पाकिस्तानमधील ७ जागा जिथे हिंदूचा फार आधीपासून जयजयकार होतो

नुकतेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये कृष्ण मंदिर बांधण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. पाकिस्तान सरकारच्या, राजधानी विकास प्राधिकरणाने (CDA) हिंदूंना कृष्ण मंदिराच्या बाहेरची भिंत आणि स्मशान बांधण्याची परवानगी दिली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सरकारने २०१७ साली चार मरला परिसरात मंदिर बांधण्यासाठी जमीन देवू केली होती. पण मंदिर बांधण्याला सुरुवातीलाच काही धार्मिक संघटनांनी विरोध करायला चालू केलं होतं.

त्यासाठी लाहोरमधील जामिया अशर्फिया मदरशाचे मुफ्ती मोहम्मद जकारिया यांनी या मंदिराविरोधात फतवा देखील जारी केला होता.

या फतव्यामध्ये इस्लाममध्ये सांगितल्या प्रमाणे, ‘अल्पसंख्यांक समुदायाच्या धार्मिक स्थळांची फक्त डागडुजी आणि काळजी घेता येऊ शकते.

सोबतच नवीन मंदिर बनवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही,’ असा दावा या फतव्यात करण्यात आला होता.

त्याचबरोबर मंदिराचं बांधकाम थांबवण्यासाठी आणि ते इस्लामाबादच्या मास्टर प्लानमध्ये नव्हतं, असं कारण देत इस्लामाबाद उच्च न्यायालयामध्ये तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र न्यायालयाने या याचिका प्रभावहीन असल्याचं सांगत, त्या फेटाळून लावल्या होत्या.

आणि आता अखेरीस पाकिस्तानमध्ये श्रीकृष्णाचे मंदिर बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

पण हिंदुचे समुदायाला आता ही परवानगी देण्यात आली असली तरी

पाकिस्तानमध्ये अशा ७ जागा आहेत जिथे हिंदूचा अनेक वर्षांपासून जयजयकार होत आहे.

१. हिंगलाज मंदिर, बलुचिस्तान :

download 1

विष्णु देवाने सती माँ च्या मृतदेहाला कापण्यासाठी भेट चक्र फेकलं होतं. त्याच चक्रामुळे सतीच माँ चे शीर धडापासून वेगळं होऊन ज्या ठिकाणी पडलं त्याच जागेवर हे मंदिर आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान पासून १२० किलोमीटर लांब हिंगोल नदीच्या काठावर बसलेले हिंगलाज मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. हजारो वर्ष जुने असलेल्या या मंदिरामध्ये भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

२. पंचमुखी हनुमान मंदिर, कराची : 

hanuman temple karachi

दीड हजार वर्ष जुनं हनुमान मंदिर अशी या मंदिराची पहिली ओळख. असं मानण्यात येतं की की त्रेतायुगापासून म्हणजे जवळपास १७ लाख वर्षांपूर्वीपासून इथे पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. या मंदिराचं पुनर्निर्माण १८८२ मध्ये केलं होतं.

३. कटसराज मंदिर, चकवाल : 

katasraj mandir 1551680297

या मंदिराची अख्यायिका अशी सांगितली जाते की, भगवान शंकराची पत्नी जेव्हा सती गेली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब निघाले. त्यातील एक थेंब भारताच्या पुष्कर मध्ये पडला तर दुसरा पडला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यामध्ये. तिथेच जवळपास ९०० वर्षापूर्वी चकवालमध्ये हे कटसराज मंदिर बनवले गेले

४. स्वामिनारायण मंदिर, कराची : 

download 1 1

कराची शहराच्या बंदर रोड वर असलेले हे मंदिर ३२ हजार चौरस यार्ड मध्ये बनवला आहे. जवळपास १६० वर्ष जुनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या लोकांचे येणे जाणे असते.

फाळणीच्या वेळी या मंदिराचा वापर निर्वासीतांचा कॅम्प म्हणून झाला होता. याच परिसरात एक गुरुद्वारा पण आहे. आणि याच मंदिरातून हिंगलाज मंदिरासाठी यात्रा सुरू होते.

५. मुल्तान सूर्य मंदिर, मुल्तान : 

multan sun temple 2 1576825091

रामायण मधील जामवंत याने आपल्या मुलीचं लग्न श्रीकृष्णासोबत लावून दिलं. पुढे जामवंती आणि कृष्णाच्या यांच्या मुलाचं नाव सांब ठेवलं. याच सांब हे मंदिर बनवलं. त्याच कारण होतं वडील श्रीकृष्ण यांच्याकडून मिळालेल्या कुष्ठरोगी होण्याच्या शापापासून मुक्ती मिळवणे. १ हजार ५०० वर्षापूर्वी मुलतान च्या सूर्य मंदिरामध्ये फिरण्यासाठी आलेल्या चीनच्या बुद्ध यांनी देखील हे लिहून ठेवलं आहे.

त्यानंतर मोहम्मद बिन कासिम आणि मोहम्मद गजनी यांच्यासोबतच अनेक मुस्लिम शासकांनी या मंदिराला अनेक वेळा लुटलं. त्यामुळे आजही या मंदिराची आर्थिक परिस्थिती तेवढीच बिकट आहे.

६. श्री वरुणदेव मंदिर, कराची: 

पाकिस्तानच्या सिंधप्रांता मधील कराची मध्ये मनोरा आयर्लंडमध्ये असलेलं हे मंदिर १०० वर्ष जुनं आहे. सोबतच या श्री वरुणदेव मंदिर वापर आता हिंदू काऊन्सिल ऑफ पाकिस्तानच्या कामांसाठी केला जातो. असं म्हणतात की १६ व्या शतकात देखील हे मंदिर अस्तित्वात होतं. पण मंदिराच्या सध्याच्या बांधकामावरून हे १९१७-१९१८ मध्ये बनवलं असे सांगितले जाते.

७. राम मंदिर, इस्लामकोट :

पाकिस्तानमधील सगळ्यात मोठा राम मंदिर इस्लामकोटमध्ये आहे. भारतामध्ये रामाला मानणारे बहुसंख्य असल्यामुळे इथे मंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. पण पाकिस्तानमध्ये ही संख्या अगदीच नगण्य आहै. पण त्यातही सगळ्यात मोठं राम मंदिर म्हणून इस्लामकोटचे हे मंदिर प्रसिद्ध आहे. सोबतच ही एक अशी जागा आहे, जिथे हिंदू आणि मुसलमान यांची लोकसंख्या जवळपास समानच आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.