सर्व्हे अस सांगतो, अमेरिकेत महिलांमुळेच जास्त अपघात होतात. आणि भारतात ?
नुकतीच सौदी अरेबियाने महिलांना गाडी चालवण्याची परवानगी दिली. प्रथमत: त्यांच्यासारखच त्यांना लेट पण थेट अभिनंदन !!!
आत्ता मुद्दा असा की, हा देश महिलांना गाडी चालवण्याची परवानगी देणारा जगातील सर्वात शेवटचा देश ठरला आहे. त्यांच्या या निर्णयाची सोशल मिडीयाने दखल घेतली नसती तर नवल. मात्र या निर्णयामुळे झालं काय की, महिलांना गाडीच चालवता येत नाही. आत्ता अॅक्सिडेंट वाढतील. डावीकडे जाताना उजवा इंडिकेटर लावणार. भारतात महिलांच्या ड्रायव्हिंग स्किल बाबत अशा प्रतिक्रिया सारख्याच येतात तशा त्या जगभर देखील येतात. म्हणूनच अमेरिकेतल्या मिशीगन विद्यापीठाने केलेला एक सर्व्हे याठिकाणी देत आहोत.
मिशीगन विद्यापीठाने याबाबत २०११ साली एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता.
रिपोर्ट वाचण्यासाठी क्लिक करा – https://www.autoblog.com/2011/07/06/women-worse-drivers/
त्यामध्ये साधारण ६५ लाख अपघातांच विश्लेषण करण्यात आल होतं. या रिपोर्टनुसार २०.५ टक्के अपघात हे दोन्ही बाजूला महिला चालक असताना झाल्याची नोंद आढळली. महिला आणि पुरूष यांच्या अपघातांची टक्केवारी ४७.६ इतकी होती तर पुरूष पुरुष अशा अपघातांच प्रमाण ३२ टक्के इतकं होतं. हि आकडेवारी महिलांना गाडी चालवता येत नाही या वाक्याला समर्थन करणारी अशीच होती. कारण की ज्या ६५ लाख अपघातांच विश्लेषण करण्यात आलं होतं त्यापैकी २५ टक्के गाड्या महिला चालवत होत्या. या आकडेवारीनुसार महिलांकडून अपघात होण्याचं प्रमाण हे १५ टक्यांहून अधिक होतं.
म्हणजेच या अध्ययानानुसार महिलांना गाडी चालवता येत नाही अस सिद्ध होतं.
तरिदेखील हा रिपोर्ट सादर करणारे मायकल सिवाक यांनी हा निष्कर्ष नाकारला. त्याच मुख्य कारण त्यांनी वेगवेगळ्या कारणांद्वारे स्पष्ट केलं.
अभ्यासकांचा मुख्य मुद्दा होता तो हॅल्लो इफेक्ट या थेअरीवर. हॅल्लो इफेक्ट म्हणजे तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टी जशा प्रकारे प्रतिसाद देत राहतात त्याच गोष्टींप्रंमाणे तुम्ही उलट प्रतिसाद देवू लागतात. उदाहरणार्थ एखाद्या शाळेच्या मुलाला तू ढ आहेस अस लहानपणापासूनच म्हणत राहिलात तर तो त्याप्रमाणेच प्रतिसाद देतो व त्याला ढ म्हणनं हे त्याच्या अधोगतीच लक्षण ठरत. जगभरातल्या अध्ययनानंतर महिलांच्या गाडी चालवण्याच्या बाबतीत हाच हॅल्लो इफेक्ट सर्वात जास्त परिणाम करत असल्याच दिसून येत. साहजिक समाजाकडून सतत महिलांना गाडी चालवताच येवू शकत नाही या गोष्टींमुळे मानसिक खच्चीकरण होत असल्याच दिसून येत.
याबाबत सामाजिक शास्रांचा अभ्यास करणारे विचारवंत महिलांच्या गाडी चालवण्याच्या सवयीला पिढ्यानपिढ्या बदलत आलेल्या जैविक आणि सामाजिक बदलांमध्ये शोधतात. त्यांच्या मते महिलांची जी जडणघडण झाली आहे त्यामुळे महिला तितक्या सक्षमतेनं तात्काळ निर्णय घेवू शकत नाहीत. मानवाच्या इतिहासातील खूप मोठ्ठा काळ शिकार करण्यात गेला असल्याने तो काळ हा माणसाच्या विकासासाठी खूप मोठा प्रभाव पाडणारा ठरत असल्याचं सांगण्यात येत. याच काळात पुरूषांना बाहेर जावून शिकार करावी लागत असल्याने परस्थितीच आकलन करण्याची समज महिलांपेक्षा पुरषांच्यामध्ये अधिक असल्याने पुरूष समोरन येणाऱ्या गोष्टीच आकलन चटकन लावू शकतात तर दूसऱ्या बाजूला महिलांचा विकास हा एकाच वेळी अनेक काम कुशलतेकडे करुन जाणारा झाला आहे. महिलांची हिच सवय गाडी चालवण्याच्या बाबतीत घात करणारी ठरत असल्याचं दिसून येत. अनेक कामे एकाच वेळी करण्याची सवय महिलांना गाडी चालवताना एकाग्र ठेवण्यास उपयुक्त ठरत नसल्याचा दावा संशोधक करतात.
महिलांच्या गाडी चालवण्याच्या सवयीकडे देखील अभ्यासक लक्ष वेधतात. त्यांच्या मते महिला कधीच सोबत कोणी असेल तर गाडी चालवत नाही. गरजेच्या वेळी किंवा सोबत कोणी नसेल अशा वेळीच महिला गाडी चालवण्यास प्राधान्य देतात. आजही सोबत पुरूष असेल तर महिला त्या पुरुषांकडे गाडी चालवण्याची जबाबदारी देतात.
थोडक्यात महिलांमध्ये गाडी चालवण्याचा सराव हा खूपच कमी असल्याच दिसून येतच. आकडेवारीनुसार महिलां चालकांच्या अपघाताच प्रमाण हे सर्वात जास्त वळणांवरती झालेलं असून त्यावेळी गाडीचा वेग देखील मर्यादित असल्याच दिसून येत मात्र पुरूष चालकांच्या अपघाताचं प्रमाण हे जास्त वेगामुळे आणि दूरच्या प्रवासात झाल्याच दिसतं.
इतक्या साऱ्या कारणांमुळे हे विश्लेषण करणारे मायकल सिवाक महिला चालकांकडून होणाऱ्या अपघातांबाबत एक ठोस निष्कर्ष मांडत नाहीत. आत्ता सौदी अरब ने एक पाऊल पुढ टाकल आहे. अमेरिकेतल्या महिलांबाबतची माहिती आपल्या मिळालीच आहे, पण भारतातील महिलांबाबत काय मत आहे हे कोण सांगणार ?