पाकिस्तानच्या भूतमहालासोबत भारतीय व्यापाऱ्याची लव्हस्टोरी जोडली गेलेली आहे…

लव्ह स्टोरी आणि त्याबद्दलचे इतिहास असे अनेक उदाहरण आपण पाहिलेले,वाचलेले असतात. काही लव्ह स्टोरींवर तर सिनेमेसुध्दा बनवले गेले आहेत. पण काही लव्हस्टोरी खुप महत्वाच्या होत्या पण त्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. पण आज आपण एक अशी लव्हस्टोरी जाणून घेऊया जिची तुलना शहाजहानच्या लव्ह स्टोरीशी केली गेली.

बायकोचा जीव वाचवण्यासाठी या व्यापाऱ्याने एक मोठा महाल बनवला पण आता तो महाल भूतमहाल म्हणून ओळखला जातो. तर जाणून घेऊया या भूतमहालाविषयी. स्वातंत्र्याच्या अगोदर पाकिस्तान भारताचाच एक भाग होता. १९२७ साली एक यशस्वी व्यापारी शिवरतन चंद्ररतन मोहट्टा यांनी पाकिस्तानच्या कराचीमध्ये एका भल्यामोठ्या महालाची निर्मिती केली. 

आज घडीला हा महल पाहण्यासाठी जगभरातून लोकं पाकिस्तानात जातात कारण पाकिस्तानच्या उत्तम पर्यटन क्षेत्रापैकी एक म्हणजे हा महाल मानला जातो. तर अगोदर यामागची लव्हस्टोरी जाणून घेऊया आणि मग हा महाल भूतमहाल कसा झाला ते पाहूया. या पॅलेसची स्टोरी हि ताजमहालशी मिळतीजुळती आहे.

शाहजानने आपल्या बायकोच्या बेगम मुमताज महलच्या स्मरणार्थ ताजमहाल बनवला. पण इथं शिवरतनने आपल्या बायकोच्या स्मरणार्थ नाही तर आपल्या बायकोचा जीव वाचावा म्हणून महाल बांधला. असं सांगितलं जातं कि शिवरतन यांची बायको गंभीर आजारी होती. तेव्हा डॉक्टरला विचारलं असता डॉक्टर म्हणाले कि,

यांना अशा एखाद्या जागेत ठेवा जिथं समुद्राची ताजी हवा त्यांना मिळत राहील. यांच्या आजारावर इलाज समुद्राची ताजी हवा आहे. तेव्हा या कारणास्तव क्लिफ्टनच्या समुद्रकिनारी हा महाल बनवण्यात आला.

शिवरतनने हा महाल बांधण्याची जबाबदारी भारतीय आर्किटेक्ट अहमद हुसेन आगाला दिली होती जो जयपूरहून या बांधकामासाठी गेला होता. हा महाल मुगल शैलीने बांधला गेला होता यात जोधपूरहून आणलेले गुलाबी आणि गिजरी दगडांचा समावेश करण्यात आला होता.

पण नंतर हा महाल भूत महाल झाला. प्रेताचे आवाज, खेळ इथं चालल्याचं सांगितलं जातं. यामुळे पाकिस्तानातल्या निवडक भुतांच्या जागांमध्ये या महालाचा उल्लेख येतो. या महालाबद्दल सांगण्यात येतं कि इथल्या चौकीदारानी आतमध्ये आत्मा असल्याचा दावा केला होता. जेव्हा आतमध्ये जाऊन चौकशी केली असता ठराविक वस्तूंची जागा बदललेली असल्याचं निदर्शनास आलं होतं. 

हा महाल जितका लव्ह स्टोरीसाठी प्रसिद्ध झाला तितकाच दुसऱ्या बाजूने भुताटकीच्या नादात बदनाम सुद्धा झाला. भुतांचा तिथं वास आहे याचे भक्कम पुरावे अजूनही कोणाला सापडलेले नाही पूजन तरीही पाकिस्तानातील मोस्ट हॉंटेड प्लेसेसमध्ये या महालाचा समावेश केला जातो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.