पाकिस्तान पुढे नवीन प्रॉब्लेम झालाय. देशातलं गव्हाचं पीठच संपलंय..

आपल्या शेजाऱ्यांचं गव्हाचं पीठ संपलंय. डबा रिकामा झालाय ओ. आता येतील पातेलं घेऊन पीठ मागायला. आपल्याकडे आले नाही तरी दुसऱ्या शेजाऱ्यांकडे जातीलच.

हे शेजारी आहेत. पाकिस्तान….

हसू नका. खरंच त्यांच्या देशातल गव्हाचं पीठ संपलंय. आणि हे खुद्द सांगितलंय पाकिस्तानच्या खाद्य विभागाने.  

नेमकं काय झालंय पीठ संपायला ?

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील अनेक जिल्ह्यांमध्ये गव्हाचे पीठ संपले असल्याची माहिती पाकिस्तानच्या खाद्य विभागाने दिली आहे. एएनआयने याबाबतची बातमी प्रकाशित केली आहे.

आता पीठ येत गव्हापासून. त्याच गव्हाची चणचण निर्माण झालीय. गव्हाची मुख्य चणचण निर्माण होण्याच पहिलं कारण म्हणजे एकरी गहु उत्पादन वाढवण्यात पाकिस्तानला अपयश आलं आहे. त्यात आणि गव्हाच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचेही आरोप करण्यात येत आहेत.

गव्हाचे व्यवस्थापन आणि साठवणूकही कमी झाल्याने देशात गव्हाच्या पिठाची चणचण निर्माण केली आहे. अन्य जिल्ह्यात गव्हाच्या सरकारी खरेदीमुळे घाऊक किंमती वाढल्या आहेत. आता  खर्च वाढल्याने अनेक गव्हाच्या गिरणीमालकांनी आपल्या गिरण्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी तज्ञ काय म्हणतायत ? 

कृषी तज्ज्ञ म्हणतायत की, शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न वाढवून द्या, तसेच शेतकऱ्यांना सवलत द्या. त्याशिवाय या गव्हाच्या पिठाच्या तुटवड्याच्या संकटातून बाहेर पडणे शक्य नाही. त्याशिवाय गहू साठवण्याच्या खरेदीत झालेला भ्रष्टाचार आणि खाद्य विभागाच्या इतर खर्चाचा परिणाम हा गव्हाच्या कमतरतेसाठी जबाबदार आहे.

यावर्षीच चणचण आहे असं नाही, तर यांचं पीठ सारख सारख संपत.

याआधी गेल्यावर्षीही गिरणी मालकांनी आपली गिरण्या बंद केल्या होत्या. गव्हाच्या पिठाच्या तुटवड्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून सरकारी गहू खरेदी करण्याचे संकट आलं होतं. ज्यामुळेच वाहतूक खर्चातही मोठी वाढ झाली आहे.

द न्यूज इंटरनॅशनलने गोळा केलेल्या ग्राउंड रिपोर्ट नुसार,

शेतकऱ्यांना सबसिडी दिल्याशिवाय गव्हाच्या पिठाच्या तुटवड्याच्या संकटातून बाहेर येता येणार नाही. गव्हाच्या साठवणूकीत खाद्य विभागाकडून गव्हाच्या गोण्यांची खरेदी आणि इतर खर्चांमध्येही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.

पाकिस्तानात निर्माण झालेल्या खाद्य संकटामुळेच संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने, जागतिक बॅंक आणि आशियाई विकास बॅंकेने इमरान खान सरकारला प्रस्ताव दिला आहे. त्यामध्ये खाद्य आणि बाजार समित्या समाप्त करा, असे सुचविण्यात आलं आहे. या बाजार समित्या राष्ट्रीय संपत्तीवर तोटा निर्माण कारण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

आता या सगळ्या भोंगळ कारभाराला कोण जबाबदार ? 

पाकिस्तानातील वाढती महागाई आणि गरीबी नियंत्रणात आणण्यासाठी इम्रान खान सरकारचे प्रयत्न अयशस्वी ठरलेच आहेत. मात्र आता दैनंदिन जीवनात गरजेच्या अशा खाद्य पदार्थांच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी जगायचं कसा हा प्रश्न पडलाय ?

महागाईच्या वाढत्या किंमतींमुळेच आता देशात मोठ्या प्रमाणात इम्रान खान सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा सुरू असतानाच हे गव्हाच्या पिठाच संकट आल्यान इम्रान खान सरकारच्या कारभारावरही देशवासीयांचा अविश्वास निर्माण झाला आहे.

आता बघूया यांना पीठ कोण देतंय ?

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.