ॲापरेशन ककून : एका व्हिडीओमुळे वीरप्पनचा खातमा होवू शकला

भारतीय वन सेवेतले अधिकारी पी श्रीनिवासन. त्यांच काय झालं माहित आहे का? त्यांनी एकदा वीरप्पनला अटक केल होतं. अटकेतला वीरप्पन तेव्हा निसटला होता.

अशीच काही वर्ष गेली आणि श्रीनिवासन आणि वीरप्पन समोरासमोर आले. वीरप्पनने त्यांना मारुन टाकलं. हि क्रुरपणा इथेच थांबला नाही. त्यांच शीर धडावेगळ केल आणि त्यांच्या शीरासोबत फुटबॉल खेळला. 

वीरप्पन किती क्रुर होता हे सांगण्यासाठी के विजय कुमार यांनी आपल्या “चेंसिंग द ब्रिगाड” या पुस्तकात लिहलेली गोष्ट पुष्कळ आहे.

आपली लहान मुलगी रडतेय म्हणल्यानंतर तिचा खून करणारा बाप हा वीरप्पनच असू शकतो.

२००० हत्ती आणि १८४ लोकांना मारणाऱ्या वीरप्पनच्या नावावर आपल्या मुलीच्या खूनाचं देखील पाप होतं. 

जून २००१ ची गोष्ट.

वरिष्ठ IPS अधिकारी के विजयकुमार यांना जयललितांचा फोन आला.

फोनवरच त्यांना जयललितांना ऑर्डर दिली की,

तुम्हाला तामिळनाडुच्या स्पेशल टास्क फोर्सचे प्रमुख करण्यात येत आहे. चंदन तस्कर वीरप्पनचा त्रास वाढला आहे आणि तुम्हीच ती कारवाई पुर्ण करु शकता. आपणाला सकाळपर्यन्त ऑर्डर मिळतील.

फोन ठेवण्यात आला आणि इकडे के विजयकुमार नावाचा प्रचंड ताकदीचा माणूस वीरप्पनला पकडण्यासाठी तयार झाला. 

सर्वात प्रथम त्यांनी काय केलं तर आपली टिममधल्या सदस्यांची छोट्या छोट्या ग्रुपमध्ये विभागणी केली. जंगलात जात असताना मोठ्या प्रमाणात पोलीसांची तुकडी जात असे. त्यामुळे पोलीसांच्या कारवाईची योग्य टिप अचूक वेळत वीरप्पनला पोहचायची. याचा फायदा वीरप्पनला होतो हे लक्षात आल्यामुळे विजयकुमार यांनी आपल्या टिमला छोट्या छोट्या विभागात विभागलं. 

त्यानंतर त्यांनी वीरप्पनच्या बाबतीत असणारी एकन् एक माहिती काढण्यास सुरवात केली. एक एक करत त्यांनी त्याचे सर्व जुने ऑडिओ, व्हिडीओ क्लिप्स पाहण्यास सुरवात केली. जगात फेमस होण्याच्या नादात वीरप्पन आपले व्हिडीओ करुन ते मिडीयापर्यन्त पोहचवण्याचे उद्योग करत होता पण अशाच एका व्हिडीओवर नजर गेली ती के विजयकुमार यांची. 

वीरप्पन या व्हिडीओत कागदावर लिहलेला मजकूर वाचत होता.

त्यांनी तो व्हिडीओ पाहिला आणि लक्षात आलं की वीरप्पनला वाचताना एका डोळ्याने त्रास होतो. त्यांनी माहिती घ्यायला सुरवात केली तर त्याच्या एका डोळ्याला त्रास आहे हे पक्क झालं. पण जंगलात असल्यामुळे त्याला काहीच उपाय करता येत नव्हता.

वीरप्पनच्या पाठीमागे फिल्डींग लावून त्याला जंगलातून बाहेर आणण्याचा प्लॅन आखण्यात आला. त्यासाठी आत्ता विजयकुमार यांच्याकडे ठोस कारण होतं ते म्हणजे त्याच्या डोळ्यांच. प्रत्येक गोष्टीच्या मागे दोन तीन गृहितक असतात.

