हसन अलीने कॅच सोडला यापेक्षाही त्याची बायको भारतीय आहे याचा पाकिस्तान्यांना जास्त राग आहे…

क्रिकेट हा अनेकांच्या पार जिव्हाळ्याची गोष्ट असते. म्हणजे काहींना असं वाटत कि, आपला देश आपली टीम ही नेहमी जिंकलीचं पाहिजे, मग काहीही होऊ देत. आणि नाही जिंकता आलं तर टीमला ट्रोल करणं, एखाद्या खेळाडूला ट्रोल करणं हा नेहमीचाच विषय असतो. पण काही जणांची ट्रोलिंगची पातळी इतकी खाली घसरते कि, खेळाडूंच्या कुटुंबावर, त्यांच्या जाती- धर्मावर आणि पर्सनल आयुष्यावरही भाष्य केलं जात.

आता आपला देश आणि टीम जिंकली पाहिजे ही भावना साहजिकचं आहे, पण भिडू आपण हे सुद्धा समजून घ्यायला हवं कि, हा एक खेळ आहे. 

आता आपल्या देशातचं जेव्हा पाकिस्तानसोबत भारतीय संघाला पराभव सहन करावा लागला.  त्यावेळी कॅप्टन विराट कोहलीला इतकं ट्रोल केलं गेलं, कि त्याच्या मुलीवर बलात्काराची धमकी देण्यात आली. आता तो आरोपी पकडला गेला.  

पण आता असच काहीस चित्र पाकिस्तानमध्येही पाहायला मिळालंय. वर्ल्ड कपच्या यंदाच्या टूर्नामेंटमध्ये एकही सामना न हरलेल्या पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. आता पराभव सगळ्या टीमचा झालाय कोना एकट्याचा नाही, तरी पाकिस्तानच्या या पराभवाला हसन अलीला दोषी ठरवलं जात असून त्याला घाणेरध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. 

तर काल वर्ल्ड कपची सेमीफायनल मॅच होती. ऑस्ट्रेलीया आणि पाकिस्तान यांच्यात हा सामना होता. या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाला १०चेंडूत २० धावांची गरज होती. शाहीन आफ्रिदी मॅथ्यू वेडकडे बॉल टाकत होता आणि त्याने चेंडू लेग साईडच्या खाली बाऊन्स केला. हसन अली धावत आला आणि चेंडूजवळ पोहोचला, तरीही त्याच्या हातातून चेंडू पडला. 

आता गेल्या काही वर्षात पाकिस्तानच्या फिल्डींगचा दर्जा सुधारला आहे, त्यामुळे हसन अली हा कॅच पकडेल अशी सर्वांना अपेक्षा होती पण तसे झाले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्या दरम्यान हसन अलीने मॅथ्यू वेडचा कॅच सोडला आणि मॅथ्यूने याच संधीचा फायदा घेत पुढच्या तीन बोलमध्ये तीन सिक्स  ठोकत ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये नेले. त्याने १७ बॉलमध्ये तब्बल ४१ धावा केल्या.

अर्थातच पाकिस्तान संघाला पराभव सहन करावा लागला. पण आता पाकिस्तानी युजर्सने ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हसन अलीला ट्रॉल करण्याची एक संधी सोडली नाही. 

हसन अलीला पाकिस्तानात ‘देशद्रोही’ म्हटलं जातंय. काहींनी तर हसन अलीला शिया मुस्लिम आहे म्ह्णून आणि त्याची बायको सामीया ही  भारतीय म्ह्णूनही  ट्रोल करायला सुरुवात केली. 

हसन अली आणि त्याची पत्नी सामिया आरजू यांच्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर पाकिस्तानी युजर्सच्या घाणेरड्या कमेंट्स आहेत. कोणी त्याला विचारतयं की,  त्याने सेमीफायनल मध्ये धावा काढण्यासाठी किती पैसे घेतले. काहींनी त्याच्या भारतीय पत्नीला वाईट शब्दाचा वापर करून ट्रोल केले. काही पाकिस्तानी युजर्सनी तर हसन अलीला पाहताक्षणी गोळ्या घालायला हव्यात असंही ट्विटमध्ये म्हटलं.

 

आता ट्रॉलर्सची संख्या जास्त आहे, पण तरी हसन अलीच्या समर्थनार्थ सुद्धा बरेच जण उतरले, ज्यात पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम सुद्धा आहे. बाबर आझमने म्हंटले कि,

“जर कॅच घेतला असता तर परिस्थिती वेगळी असती पण हा खेळाचा भाग आहे. तो माझ्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे आणि त्याने पाकिस्तानसाठी अनेक सामने जिंकले आहेत. खेळाडू कॅच सोडतात पण तो फायटर आहे आणि मी त्याला साथ देईन. प्रत्येकजण दररोज चांगलेच प्रदर्शन करत नाही. एखादा दिवस असा असतो. आज फक्त त्याचा दिवस नव्हता.”

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.