एकेकाळी पाकिस्तानने अंदमान निकोबार बेटांवर दावा केला होता पण…..

अंदमान आणि निकोबार हि बेटे नैसर्गिक गोष्टींची खाण आहेत. बंगालच्या उपसागरातील मोक्याच्या स्थानामुळे अनेक शतकांपासून अनेक वेगवेगळ्या वसाहतींसाठी मौल्यवान संपत्ती तिथे मिळाली. भारताच्या ताब्यात हि अंदमान निकोबार बेटे येण्यापूर्वी या बेटांवर अगोदर डॅन आणि नंतर ब्रिटिशांची मालकी होती. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी या बेटांवरचा आपला दावा सोडला पण फाळणीच्या वेळी पाकिस्तानने हि बेटे आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.

भारतातला ब्रिटिशांचा काळ ज्या वेळी संपत आला तेव्हा भारतात अनेक महत्वपूर्ण घटना घडायला सुरुवात झाली होती. ब्रिटिशांनी भारत सोडून इतर महत्वाच्या ठिकाणावर आपला दावा दाखवायला सुरवात केली. जर अंदमान निकोबार बेटे ताब्यात आली तर सागरी मार्गाने वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्न मिटतील याची ब्रिटिशाना खात्री होती. पण त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी ब्रिटिशांचे हे प्रयत्न धुळीस मिळवले. 

याच काळात मोहम्मद अली जिना यांनी दावा केला, ५ जुलै १९४७ रोजी जिना यांनी भारताच्या राज्य सचिवांना पत्र लिहिलं कि, अंदमान निकोबार या बेटांवर पाकिस्तानचा दावा खूप मजबूत आहे कारण पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानचे सगळे व्यवहार हे समुद्रमार्गे चालतात आणि अंदमान निकोबार बेटे हे दळणवळणासाठी आणि पाकिस्तानसाठी खूप महत्वाचे आहेत. भारतासाठी ते कूठल्याही ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे नाहीत. या भागांचे समान वाटप होण्याऐवजी ते पूर्णतः पाकिस्तानच्या ताब्यात द्यावेत.

या दाव्यावर अनेक देशांचं लक्ष होतं. कारण ऑस्ट्रेलिया हि बेटं बळकावण्याच्या प्रयत्नात होतं. कारण नौदल आणि हवाई आक्रमणांसाठी हि बेटे खूप महत्वाची होती. जवाहरलाल नेहरू यांनी दावा केला होता कि हिंदुस्थान हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं राष्ट्र आहे तर पाकिस्तान हा फक्त एक अल्पसंख्यांक असलेला प्रांत आहे. 

तत्कालीन भारताचे व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबेटन यांनी हि बेटे भारतापासून वेगळी न करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला कारण ब्रिटिशांविषयी असलेला रोष आणि त्यात जर हि बेटे भारतापासून दुरावली तर राजकीय वाटाघाटीच्या नाजूक टप्प्यावर हे प्रकरण वादग्रस्त ठरेल. जनरल लॉर्ड माउंटबेटन आणि जवाहरलाल नेहरू यांचे संबंध हे मैत्रीपूर्ण हे होते.

नेहरूंनी १९४१ च्या जनगणनेनुसार अहवाल मांडला कि या बेटांवर एकूण लोकसंख्या ३४ हजार होती यात जवळपास हिंदू, शीख आणि बौद्ध, मुस्लिम लोक आहे. आदिवासी जमातीची मोठ्या प्रमाणात या बेटांवर आहे.

सोबतच इतरही जमाती आहेत. विविधता असलेला देश हा भारत एकमेव आहे आणि कुठल्याही धार्मिक आणि इतर गोष्टींमध्ये असलेली विविधता हि फक्त भारतात आढळते त्यामुळे पूर्णपणे हि बेटं भारताकडे असायला हवी.

नेहरूंनी जीनांचा दावा खोडून काढला कि बेटांची लोकसंख्या मुळात मुस्लिम होती आणि त्यावरून अंदमान निकोबार बेटांवर दावा ठोकणे हे काही योग्य कारण नाही.

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या दृष्टीने अंदमान निकोबार हि बेटे खूप महत्वाची होती. भारतातल्या अनेक मोठ्या लोकांना अंदमान निकोबार या बेटांवर शिक्षा ठोठावण्यात आली होती. मोहम्मद जिना यांच्या दाव्यापुढे नेहरूंनी मांडलेला दावा हा योग्य होता. बऱ्याच विरोध या बेटांवरून झाला पण शेवटी अनेक चर्चांमधून आणि कागदपत्रांच्या देवाणघेवाणींवरून १९५० मध्ये अंदमान निकोबार हि बेटे भारतीय प्रजासत्ताकचा भाग बनली. पुढे १९५६ साली हि बेटे केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आली.

आज अंदमान निकोबार या बेटांवर विविध प्रकारची संपत्ती आहे. अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. एकेकाळी पाकिस्तानने अंदमान निकोबार या बेटांवर ठोकलेला दावा जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी धुडकावून लावून हे प्रदेश पुन्हा भारताच्या ताब्यात घेतले होते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.