धोक्याची घंटा, पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांना LOC मध्ये एन्ट्री करण्याची परमिशन देतयं

जम्मू- काश्मीर मिळवण्याच्या लालसेपायी पाकिस्तान सतत कुरघोड्या करतंच असतं. भारताकडून शांततेत सांगून झालं, अॅक्शन मोडमध्ये दाखवून झालं, तरी पाक   सुधारण्याचे नाव काही घेत नाही. जम्मू -काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर युद्धबंदी करार कायम असला तरीही, पाक घुसखोरी करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करतं.

यातचं नवीन रणनीतीचा भाग म्हणून पाकिस्तान आणखी कठोर आणि चांगल्या प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतीय सीमेच्या आत पाठवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जातंय.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, नियंत्रण रेषेवरील लाँच पॅड दहशतवाद्यांनी भरलेले आहेत आणि काश्मीरसह जम्मूच्या बाजूने सतत घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी फेब्रुवारीपासून दोन्ही बाजूंकडून युद्धबंदी लागू आहेत. या युद्धबंदीच्या उल्लंघनाची फक्त दोनच प्रकरणे आहेत परंतु ती देखील स्थानिक स्वरूपाची होती आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे एक नवीन युनिटने कामकाज हाती घेतलयं.

तसं पाहिलं तर या आधीही अनेकदा  घुसखोरीचे प्रयत्न थांबवले गेले होते, परंतु दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने आतंकवाद्यांना आत घुसण्याचा आणि घुसखोरीचा प्रयत्न करण्यास परवानगी दिली होती.  त्यात आता हिवाळ्याचा हंगाम जवळ येत असताना, पाकिस्तानी लष्कराने सर्व दहशतवादी गटांना घुसखोरीचे जोरदार प्रयत्न करण्याची परवानगी दिली आहे.

घुसखोरीचे अधिकाधिक प्रयत्न झाले पण तरीही युद्धबंदीचे उल्लंघन झाले नाही. घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणा -या दहशतवाद्यांची संख्या सूचित करते की ते पाकिस्तानी सैन्याच्या मान्यतेशिवाय असे करू शकत नाहीत.

सध्या पाकिस्तानी लष्कराचे लक्ष दहशतवाद्यांपेक्षा सीमेपलीकडे शस्त्रे आणि दारूगोळा पाठवण्यावर जास्त आहे, त्यामुळेच जे पकडले गेले आहेत त्यांच्याकडे एक मोठा साठा सापडला आहे.

सप्टेंबरच्या शेवटी भारतीय लष्कराने उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील हातमुल्ला येथे घुसखोरीची एक मोठी योजना हाणून पाडली आणि तीन सशस्त्र दहशतवाद्यांचा खात्मा केला.

या तीन दहशतवाद्यांकडून पाच एके रायफल, आठ पिस्तूल, दोन आयईडी आणि 69 ग्रेनेड जप्त करण्यात आले.

यानंतर, उरी सेक्टरमध्ये अशाच प्रकारचा आणखी एक घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक 30 वर्षांचा होता, तर दुसऱ्याला जिवंत ताब्यात घेण्यात आलं.

अहवालानुसार, पाकिस्तानकडून नवीन भरती करण्याऐवजी पूर्वी काश्मीरमध्ये राहिलेल्या अशा अनुभवी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्यात यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारण गेल्या काही महिन्यांत काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी स्थानिक दहशतवादी गटांच्या नेतृत्वाला लक्ष्य करून केलेल्या सततच्या कारवाई दरम्यान दहशतवाद्यांनी काश्मीरमधील त्यांचे मुख्य स्थानिक नेतृत्व गमावले आहे. तसेच, काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराची पातळी वाढेल याची खात्री करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, एक पाकिस्तानी दहशतवादी, सध्या’ छोटा वालिद’ म्हणून ओळखला जातो आणि जो नियंत्रण रेषा ओलांडून सुमारे 20 दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये घुसला होता,  श्रीनगरमध्ये होणाऱ्या अल्पसंख्यांकांच्या हत्येमागे तो मास्टरमाईंड असल्याचं बोललं जातयं.

दरम्यान, पाकने कितीही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तरी  भारतीय लष्कराने त्यांना  वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचं भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.