तुम्ही कधी “अखंड पाकिस्तानचे” फोटो पाहिलेत का ?
अखंड पाकिस्तान !! देवा हे ही दिवस पहायचे होते का ?
आपण अगोदरच पाकिस्तानचे दोन तुकडे केले. एकीकडे पाकिस्तान ठेवला तर दुसरीकडे बांग्लादेश. त्यातही प्रत्येक देशात अकलेचे तारे तोडणारे लोकं असतातच. हे फोटो पाहिल्यानंतर तर मुर्ख लोकांची कमतरता नाही हे ठायी ठायी दिसून येत.
असो तर खालचे फोटो हे अधून मधून पाकिस्तानमध्ये व्हायरल होत असतात. तिथल्या लोकांनी आपआपल्या कुवतीनुसार अखंड पाकिस्तानचा नारा दिला आहे. शेजारच्या देशाचं अपुर्ण होणार स्वप्न नेमक काय आहे ते आपण पहायलाच पाहीजे की ?
म्हणूनच हे खास फोटो आपल्यासाठी आहेत. ENJOY करा आणि हसा !
स्वप्न क्रमांक १
पहिला फोटो अखंड पाकिस्तानचा. आपल्यावर असणाऱ्या विश्वासाची कमतरता म्हणजे त्यांनी भारताला पण स्थान दिल आहे. मध्यप्रदेश,राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवर मात्र रिपब्लिक ऑफ राजस्थान आणि महाराष्ट्रात रिपब्लिक ऑफ महाराष्ट्र होणार आहे. तामिळनाडूच्या लोकांसाठी द्रविड फेडरेशन देखील करण्याचा प्लॅन आहे. शिवाय खलिस्तानसाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे हे विशेष !
स्वप्न क्रमांक २.
भारतातल प्रत्येक राज्य वेगवेगळी करण्याच अशक्य स्वप्न या फोटोतून पाकिस्तान पाहतय.खलिस्तानची सत्ता उत्तर प्रदेश,हरियाणा, राजस्थान या भागात बाकीचे सर्व राष्ट्र वेगवेगळी व भारत फक्त गुजरात आणि बिहार या राज्यांपुरता मर्यादित ठेवण्याचा प्लॅन आहे.
स्वप्न क्रमांक ३ –
स्वप्न क्रमांक तीन हे पाकिस्तान भारताच्या निम्यापर्यन्त आणण्याचं आहे. त्यानंतर मात्र नेहमीप्रमाणे वेगवेगळी राज्य आणि त्यांचे देश अस विकसित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे चीन हा नेपाळच्या शेजारून थेट केरळपर्यन्त उतरताना दाखवला आहे. काय स्कील असत एकेकाचं.
स्वप्न क्रमांक ४.
हि थेअरी होती २०१२ ची. पाकिस्तानला हे स्वप्न २०१२ पर्यन्त पुर्ण करता आलं नाही. यात गुजरात दिल्ली, महाराष्ट्र राजस्थान असा भाग त्यांना मिळवायचा होता. मुंबईच नाव मुस्लीमाबाद करण्याचं स्वप्न देखील आहे. पण ते स्वप्नच राहिलं कारण २०१२ तर कधीच गेलं.
स्वप्न क्रमांक ५ .
हालेलुयीया. आत्ता हे स्वप्न आहे २०२० चं. घ्या २०१२ पर्यन्त एक इंच पुढ न सरकू शकणाऱ्यांनी २०२० चा मॅप मांडला. यात मात्र ते जरा पुढे सरकले. असो !!!!
असतात एकेकाची स्वप्न !