाले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे चार नोव्हेंबरला आरमाराचा टेहळणी करणाऱ्या हेलिकॉप्टरला हल्लेखोरांची जहाज दिसले. 5 नोव्हेंबरला आयएनएस गोदावरी जहाजाने शेवटी हल्लेखोरांचे जहाज गाठले. गाठून त्यांना शरण येण्याची सूचना केली, शरणागती पत्करली नाही तर तोफा डागल्या जातील असाही इशारा त्यांनी दिला.

शेवटी गोदावरी जहाजावरील 57 मि. मि व्यासाच्या तोफानळ्या व साडे 4 इंची बेटवा तोफा आग ओकू लागल्या. पण तरीही समोरच्या जहाजांकडून कसलीही प्रतिक्रिया होईना की प्रतिसाद येईना. मात्र इतके झाले तरी हल्लेखोरांची जहाज पाण्यातून पुढे चालले होते. ते थांबायला तयार नव्हते. एव्हाना संध्याकाळ झाली होती.

सेक्रेटरी यांनी ही स्थिती राजीव गांधी यांच्या कानावर घातली. कोणत्याही परिस्थितीत ते जहाज ताब्यात घेतले गेलेच पाहिजे यावर ते ठाम राहिले होते व त्यांनी तसे सेक्रेटरी यांना सांगितले.

पंतप्रधानांनी नौदलाला हुकूम देऊन हेलिकॉप्टर्स वापरण्यास सांगितली आणि त्या जहाजाच्या आसपास व पुढे सरकण्याचा मार्गावरती पानबुडी प्रतिबंधक पाणसुरुंग उडवावयास सांगितले. जेव्हा असे घडू लागले तेव्हा त्या हल्लेखोरांमधला मानसिक गोंधळ पराकोटीला गेला व त्याने शेवटी शरणागती पत्करायचा निर्णय घेतला.

नंतर आणखी एक कुतूहल वाढवणारी गोष्ट घडली. हल्लेखोरांचा मोरक्या लुथुफी ने सांगितले की, त्याच्या जवळचे सशस्त्र माणसे ही तामिळ ईलमच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पुरवलेली आहेत. त्यावेळी या तामिळ इलमला भारत आणि श्रीलंकेत पाठिंबा दिला होता पण लुथुफीचा हा दावा म्हणजे, मुद्दाम दिशाभूल करणारी एक चाल होती.

शेवटी ‘ऑपरेशन कॅक्टस’ मोहीम संपूर्णपणे यशस्वी झाली. त्यामुळे भारताची प्रतिष्ठा खूप वाढली. थोड्या वेळाच्या सूचनेनेही एक महत्वाची मोहीम यशस्वी करण्याइतपत भारताकडे कार्यक्षमता आहे हे यामुळे जगाच्या निदर्शनास आले.

अरबी समुद्राच्या त्या भागात भारताची एक जबरदस्त गस्त घालणारी सत्ता आहे, हे साऱ्या जगाने मान्य केले. मालदीवचे नागरिक तर कृतज्ञतेने भारावून गेले होते. त्यांना आता संकट प्रसंगीही आपल्याला सुरक्षितता लाभू शकते ही भावना जाणवली.

आणीबाणीची वेळ येताच आपल्याला भारताकडून चटकन व परिणामकारक मदत मिळते हेही त्यांना कळून चुकले. तसेच आपल्या आसपासच्या भागात वेळ पडता निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती कशी हाताळावी याचा अनुभव व ज्ञान भारतीय लष्कराला यातून मिळाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.