लाल किल्ला नव्हे लालकोट जगातल्या बऱ्याच गोष्टींवर हिंदुत्ववाद्यांचा दावा आहे..

ताजमहाल नव्हे तर तेजोमहाल, कुतुबमिनार नव्हे तर विष्णूस्तंभ, ज्ञानवापी मशीद नाही तर विश्वेश्वराचं मंदिर आहे असे अनेक दावे आणि त्याच्या बातम्या वाद हेच कानावर पडतंय.

मुस्लिमांनी या वास्तू बांधल्या नसून मुळात त्या हिंदूंनी बांधलेल्या वास्तु आहेत असे दावे करून त्याचे नामांतर करावे अशी मागणी सर्वच स्तरातून होतेय.  पण या सगळ्या वास्तूंबाबत दावे केलेला व्यक्ती म्हणजे पु.ना. ओक. 

पुरुषोत्तम नागेश ओक या नावाने त्यांना काहीच जन ओळखत असतील पण पु.ना. ओक म्हटल्यावर लगेचच त्यांनी केलेलं दावे आठवत असतात.

पु.ना.ओक यांचे दावे म्हणजे ख्रिश्चानिटी ही कृष्ण-नीति आहे, व्हॅटिकन सिटी ही वाटिका आहे, मिरजेचा मिरासाहेब दर्गा म्हणजे मयूरेश्वरी मंदिर, कोल्हापूरचा बाबू जमाल दर्गा म्हणजे बाबूजी का महाल , पुण्यातील दाता पीर म्हणजे दत्ताचे मंदिर असे अनेक दावे त्यांनी करून ठेवले आहेत.

इतकंच नाही तर याशिवाय त्यांनी आणखी काही गंभीर दावे देखील केले आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने बघूया…

१) ऐतिहासिक स्थापत्य हिंदू आहे इस्लामी नव्हे.

पी.एन ओक अशी थेअरी मांडतात की, गेल्या सुमारे शंभर ते दोनशे वर्षांच्या आंग्ल सद्दित भारतातील बहुतेक प्रेक्षणीय ऐतिहासिक इमारती या मुसलमानांनी तयार केल्यात अशी समजूत करून देण्यात आली आहे. 

मोंगली स्थापत्य हा शब्दप्रयोगच चूक आहे कारण भारतात मोंगल स्थापत्य कधी नव्हतेच. मोंगल स्थापत्यात पाश्चिमात्य देशांची कला न दिसता उलट हिंदू कलेच अस्तित्व दिसते. 

हा निष्कर्ष निव्वळ ऐतिहासिक नोंदी मधूनच सिद्ध होतो असं नाही तर प्रत्यक्ष इमारतींच्या निरीक्षणातून तोच निष्कर्ष निघतो असंही ओक म्हणतात.

भारतीय इस्लामी स्थापत्य शैलीचे फर्ग्युसन या आंग्ल लेखकाच्या संदर्भानुसार, अहमदाबाद आणि गुजरातेतील जामा मशिदी, त्यांची रुपरेखा, त्यातील बारकावे स्पष्टपणे हिंदू  व जैन शैलीच्या आहेत. तसेच ताजमहाल, विजापूरातील भव्य इमारतींचा उगम भारतीय कलेतून झालेला आहे.

दिल्ली लुटणाऱ्या तैमूरलंग या भयानक हल्लेखोरानेदेखील त्याच्या ग्रंथांमध्ये अशी कबुली नोंदवलेली आहे की, ही मध्ययुगीन मुसलमानांमध्ये बांधकामाचे खूप अज्ञान होतं. त्यांना हिंदुस्तानात आहेत तशाच भव्य भक्कम सुंदर इमारती इस्लामी प्रदेशातही बांधण्यासाठी बळजबरीने नेण्यात येई.

हिंदुस्थानातील उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत चे सारे ऐतिहासिक बांधकाम हिंदू शैलीचे आहे. हा EB Havell यांनी मांडलेले सिद्धांत शंभर टक्के बरोबर आहेत. जगभरातील ऐतिहासिक इमारतींची आणि बांधकामाची शैली हिंदू वैदिक पद्धतीचीच, शिवाय या इमारती पूर्वी हिंदूंच्याच होत्या.

इस्लामची एक विशिष्ट स्थापत्यशैली असल्याची कल्पना भ्रामक आहे. इस्लामची स्थापनाच मुळी अवघ्या १३७० वर्षांमधील आहे. भारतातील निर्माण झालेली स्थापत्यशैली ही मोंगली शासन सुरू होण्यापूर्वीच भारतात अतिउत्कृष्ट पदाला पोहोचली होती. 

