अफगाणिस्तानात तालिबान आक्रमक होण्यामागे पाकिस्तानच्या लष्कर आणि ISI चा हात आहे का ?

अमेरिकेने त्यांचे सैन्य तुकडी मागे घेतली आणि अफगाणिस्तान मध्ये तालिबान आपले हातपाय पसरायला यशस्वी झालेय म्हणायला हरकत नाही. कारण  तालिबानचे प्रवक्ते सोहेल शाहीन यांनी अलीकडेच सांगितले आहे की, 

“तालिबानने अफगाणिस्तानमधील आत्तापर्यंत सुमारे २६० जिल्ह्यांवर ताबा मिळवला आहे”.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा ताबा त्यांनी कसल्याही प्रकारची लढाई करून मिळवला नाही तर, अफगाण सुरक्षा दलाचे काही सैनिकही आमच्या सोबत या सामील झाले आहेत.  

अफगाणिस्तानात सध्या मोठ्या हालचाली होतांना दिसून येत आहेत. अमेरिकन सैन्य एक-एक करून अफगाणीस्तानातून बाहेर पडत आहेत आणि काही क्षेत्रातील विदेशी सैन्य पूर्णपणे गेले आहेत.

आता या सर्व प्रकरणात प्रथमच भारताने हस्तक्षेप केला आहे

भारताने अफगाणिस्तान-तालिबानच्या सर्व संघटना आणि तेथील नेत्यांशी चर्चा करण्याचा पर्याय ठेवला आहे.

या दरम्यान अफगाणिस्तानमधून येणारी छायाचित्रावरून तर असे दावे केले जात आहेत कि,  तालिबानने या ठिकाणचे अनेक भाग ताब्यात घेतले आहेत. मात्र अमेरिका आणि इतर काही देश या दाव्यांना खोटं ठरवत आहेत. 

तालिबानने अफगाणिस्तानचे २६० जिल्हे काबीज केले आहेत.

तालिबानचे प्रवक्ते सोहेल शाहीन यांनी स्वतः एका मुलाखतीत तालिबानची रणनीती आणि पाकिस्तानसारख्या मुद्यांवर त्यांनी सांगितले आहे की, तालिबानने अफगाणिस्तानचे सुमारे २६० जिल्हे काबीज केले आहेत. यामध्ये त्यांना अफगाण सुरक्षा दलाचे काही सैनिकही सामील झाले आहेत असं देखील त्यांनी सांगितलं आहे. अफगाण सैन्य सामील होतांना तालिबान्यांना स्पष्ट सांगितलं कि आम्ही आमच्या इच्छेनुसार आलो आहोत.

सोहेल शाहीन म्हणाले की, त्यांना संशय आहे की सरकारने तालिबानच्या विरोधात मिलिट्री ऑपरेशन सुरू केले आहे आणि म्हणूनच तालिबानला देखील उत्तर द्यावे लागत आहे. त्यामुळे आता सुरक्षा दलांचा देखील अफगाण सरकारवर विश्वास राहिलेला नाही आणि म्हणूनच त्यांनी तालिबान्यांना पाठिंबा देणे सुरू केले आहे.

त्यांनी असे देखील सांगितले आहे कि, अफगाणिस्तान सरकारचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ आणि तालिबानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत काही मुद्द्यांवर सहमती झाली. त्यापैकी एक मुद्दा म्हणजे, अशा बैठका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह आयोजित केल्या जातील आणि या  बैठकांमध्ये ठरवलेल्या कारवाईच्या अंमलबजावणी देखील केल्या जातील, असंही यात ठरलं आहे.

दुसरा मुद्दा असा कि, कारवायांमध्ये नागरिकांच्या मृत्यूला आळा घातला जाईल. पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि राष्ट्रीय प्रकल्पाचे संरक्षण केले जाईल असेही यात ठरले. तसेच, कोविड-१९ ची औषधे सुरक्षित केली पाहिजेत.

पण बैठकीतील इतर काही मुद्द्यांवर एकमत होऊ शकले नाही.

जेव्हा सोहेलला विचारण्यात आले की ज्या मुद्यांवर सहमती झाली नाही त्याच मतभेदामुळे त्यांनी बंदूक घेण्याचा निर्णय घेतला असावा असं म्हणण्यात आलं तेंव्हा त्या मुद्द्याला देखील त्यांनी हात घातला. तेंव्हा त्यांनी सांगितलं हा दावा खोटा आहे, जेव्हा काबूलमध्ये सरकारी बाजूने तालिबान्यांवर कारवाई आक्रमक होते, तेव्हाच आम्ही प्रतिक्रिया व्यक्त करतो.

तालिबान्यांना पाकिस्तान आणि ISI कडून पाठिंबा?

तालिबान्यांना पाकिस्तान आणि ISI कडून पाठिंबा मिळण्याच्या दाव्याला सोहेल शाहीन यांनी खोटं ठरवलं आहे.  ते म्हणतात कि, त्यांना पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयची मदत मिळत आहे, हा निव्वळ एक प्रचार आहे, जो मुद्दाम भारतीय माध्यमांद्वारे पसरवला जात आहे. त्यांच्या मते यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही. ते म्हणाले की, भारतीय माध्यमे ज्या निराधार बातम्या पसरवत आहेत, जे कि ग्राउंड रिऍलिटीपासून खूप खूप वेगळी आहे. 

अफगाणिस्तानच्या लोकांना आता शांतता आणि सुव्यवस्था हवी आहे असं त्यांचं जरी म्हणणे असले तरीही त्यांना ISI चा वरदहस्त असण्याच्या शक्यता देखील नाकारता येत नाहीत असं देखील बोललं जात आहे. 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.