इथे असही सांगितल जात की,

प्रभाकरन आणि पोलीसांनीच रचलेल्या एक शस्त्रमाफियाची भेट घडवून देण्याच आमिष त्याला दाखवण्यात आलं होतं. वीरप्पन सापळ्यात अडकावा म्हणून वीरप्पनला काही AK 47 पोलीसांच्याच लोकांनी पाठवली होती. पण विजयकुमार मात्र आपल्या पुस्तकात डोळ्याच्या ऑपरेशनच्या निमित्ताने त्याला जंगलाच्या बाहेर आणण्यात आल्याच सांगतात. 

यासाठी पोलीसांच्या दोन अधिकाऱ्यांना त्याच्या टिममध्ये पाठवण्यात आलं होतं. विश्वास संपादन करण्याची हि कामगिरी वैल्लईदुरई आणि सरवनन यांनी संभाळली होती. त्या दोघांनीच वीरप्पनला डोळ्याच्या ऑपरेशनच्या निमित्ताने जंगलाच्या बाहेर काढण्याचा प्लॅन रचला होता.

त्यासाठी त्यांनी पोलीसांनी ओळखू नये म्हणून वीरप्पनला मिशा कापण्याचा सल्ला देखील दिलेला. 

ऑपरेशन ककूनची आखणी करण्यात आली. 

ठरल्याप्रमाणे १८ ऑक्टोंबर २००४ च्या रात्री एक अॅम्बुलन्स जंगलाच्या बाहेर पडली. त्यामध्ये वीरप्पन आणि त्याचे सहकारी बसले होते. पण हि अॅम्बुलन्स चालवण्याची जबाबदारी पोलीस असणाऱ्या सरवनन यांच्याकडे होती. त्यांच्या शेजारी वैल्लईदुरई बसले होते. 

जंगलाच्या बाहेर असणाऱ्या एका मोकळ्या ठिकाणी पोलीसांद्वारे ट्रॅप लावण्यात आला होता. सरवनन यांच्या कडे जबाबदारी होती की त्या ठिकाणी येताच अचानक जोराचे ब्रेक लावून गाडीतून बाहेर पडायचं.

रात्रीचे पावणे अकरा वाजत होते. ठरलेल्या स्पॉटवर गाडी येताच जोराचे ब्रेक लावले गेले. के. विजयकुमार आपल्या पुस्तकात लिहतात की, त्याने इतक्या जोरात ब्रेक लावले की त्यावेळी टायर जळलेला वास आला होता. गाडीतले सगळे पुढे फेकले गेले होते. इतक्यात ड्रायव्हर आणि त्यांच्या शेजारी बसलेले सरवनन आणि वैल्लईदुरई बाहेर पडले.

त्यांनी पोलीस टिमच्या दिशेने येत इशारा केला की वीरप्पन आत आहे. 

पोलीसांनी त्याला बाहेर येण्यास सांगितलं पण फायरिंग सुरू करण्यात आलं. पोलीसांनी देखील प्रतिउत्तर म्हणून फायरिंग केलं. टोटल ३३८ गोळ्या राऊंड करण्यात आल्या. विशेष म्हणजे यातील फक्त दोन गोळ्या वीरप्पनला लागल्या होत्या. ज्या डोळ्यांच ऑपरेशन करण्यासाठी तो बाहेर पडल्याच सांगितलं गेलं त्याच डोळ्यातून आरपार गोळी गेली. 

Screen Shot 2019 01 20 at 8.55.39 PM

के. विजयकुमार सांगतात,

“मी तेव्हा अम्मांना फोन करुन हि बातमी सांगितली तेव्हा अम्मा म्हणाल्या होत्या की मुख्यमंत्रीपदावर असताना याहून चांगली बातमी मी आजतागायत ऐकली नव्हती.”

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.