त्यात मेजर जनरल अलेक्झांडर कनिंगहॅम या नवनियुक्त प्रथम ब्रिटिश पुरातत्त्वीय अधिकाऱ्याने सन १८६१ मध्ये भारतातील अनेक प्राचीन नगरे वाडे, किल्ले, महाल, इत्यादी इमारतींचं पुरातत्त्वीय दप्तरात नोंदवून अमुक मुघलांची कबर, अमुक मशीद अशी खोटीच नोंद करून ठेवली. तसेच इमारतींच्या भिंतींवर इस्लामी मजकूर कोरला गेल्याने ते बांधकाम त्यांचेच आहे असा समज रूढ झाला. 

२) येशू ख्रिस्त काल्पनिक व्यक्ती होती

ओक त्यांच्या थिअरीत लिहितात कि, जिजस ख्रिस्त नावाचा कोणी धर्मोपदेशक होता ही रूढ कल्पना आहे. 

सम्राट कॉन्स्टन्टाईन जेंव्हा सन ३१२ पासून इवल्याशा ईसाई गटाशी संगनमन करू लागला तेव्हापासून त्याने जीजस ख्रिस्त नावाचा एक थोर धर्मोपदेशक होता, तो अमक्या ठिकाणी जन्मला, अमक्या ठिकाणी खिळे ठोकून त्याला मारलं, अमक्या ठिकाणी पुरलं इत्यादी सगळ्या काल्पनिक आणि खोट्या कहाण्या पसरवयाला मदत केली. 

तो एका मोठ्या साम्राज्याचा अधिपती असल्याने त्याने पसरवलेल्या खोट्या घटनांमधे जे जे ठिकाणं सांगितले त्या ठिकाणांवर सरकारी शिक्कामोर्तब होत गेला. त्यानंतर पिढ्यानपिढ्या साऱ्या जनतेला तेच घोकावे लागले.

त्या थापा पसरवण्यात ईसाई नोकर वर्गामुळे भर पडत होती आणि अधिकार, संपत्ती यांची रेलचेल वाढत होती. लेखक, मुद्रक, प्रकाशक, साहित्य विक्रेते, धर्मप्रचारक, मठाधिपती अशा विविध प्रकारे ईसाई जो तो आपापल्या स्वार्थ साधत होता.ईसाई पंथाच्या प्रसारात आपले हात धुऊन घेत होता. तेव्हापासून आजतागायत जगात ईसाई धर्म प्रचार होत असतो. 

ख्रिस्त नावाची कोणी व्यक्तीस नव्हतीच असे सांगणारे साहित्य आहे ते फारसे कोणाच्या हाती लागू नये याचे प्रयत्न यूरोपात खूप झाले. लंडन युनिव्हर्सिटीमध्ये जर्मन भाषा शिकवणारे G.A Wells नावाच्या प्रोफेसरने त्याच्या Did Jesus Exist ? या पुस्तकात अनेक ग्रंथांच्या आधारे ख्रिस्त नावाची कुणी व्यक्ती कधी नव्हतीच असा उदाहरणासकट निष्कर्ष काढला आहे.

३) ख्रिश्चनॅटी म्हणजेच कृष्णनीती

पी. एन ओक म्हणतात ख्रिश्चनॅटी म्हणजेच कृष्णनीती आहे आणि याची खात्री सामान्य माणसालाही पटेल अशी भरपूर उदाहरणे उपलब्ध आहे ती अशी,

१) Jesus Christ हा विचारच मुळी Iesus Chrisn (ईशस् कृष्ण) या संस्कृत नावाचा अपभ्रंश आहे. हिंदुस्तानात असे वचन-बचन, योगी- जोगी असे भिन्न विचार रूढ आहेत. तसे ग्रीस आणि इटलीमध्ये मुळ i अक्षर लिहून iesus chrisn म्हणण्याची प्रथा प्राचीन काळी रूढ होती. पुढे j हे अक्षर i सारखेच असल्याने ते j असेच लिहिले जाऊ लागले. आजतागायत ही पद्धत रूढ आहे. तसेच कृष्णा चे उच्चार कृष्ट असा भारतात बंगाली आणि कानडी लोक करतात तसाच युरोपातही करीत. 

२) येशूचा बालपणीच्या कथा पुष्कळशा कृष्णाच्या बालपणी सारख्याच आहेत.

३) येशूचा जन्म कोणत्या वर्षी झाला हेही कोणाला माहित नाही. इसवीसन प्रारंभ कोणत्यातरी एका दिवशी गृहीत धरून आत्ताच जी १९९२ वर्षे उलटून गेली असे मानतात. येशु केव्हातरी जन्मला आला  असलच पाहिजे असे गृहीत धरून ती अनुमाने केली गेली.

