कॉंग्रेस तिकीट विकायचं, ते नरसिंहराव यांच्यावर सोनिया पाळत ठेवायच्या : अल्वांचे ते ५ आरोप

राष्ट्रपती निवडणुकीबरोबरच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सुद्धा जाहीर झाली. या निवडणुकीत विरोधी पक्षाने काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. मार्गारेट अल्वा घोषणा राजकीय वर्तुळात तशी धक्कादायकच होती.

कारण सध्याच्या हिंदुत्ववादी राजकारणात थेट कॅथलिक ख्रिश्चन असलेल्या मार्गारेट अल्वा यांच्या नावाची निवड करणे जितके धाडसाचे आहे. त्यापेक्षाही मार्गारेट अल्वा यांनी काँग्रेस नेतृत्वाविरोधात वेळोवेळी घेतलेल्या भूमिका आणि जाहीर केलेले अनेक गुप्त खुलासे पचवणे धाडसाचे आहे.

मार्गारेट अल्वा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात काँग्रेसमध्ये घडलेल्या अनेक घटनांना जाहीरपणे उघड केलं होतं. मार्गारेट अल्वांनी उघड केलेले वादळी किस्से नेमके कोणते होते आणि कोणाच्या बाबतीत होते जाणून घेऊयात..

‘करेज अँड कमिटमेंट’ अन ऑटोग्रॉफी ऑफ मार्गारेट अल्वा..

धाडस आणि कमिटमेंटसोबत असलेल्या स्पष्टवक्तेपणाच्या आधारावर मार्गारेट अल्वांनी आयुष्य जगलंय. त्यांनी स्वतःच्या राजकीय जीवनात इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी व्ही नरसिम्हा राव आणि मनमोहन सिंग यांसारखे काँग्रेसचे चार दिग्गज पंतप्रधान पहिले आहेत.

त्यांचे संजय गांधींबरोबर झालेले भांडण, १९७९ मध्ये त्यांची काँग्रेस पक्षातून झालेली हकालपट्टी, राजीव गांधींच्या शेवटच्या प्रचार दौऱ्यातील त्यांची भूमिका आणि काँग्रेसमध्ये वारंवार उडलेले खटके आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या आठ राज्यांच्या प्रभारी पदावरून २००८ मध्ये राजीनामा देईपर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकलाय.

मार्गारेट अल्वा यांनी आपल्या आत्मचरित्रात इंदिरा गांधींपासून संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, पी व्ही नरसिम्हा राव ते मनमोहन सिंगांपर्यंत बरेचसे राजकीय खुलासे केले आहेत. 

नरसिम्हा राव आणि सोनिया गांधी एकमेकांवर पळत ठेवत होते..

राजीव गांधींच्या मृत्युनंतर सोनिया गांधींनी नरसिम्हा रावांना प्रश्न विचारला होता. जर मी तुमची मुलगी असती तर तुम्ही मला राजकारणात येण्याचा सल्ला दिला असता का? तेव्हा सोनिया गांधींच्या या प्रश्नावर नरसिम्हा रावांनी “मुळीच नाही” असं उत्तर दिलं होतं.

राव यांच्या उत्तरावरून सोनिया गांधी आणि नरसिम्हा रावांमध्ये किती विश्वास होता हे दिसते. परंतु एकमेकांवर एवढा विश्वास असतांना सोनिया गांधी आणि नरसिम्हा राव एकमेकांवर पळत का ठेवत होते. 

अल्वा यांनी याची काही करणे दिली आहेत. नरसिम्हा राव यांनी राजीव गांधींवरील बोफोर्स खटला रद्द करण्याच्या आदेशाविरुद्ध याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयातुन राव यांनी राजीव गांधींच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे सोनिया गांधींना नरसिम्हा राव यांच्यावर संशय आला होता. त्यामुळे सोनिया गांधींनी नरसिम्हा रावांवर पळत ठेवली होती.

तर विनय सीतापती यांनी आपल्या ‘हाफ लायन’ या नरसिम्हा रावांवर लिहिलेल्या पुस्तकात सोनिया गांधी आणि राव यांनी एकमेकांवर पळत ठेवण्याचे कारण सांगितले आहे कि, बाबरी मस्जिदीच्या विध्वंसानंतर राव सरकारवर टीका करण्यात आली होती. या विरोधकांमध्ये सोनिया गांधी सुद्धा समाविष्ट होत्या.

तेव्हा सोनिया गांधींच्या भेटीला जाणाऱ्या नेत्यांवर पळत ठेवण्याचे आदेश नरसिम्हा रावांनी इंटेलिजन्स ब्युरोला दिले होते ते सांगितले आहे.  

मार्गारेट यांनी आपल्या आत्मचरित्रात हे सुद्धा सांगितले आहे कि, मार्गारेट यांच्या काळापर्यंत काँग्रेसच्या ऑफिस मध्ये नरसिम्हा रावांचा फोटो सुद्धा नव्हता. एखाद्याच्या मृत्यनंतर तुम्ही त्यांच्याशी असे वागू नका असेही मार्गारेट यांनी म्हटलंय. 

