ब्रिटिश वकिलाच्या ‘एका’ चुकीमुळे कर्तारपूर साहिब पाकिस्तानात गेलं

निवडणूक जवळ आल्या कि काहींना काही जुने मुडदे उकरून काढले जातात. जस उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जिन्ना हा टॉपिक निघतोच निघतो तसा पंजाब मध्ये खलिस्तानचा मुद्दा उकरून काढला जातो. पण पंजाबच्या राजकीय वर्तुळात असाच एक जुनाच मुद्दा नव्याने छेडला आहे. तो म्हणजे शीख धर्मस्थळं कर्तारपूर साहिब, नानकाना साहिब, जे भारतापासून अगदी ७ च किलोमीटर लांब आहे.

अलीकडेच फिरोजपूर येथील निवडणूक रॅलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक विधान केले..”भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान असते तर करतारपूर साहिब आणि नानकाना साहिब भारतातच राहिले असते. ते पाकिस्तानचा भाग झालेच नसते. पण तरी करतारपूर साहिब कॉरिडॉर उघडण्याची शीखांची प्रदीर्घ प्रलंबित मागणी मोदींनी पूर्ण केली“. 

अमित शहा यांचं म्हणणं आहे कि, करतारपूर साहिब भारतीय हद्दीत ठेवण्यात काँग्रेस अपयशी ठरलीय.

भारताच्या बॉर्डरपासून अगदी ७ च किमी लांबीवर आलेला करतारपूर कॉरिडॉर भारतीय शीख यात्रेकरूंना गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देण्यासाठी व्हिसा-मुक्त प्रवेश प्रदान करतो. या कॉरिडॉरचे   उद्घाटन २०१९ मध्ये झाले. तर मोदींनीदेखील असच विधान केलेलं कि, “फाळणीच्या वेळी करतारपूर साहिब भारतीय हद्दीत ठेवण्यात काँग्रेस अपयशी ठरली. नंतर जी १९६५ आणि १९७१ च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धाच्या दरम्यान काँग्रेस सरकारला संधी होती कि, करतारपूर साहिबचा समावेश भारताच्या हद्दीत आणावी पण ती संधीही काँग्रेसने गमावली, असेही ते म्हणाले होते.

जरी आता या मुद्द्यावरून राजकीय आरोप केले जातायेत पण कर्तारपूर साहिब, नानकाना साहिब पाकिस्तानात नक्की कुणामुळे गेलं आहे ?

अशी माहिती मिळतेय कि, एका ब्रिटिश वकिलाच्या चुकीमुळे हे दोन्ही स्थळं पाकिस्तानच्या हद्दीत गेले. फाळणीच्या वेळी इंग्रज वकिलाच्या चुकीमुळे करतारपूर गुरुद्वारा पाकिस्तानच्या भागात गेले होते. दुर्लक्ष आणि युद्धाच्या हल्ल्यांमुळे ते जीर्ण झाले. इतकं जीर्ण झालं कि, लोकांनी इकडे गुरे बांधायला सुरुवात केली होती असं सांगितलं जातं. पण ९० च्या दशकात पाकिस्तान सरकारने त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला होता. 

करतारपूर साहिब हे पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यात रावी नदीजवळ आहे. त्याचा इतिहास 500 वर्षांहून अधिक जुना आहे. याची स्थापना शिखांचे गुरु नानक देव यांनी १५२२ मध्ये केली असे मानले जाते. आयुष्याची शेवटची वर्षे त्यांनी येथे घालवली असा इतिहासात उल्लेख आहे.

आता असंही म्हणलं जातं कि, रावी नदीचा प्रवाह सीमा म्हणून लक्षात घेऊन ती पाकिस्तानात गेली. लाहोर ते करतारपूर साहिब हे अंतर १२० किलोमीटर आहे. त्याच वेळी, ते पंजाबमधील गुरुदासपूर भागात भारतीय सीमेपासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर आहे. लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांच्या ‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ या पुस्तकानुसार, इंग्लिश वकील सर क्रिल रॅडक्लिफ यांना फाळणीचा नकाशा काढण्यासाठीचा वेळ दिला होता तो काळ दोन महिन्यांपेक्षा कमी होता आणि महत्वाचं म्हणजे त्यांना भारताच्या भौगोलिक स्थानाची माहितीच नव्हती. 

शेवटी या वकिलाने रावी नदीची एकमेव सीमा ठरवली अन करतारपूर गुरुद्वारा रावीच्या पलीकडे असल्यामुळे ते पाकिस्तानच्या भागात गेले….असा खेळ झाला होता अन आजतागायत हा मुद्दा राजकीय बनतच गेला. आणि दुर्दैवाने भविष्यात देखील यावरून राजकारण रंगत जाईल.

आता आणखी एक म्हणजे भारत-पाक युद्धादरम्यान या गुरुद्वाराचे खूप नुकसान झाले होते. १९६५ आणि १९७१ च्या युद्धात या गुरुद्वाराचे खूप नुकसान झाले होते. ९० च्या दशकात याची इमारत खूपच खराब झाली होती. इतकी लोकं इथे गुरे बांधू बांधायचे. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे लोकं या धार्मिक स्थळाचा इतिहास देखील विसरले होते.  

पण ज्या भारतीय लोकांना या स्थळाचे महत्व माहीत होते, त्यांच्यापैकी मोजकेच येथे भेट द्यायला आणि दर्शन घ्यायला जायचे. पण त्यांना वाघा बॉर्डरवरून या ठिकाणी जावे लागायचे.

शेवटी पाक आणि भारत या दोन्ही देशांच्या सरकारांच्या प्रयत्नातून हा कॉरिडॉर तयार झाला. १९९८ नंतर पाकिस्तान सरकारने गुरुद्वाराकडे गांभीर्याने लक्ष दिले.  पाकिस्तान शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने गुरुद्वाराच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारला दिला. त्यानंतर वर्षानुवर्षे बांधकाम सुरू राहिले. नंतर भारत आणि पाकिस्तानच्या सरकारने गुरुदासपूरमधील डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानमधील करतारपूर येथील पवित्र गुरुद्वाराला जोडणारा कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय घेतला. कॉरिडॉरची पायाभरणी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी भारतात आणि २८ नोव्हेंबर २०१८ रोजी पाकिस्तानमध्ये झाली. आणि ९ नोव्हेंबर २०१९ रोजी गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त ते जनतेला समर्पित करण्यात आले.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.