४) येशूच्या जन्माचा वार आणि तारीख माहीत नाही डिसेंबर २५ हा त्यांचा जन्मदिन गृहीत धरून सध्या क्रिसमस म्हणून साजरा केला जातो. तो मुळात सूर्याचे उत्तरायण आरंभ झाल्याचा वैदिक उत्सव आहे. येशू ख्रिस्ताचा जन्माचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

५) येशूच्या जन्माची वेळ जी मध्यरात्री समजली गेली आहे ती सुद्धा उत्तरायण उत्सवाची आणि  श्रीकृष्णाच्या जन्मवेळेची आहे. म्हणून रात्री बारा वाजता २५ डिसेंबरला घंटा बडवून जो ख्रिसमस साजरा केला जातो तो पूर्वापार वैदिक कृष्णमासाचा उत्सव आहे.

 ४) जुनी दिल्ली पांडवांनी वसवली

अशा थापा मारल्या जातात कि, जुनी दिल्ली नगर हे पाचवा मोगल बादशहा शहाजहान ह्याने वसवली. त्याने केवळ त्या प्राचीन नगरीचे ‘शहाजहानाबाद’ असे इस्लामी नामकरण केले. 

दिल्ली हा देहली म्हणजेच उंबरठा ह्या अर्थाचा संस्कृत शब्द आहे. पांडवाच्या काळी या नगरास इंद्रप्रस्थ म्हणत. दिल्लीच्या जवळील मेरठ या नावाच्या नगरात हस्तिनापूर ह्या प्राचीन नगराचे अवशेष सापडतात. 

जुन्या दिल्लीच्या कोटाबाहेर सुमारे एक मैल अंतरावर पुराना किल्ला म्हणून होणारा एक भव्य कोट आहे. त्याच्या आत एक- दोन प्राचीन इमारती वगळता काहीही अवशेष उरले नाहीत.  त्याला पांडवांचा किल्ला हेच परंपरागत नाव आहे त्यावरून पुराना किल्ला हा जसा प्राचीनतम दुर्ग आहे हे सर्वजण म्हणतात त्याचप्रमाणे पुरानी दिल्ली हे ही जुन्यात जुनी म्हणजे पांडवकालीन असली पाहिजे असा दावा पी.एन ओक करतात.

५) दिल्लीचा लाल किल्ला हिंदू लालकोट आहे

सुरुवातीपासूनच असा समज करून दिला गेलेला असतो की १६२८ पासून सुमारे तीस वर्ष राज्य केलेल्या शहाजहानने दिल्लीचा लाल किल्ला तयार करवला.

लाल कोट म्हणजे रेड फोर्ट या नावाची वास्तू यमुनेच्या काठी चांदणी चौकाच्या पूर्वेला आहे. लाल कोट हा त्याच्या नावानुसार किल्ला नसून राजप्रसाद आहे. पृथ्वीराज चौहाणांचा आजोबा राजा अनंगपालने यमुनेच्या काठी तो राजप्रसाद म्हणून बांधला. त्यात अनेक अन्य स्वतंत्र महालही आहेत. रंगमहाल, शीशमहाल, तेजो महाल, राजमहाल, मोती मंदिर, छोटा रंगमहाल, श्रावण महाल, भाद्रपद महाल इत्यादी.

वरील नावांवरून हा किल्ला मूळचा हिंदूंचा असला पाहिजे. एकही इस्लामी देशात महाल हा शब्द ऐकू येत नाही.  

लाल किल्ल्यात दिवाण- ए आम हे नाव जा मंडपास देण्यात येते तो जनम महाल उर्फ जनमंडप होता. त्याच्यापुढे जी मोकळी जागा आहे त्याला अजून गुलालवाडी म्हणतात कारण तिथे हिंदू सम्राटाच्या भेटीला येणाऱ्यांना गुलाल, अत्तर लावून त्यांचं स्वागत करण्यात यायचं.

प्रत्येक किल्ल्यात, वाड्यात शिशमहाल असणे हे प्राचीन हिंदू प्रथा आहे. 

दिल्लीच्या लाल किल्ल्यातील विविध महालात आडवे, तिरपी असे फारसी लिपीतील शिलालेख पोचलेले आहेत. यमुनेच्या किनार्‍याकडे उघडणाऱ्या एका मध्यवर्ती भागात फारसी भाषेत शिलालेखात आहे ज्यात कोणत्याही मुसलमानाने हा लाल किल्ला तयार केल्याचा उल्लेख नाही. 

