या कारणामुळे ओशोंना ४८ तासात पुणे सोडण्यास सांगण्यात आलं होत.

मागच्या आठवड्याभरापासून एक बातमी सातत्यानं दिसतीये, ती पुण्याच्या ओशो आश्रमाची. आश्रमात ओशोंच्या भक्तांना आश्रमात प्रवेश नाकारला गेला आणि या सगळ्याची चर्चा झाली. ओशोंच्या भक्तांना हटवण्यासाठी लाठीचार्ज झाल्याच्याही बातम्या आल्या. आश्रमाकडे असलेले फंड आणि आश्रमाच्या जमिनीबाबत गैरव्यवहार होत असल्याचा भक्तांचा आरोप आहे.

सोबतच ओशोंचे पुण्यातील अस्तित्व हळूहळू मिटविण्याचे प्रयत्न चालू असल्याचे आरोप या भक्तांकडून केले जात आहेत. पुण्यातील प्रतिष्ठित व उच्चभ्रू समजल्या जात असणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये वसलेल्या ओशो आश्रमावर आलेलं हे पहिलं संकट नाही.

असाच एक किस्सा ओशो असताना देखील घडला होता. 

आचार्य रजनीश म्हणजेच ओशो. स्वइच्छा, स्वातंत्र्य अशा गोष्टींचा पुरस्कार करणारे ओशो. आज ओशोंचे जगभरात शिष्य आहेत. ही घटना घडली तेव्हा देखील ओशोंचे शिष्य जगभरात होते. मोकळीकता, स्वातंत्र आणि त्यातून सेक्स आणि अंमली पदार्थांचे सेवक असा आरोप ओशोंच्या शिष्यांवर लावता जात होता. भारतात तेव्हा या गोष्टींना आजच्या इतकं मुक्त वातावरण नव्हतं.

किस्सा घडला होता तो १९८६ साली.

ओशो तेव्हा आपल्या आश्रमासाठी मुंबईत जागा शोधत होते पण मुंबई हवी तशी जागा न मिळाल्याने त्यांचा मुक्काम पुण्यात होता. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे असणाऱ्या आश्रमात जगभरातून शिष्यगण येत असत. तिथे गोळा होवून ते अंमली पदार्थांचे सेवन करत, मोकळीकतेच्या नावाखाली अश्लिल चाळे संपुर्ण कोरेगावपार्क मध्ये होत असत.

याच गोष्टींची तक्रार पुण्याचे पोलिस कमिश्नर यांच्यापर्यन्त पोहचत असत पण ओशो यांच्यावर कारवाई करण्याची गरज कोणत्याच अधिकाऱ्यांना वाटली नव्हती. १९८६ साली ओशो पुण्यातल्या कोरेगाव आश्रमात रहायला आले होते. तेव्हा पुण्याचे कमिश्नर होते बी.जे. मिसर.

बि.जे. मिसर यांनी आश्रमात होणारा गैरप्रकार, आश्रमातून बाहेर पडणारे परकिय नागरिक व त्यांचा व्यभिचार पाहून थेट ओशोंना ४८ तासात पुणे सोडून जाण्याचे आदेश काढले. या आदेशामुळे ओशोंच्या शिष्यगणांमध्ये हाहाकार उडाला. ओशोंचे शिष्य कोर्टामध्ये गेले.

कोर्टाने देखील तात्काळ आदेश देत ओशोंना तीन महिन्याची मुदत द्यावी अशी पोलिसांना आदेश दिली.

पोलिस कमिश्नर बी.जे. मिसर यांनी सांगितलं की जर आश्रमात असणारे लोकं बाहेर पडतील तेव्हा भारतीय संस्कृती आणि मर्यादेच भान जपलं तर अशी कोणतीच कारवाई ओशोंवर करण्याची गरज नाही. ओशोंनी देखील त्यांची मागणी मान्य केली. आश्रम बंदिस्त झाला. आणि ओशो पुण्यातच राहू लागले.

ओशोंचे आश्रम वाचवण्यात त्यांच्या भक्तांचा विजय झाला होता.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.