सोनिया गांधी काँग्रेस पक्षाला मनमानी पद्धतीने चालवत होत्या..

मनमोहन सिंग यांना रिमोटवर चालणारे पंतप्रधान म्हटले जाते. तर मनमोहन सिंगांना चालवणारा रिमोट सोनिया गांधींच्या हातात होता असेही सांगितले जाते. मात्र ही गोष्ट मार्गारेट अल्वा यांनी सुद्धा आपल्या आत्मचरित्रात सुद्धा असंगीतली आहे.

मार्गारेट अल्वा या मंत्रिमंडळात हव्या अशी मनमोहन सिंगांची इच्छा होती. ही इच्छा मनमोहन सिंगांनी सोनिया गांधी आणि मार्गारेट अल्वा यांना बोलून दाखवली मात्र  सोनिया गांधींनी याविरुद्ध जाऊन मार्गारेट अल्वा यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात समाविष्ट केले नाही.

सोनिया  गांधींनी मार्गारेट अल्वा यांना मंत्रिमंडळात समाविष्ट तर केलं नाहीच सोबतच मार्गारेट अल्वा यांना साधा फोन कॉल न करता किंवा कोणतीही विचारपूस न करता थेट राज्यपाल बनवून टाकलं होतं. यावरून सोनिया गांधी आपल्या मनमर्जीने काँग्रेसमधील निर्णय घेत होत्या असे मार्गारेट अल्वा यांनी काबुल केले आहे.

इंदिरा गांधी, संजय गांधी आणि सीपीएन सिंगांचे वोलफॅग मिशेलबरोबर संबंध होते..

युपीए-१ च्या काळात ३६०० हजार कोटीचा ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटला झाला होता. या घोटाळ्यात ३६० कोटींची लाच घेतली गेल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर सरकारकडून हा सौदा रद्द करण्यात आला होता. 

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणात कुप्रसिद्ध झालेला दलाल ख्रिश्चन मिशेलच्या वडिलांबरोबर म्हणजेच वोलफॅग मिशेलबरोबर इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि तत्कालीन संरक्षण उत्पादन मंत्री सी पी एन सिंग यांचे संबंध होते.  

अल्वा यांनी पुढे सांगितले आहे कि, १९८० मध्ये वोलफॅग मिशेल यांच्या मध्यस्थीने राजीव गांधी आणि सी पी एन सिंग यांनी अनेक जुने पॅटन टॅंक दक्षिण आफ्रिकेला विकण्यात आले होते. 

मुंबई बंदरातून टॅंक कॅनडाला पाठवण्यासाठी लोड केले जायचे आणि आफ्रिकेच्या बंदरावर उतरवले जायचे. अशी माहिती एका लष्करी अधिकाऱ्याने आपल्याला दिली होती असे मार्गारेट अल्वा यांनी सांगितले आहे.

आणीबाणीच्या काळात संजय गांधींनी केलेल्या अत्याचारांना इंदिरा गांधींची मान्यता होती..

आणीबाणीच्या काळात संजय गांधींनी दिल्लीतील झोपडपट्ट्यांवर बुलडोजर चालवले होते. यात अनेक घरं उध्वस्त करण्यात आली होती. १९ एप्रिल १९७६ रोजी तुर्कमान गेटवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठ्या चालवल्या होत्या आणि गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार लोकांचा मृत्यू झाला होता. 

जेव्हा मार्गारेट अल्वा ही तुर्कमान गेटची गोष्ट इंदिरा गांधींना सांगण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा इंदिरा गांधी यांनी अल्वा यांना म्हटलं कि, “काही कठोर निर्णय घ्यावे लागतात.”

यावरून संजय गांधींनी केलेल्या अत्याचारांना इंदिरा गांधींचा पाठिंबा होता असे अल्वा यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितले आहे.

२००८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकिटं विकली होती..

२००८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मार्गारेट अल्वा यांचा मुलगा निवेदित अल्वा यांना काँग्रेसने तिकीट नाकारले होते. निवेदिता अल्वा हा मार्गारेट अल्वा यांचा मुलगा असल्याने निवेदित अल्वा यांना काँग्रेसने तिकीट नाकारले होते.

या निवडणुकीत मार्गारेट अल्व यांनी काँग्रेसने तिकिटं विकली आहेत त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला आहे अशी भूमिका मार्गारेट अल्वा यांनी घेतली होती. 

अल्वांच्या या भूमिकेमुळे ऑल इंडिया काँग्रेस कमेटीच्या आठ राज्यांच्या प्रमुख पदावरून त्यांना काढून टाकण्यात आले होते. असेही अल्वा यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितले आहे. 

मार्गारेट अल्वा यांच्या ‘करेज अँड कमिटमेंट’ अन ऑटोग्रॉफी ऑफ मार्गारेट अल्वा या आत्मचरित्रात त्यांनी बऱ्याच गोष्टी उघड केल्या आहेत. परंतु धाडसी आणि स्पष्टवक्त्या असलेल्या मार्गारेट अल्वा यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी घोषित करून काँग्रेसने मोठे धाडस दाखवले आहे..

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.