दिल्लीच्या लाल किल्ल्यात दिवाण-इ-खास नाव असलेली इमारत हिंदू काळात मंत्र्यांना भेटण्याचा राजाचा महाल होता. एखाद्या इमारतीच्या जो खरा निर्माता असतो तो फार तरफार ती इमारत केंव्हा बांधली? कधी आणि कोणी आणि कोणत्या उद्देशाने बांधली? किती खर्चात बांधली? असा मुद्देसूद मजकूर लिहिलेला असतो. 

पण त्या लाल किल्ल्यावर असं काहीही नाहीये. लाल किल्ल्यात सिंहासनाच्या बाजूला दोन तलवारी आहेत. तलवारीवर शंख आहे दोन्ही बाजूला ओंम असं कोरलेलं आहे. शंख, ओम, कमळ, ही चिन्हे इस्लामी नसतात. 

लाल किल्ला मुळात हजारो वर्षांपूर्वी बांधला तेव्हा यमुनेच्या प्रवाहास लागून तो बांधला गेला. हा हिंदुत्वाचा फार मोठा पुरावा आहे. किल्ल्याच्या मागच्या घाटाचा उपयोग हिंदू राजघराण्यातील व्यक्तींना स्नान आणि संध्या करण्यासाठी बांधला गेला होताच.

एवढे सगळे पुरावे असताना देखील गेली शंभर ते दीडशे वर्ष झालीत. लाल किल्ला आणि जुनी दिल्ली नगर हे शहाजहानने निर्माण केली असे सांगत आणि लिहीत आले आहे

६) दिल्लीची जामामशीद हिंदू मंदिर होती.

पाचवा मोगल बादशहा शहाजहान ह्याच्या शासनकाळात त्याने ताजमहाल जामा मजीत लाल किल्ला या प्रसिद्ध इमारती उभारल्या हे धादांत खोटे विधान आहे.

जामा मशिदीची निरीक्षण केलं तर त्याच्या उंच उंच चौथर्‍यात एक मजला आहे पण तो सगळीकडून चिणून बंद करण्यात आलेला आहे. मशिदीतील तिन्ही बाजूंचे निरीक्षण करताच लक्षात येतं. त्यात पुरुषभर उंचीच्या कमानी कमानी असून त्या पांढऱ्या दगडी शिळांनी बंद करण्यात आल्या त्या तीन दिशांना जी भव्य द्वारे आहेत ती केशरी दगडांची असून शिवाय अष्टकोनी आहेत ही दोन्ही हिंदू वैशिष्ट्ये आहेत. 

तैमूरलंग त्याच्या शासन काळात या इमारतीला जामा मशीद म्हणतो तीच त्याच्या २३० वर्षानंतर त्याचा वंशज शहाजहान हा मोगल बादशहा कसा काय बांधील? तैमूरलंगाच्या काळातही ती इमारत होती त्यात काफिर म्हणजेच हिंदू बंदी करून तैमूरलंग आक्रमक इस्लामी सैन्याला तोंड देत होते.

याच काही पुराव्यांवरून जुन्या दिल्लीतील जामा मशीद म्हणणारी इमारत हे शहाजहानच्या शेकडो वर्ष आधीचे हिंदूंचे भव्य मंदिर असल्याचं सिद्ध होतं.

त्यामुळे ते इमारतीत मुसलमानांचा नमाज पडणे बंद व्हावं आणि पुरातत्व खात्याला त्या इमारतीतील खालचे दोन मजले उघडून त्यातील ऐतिहासिक पुराव्याचा शोध घ्यायला भाग पाडा व अशा विविध मागण्यांची फिर्याद करणे आवश्यक असल्याचं ओक म्हणतात.

७) कुतुबमिनार नव्हे ब्रम्हस्तंभ, विष्णूस्तंभ

कुतुबमिनार जवळ आजही एक शिलालेख आहे.  कुतुबमिनारची उभारणी करताना २७ हिंदू व जैन मंंदिरे पाडून टाकल्याचा दावा याच परिसरातील एका शिलालेखाच्या व काही मूर्तींच्या आधारे केला जातो. या परिसरातील कुव्वत- उल-इस्लाम मशिदीच्या भिंतींना लागूनच काही गणेशमूर्ती आजही दिसतात त्याचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी केली जातेय.

हे सगळे दावे आणि त्यासोबतच संदर्भ पाहिल्यास कुठंतरी खरे वाटतात नाही तर निव्वळ कल्पनाविसर वाटतो. बाकी तुम्हाला काय वाटतं? आणखी कोणते दावे तुम्हाला जाणून घ्यायचेत?  ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

हे ही वाच भिडू:

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.