पाकिस्तानात कट्टरतेवरून खुनाची परंपरा नवीन नाही, त्यांच्या राष्ट्रपित्यानंच समर्थन केलंय

ईशनिंदेच्या आरोपावरून शुक्रवारी पाकिस्तानमध्ये जमावाने एका श्रीलंकन नागरिकाला जिवंत जाळलंय. आता तुम्ही म्हणाल पाकिस्तानमध्ये हे नेहमीच होत असताना तो श्रीलंकेचा नागरीक तिथं तडफडायला गेलाच कश्याला. तर तो होता एका  कपड्यांच्या फॅक्टरीचा मॅनेजर.

प्रियांथा कुमारा हा श्रीलंकन नागरिक पंजाबमधील सियालकोट या शहरात  ज्या फॅक्टरीमध्ये काम करत होता ती पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी देखील बनवते.

शुक्रवारी फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर  प्रियांथा कुमार यांनी फॅक्टरीमध्ये लागलेले तेहरीक ए तालिबान या  कडव्या धार्मिक विचारसरणीच्या पक्षाचे पोस्टर काढले व फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले. आता या पोस्टरवर असणाऱ्या कुराणमधील  मजकूराबद्दल अरेबिक आणि उर्दूचा गंध देखील नसणाऱ्या बिचाऱ्या  प्रियांथाभाऊंना काहीच आयडिया नव्हती.  नेमक्या याच कारणामुळं कामगारांच्या भावना दुखावल्या गेल्या. पुढे या मॅनेजरसाहेबांची झालेली मॉब लिंचिंग बघून पाकिस्तानचं जगभर थू थू होतंय. या मॉब लिंचिंगमधील आरोपी काहीतरी महान काम केल्यासारखा हसत हसत पोलिसांना  सामोरे गेलेत. आता तुम्ही म्हणाल यांना कायद्याची,पोलिसांची काय थोडी तरी भीती आहे कि नाही? तर याचं  उत्तर  सरळ नाही असं आहे . 

कारण ईशनिंदेच्या आरोपावरून हत्येचं पहिल प्रकरण जेव्हा पाकिस्तानात घडलं होतं तेव्हा कोर्टात हत्येच्या आरोपीची बाजु  कायदेआझम मोहम्मद अली जिना यांनी मांडली होती. 

त्यामुळे ज्या देशाचा संस्थापक अश्या घटनांचा समर्थन करतो तिथे असे लोक निर्ढावलेले असणारच. तर आता बघूया नक्की काय होतं हे प्रकरण.

पाकिस्तानात ईशनिंदेच्या आरोपवरून हत्या करण्याचा पहिलं प्रकरण १९२९ मध्ये फाळणीपूर्व लाहोरमध्ये घडलं होतं . जे आज हि रंगीला रसूल या नावाने चर्चिलं जात. रंगीला रसूल या पुस्तकामध्ये मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केला गेला आहे अस त्यावेळच्या मुस्लिम संघटनांचा म्हणणं होतं . यातुनच या पुस्तकाचे प्रकाशक महाशय राजपाल यांची हत्या झाली. इल्म-उद-दिन या अवघ्या १९ वर्षाच्या युवकानं हि हत्या केली होती.

पुस्तकाचा गंधही नसणाऱ्या या तरुणाने कट्टरपंथीयांनी केलेल्या ब्रेनवॉशमुळं पुस्तक प्रकाशकाची  हत्या घडवून आणली होती.

जेव्हा हि केस कोर्टात उभी राहली तेव्हा बचाव पक्षाचे वकील होते मोहम्मद अली जिना. जिनांनी बाजू मांडूनही इल्म-उद-दिनला फाशीची शिक्षा झाली. ऑक्टोबर १९२९ मध्ये मिनवली जेलमध्ये फासावर लटकण्यात आले. मात्र जिना सारखा माणूस हत्येच्या आरोपीची बाजू घेतो म्हटल्यावर हत्या  कोणत्यातरी महान कारणासाठीच असणार अशी लोकांची जी धारणा झाली होती ती आजही तशीच आहे .मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. इल्म-उद-दिनला जिथे दफन करण्यात आले तिथे कट्टरपंथींयांनी त्याची समाधी बांधली आहे . 

सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा लिहणाऱ्या इक्बाल हे इल्म-उद-दिनच्या प्रेतयात्रेत देखील सामील झाले होते. “जे शिक्षित लोकांना जमले नाही ते एका अडाणी पोराने करून दाखवले”  असे शब्दात इक्बाल यांनीं इल्मउद्दीला श्रद्धांजली  दिली होती. 

आजही पाकिस्तानात इल्मउद्दीला एक महान इस्लामी नायक, एक गाझी, एक शाहिद म्हणून गौरवला जातं. त्याला आता संतत्व बहाल करण्यात आला आहे . तर वर्षी ३० ऑक्टोबर ला या पीर साहेबांचा उरुस भरतो. हजारो पाकिस्तानी दरवर्षी इल्मउद्दीच्या दर्ग्याला भेटी देतात.

शुक्रवारच्या घटनेनंतर ‘लाज वाटण्याजोगा दिवस’ अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली होती.

मात्र याच इम्रान खानच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील सरकारने या गाझी इल्म उद्दीनचा धडा पाठ्यपुस्तकात टाकला आहे.

पेराल तेच उगवतं याचं जिवंत उदाहरण आज आपण पाकिस्तानच्या रूपानं आपल्यापुढे आहे .  त्यामुळं पोरांच्या चुकांवर पांघरून घालण्याच्या जिना, इकबाल सारख्या बापांच्या चुकीचं फळं पाकिस्तान आज भोगतोय असं  म्हणणं वावगं ठरणार नाही.

हे ही वाच भिडू:

 

English Summary: When the case came up in court, the defense counsel was Mohammad Ali Jinnah. Ilm-Ud-Din was executed despite Jinnah’s side. He was hanged in Minwali Jail in October 1929. However, when people like Gina take the side of the accused, the perception that the murder was for some great cause is still true.

Web title: Pakistan founder mohammad ali jinnah Supported Bigotry

Leave A Reply

Your email address will not be published.