युपीत धर्मांतर कायद्यानुसार लव जिहाद प्रकरणात मुस्लीम तरुणाला ५ वर्षांची शिक्षा.. 

उत्तरप्रदेशात धर्मांतर कायद्यानुसार कोर्टाने लव जिहादच्या प्रकरणात एका मुस्लिम तरुणाला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच ४० हजार रुपयांचा दंड देखील ठोठवण्यात आला आहे. भारतात पहिल्यांदा एका व्यक्तीला धर्मांतर कायद्यानुसार शिक्षा झाली असल्याने देशभर या प्रकरणाची चर्चा आहे.. 

काय आहे नेमकं प्रकरण.. 

युपीतलं हे प्रकरण लव जिहादशी संबंधित असल्याचं सांगण्यात येतय. युपीतल्या अमरोहा येथील आरोपी आपला धर्म लपवून अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्याच्या प्रयत्नात होता. 

अमरोहा येथील हसनपुर पोलीस ठाण्यात ही केस दाखल करण्यात आली होती. अफजल नावाचा मुस्लीम युवक अरमान कोहली अस हिंदू नाव घेवून अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्याच्या प्रयत्नात होता. अल्पवयीन मुलीसोबत त्याचे प्रेमसंबध होते मात्र त्याने मुलीचं उपहरण करून लग्न करण्याचा प्रयत्न केल्याचं गुन्हा त्याच्यावर नोंद करण्यात आला होता. 

हसनपूर-गजरौला रोडवर पिडीत अल्पवयीन तरुणीच्या वडिलांची नर्सरी होती. मार्च 2021 मध्ये या नर्सरी मालकांनी आपल्या गाडीवर एका तरुणाला ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवलं होतं. हा तरुण संभल जिल्ह्यातील हयातनगर इथे राहणारा होता व त्याचं नाव मोहम्मद अफजल असल्याचं सांगण्यात आलं.

मात्र या मुलाची आणि नर्सरी मालकाच्या मुलीची ओळख झाल्यानंतर संबधित तरुणाने या मुलीला आपलं नाव अरमान कोहली असून आपण हिंदू असल्याचं सांगितलं..त्यानंतर ओळख व ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.. 

आरोपपत्रात सांगण्यात आलय की एप्रिल 2021 मध्ये नर्सरी मालकाच्या मुलीचे अपहरण लग्नाच्या हेतून करण्यात आलं. लग्नासाठी पळवून नेत असताना संबधित मुलगी अल्पवयीन होती तसेच त्या मुलीला संबंधित आरोपीने आपण हिंदू असल्याचं सांगितलं होतं. संबधित आरोपीने मुलीचं अपहरण केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर उस्मानपुर येथून पिडीत मुलगी व आरोपीला अटक करण्यात आली.

चौकशीमध्ये मुलीने आपल्यासोबत छेडछाड झाल्याची तसेच धर्म लपवून ठेवल्याचा जबाब दिला या आधारावर आरोपीवर धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्याध्येश 2020 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. दिड वर्ष कोर्टात सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने आरोपीस ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे..  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.