तिसऱ्या देशानं आक्रमण केलं तर, भारत – पाकने एकत्र लढावं अशी जिन्हांची इच्छा होती.

ज्यांनी मुस्लिम राष्ट्र पाकिस्तानची निर्मिती केली, असे मोहम्मद अली जीना यांना भारतीय सैन्यानं आणि आणि पाकिस्तानी सैन्यानं त्यांच्या शत्रुविरोधात खांद्याला खांदा लावून लढावं अशी इच्छा एकदा व्यक्त केली होती. आणि खरं तर पाकिस्तान भारताच्या बाजूनं लढलं ही होतं.

याविषयी कुलदीप नायर सांगतात.

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा पत्रकार कुलदीप नायर लाहोरच्या लॉ कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत होते. त्यांच्या वर्गात हबीब नावाचा काश्मिरी मुलगा मुस्लिम लीगचा सक्रिय सदस्य होता. त्याने कायद्याची  पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून कायदेतज्ञ मोहम्मद अली जीना यांना निमंत्रित केलं.

सुरुवातीला त्याने बिगर मुस्लिम विद्यार्थ्यांना लेक्चरसाठी बोलावलंच नाही. पण ऐनवेळी त्याला समजलं  की अपेक्षित प्रेक्षक सुद्धा आले कार्यक्रमाला आलेले नाहीत. तेव्हा त्याने सर्व बिगर मुस्लिम विद्यार्थ्यांना जाऊन विनंती केली की ‘कायदे -ए-आजम’ यांचं लेक्चर ऐकायला या.

कायदे -ए-आजम ही महात्मा गांधींनी जीना यांना दिलेली उपाधी होती.

यावर कुलदीप नायर हबीबला म्हणाले की तू सुरुवातीलाच जर आम्हाला बोलावले नाहीस तर आता आम्ही तिथं का यावं ? पण हबीब हा नायरांच्या जवळचा मित्र होता, म्हणून त्यांनी जिनांचं लेक्चर ऐकायला जायची तयारी दाखवली. आणि ते गेलेही, पण निम्म्याच्या वर वर्ग रिकामा होता.

ही घटना होती १९४५ ची. म्हणजेच पाकिस्तान स्थापनेच्या दोन वर्षांपूर्वी आणि ब्रिटीशांनी भारत सोडण्यापूर्वीची.

जिनांनी आपलं लेक्चर सुरु केलं. यात त्यांनी आपली नेहमीचीच भूमिका मांडायला सुरुवात केली. जसं की, मुसलमान आणि हिंदू दोन वेगवेगळे राष्ट्र आहे. हिंदू आणि मुस्लिम दोन वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेले आहेत. यांचं खाणं, राहणीमान, कपडे, संस्कृती सगळंच कस वेगवेगळं आहे. आणि म्हणूनचं  मुस्लिमांना स्वतंत्र भूमी कशी गरजेची आहे, हे ते विद्यार्थ्यांना पटवून देत होते.

व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांचा तास सुरु झाला.

यात कुलदीप नायरांनी जिनांना दोन प्रश्न विचारले.

पहिला प्रश्न : हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जर आधीपासूनच इतके वैर आहे तर, धर्माच्या आधारे पाकिस्तान बनल्यानंतर, दोन समुदाय एकमेकांना देखू शकणार नाहीत. यावर प्रत्युत्तरात ते म्हणाले,

खरं तर आपण सर्वात चांगले मित्र होऊ. जर्मनी आणि फ्रान्सने शेकडो वर्षे युद्धे खेळली. आणि तरीही त्यांचे आता चांगले संबंध आहेत.

नायरांचा दुसरा प्रश्न होता : तिसर्‍या देशाने भारतावर आक्रमण केल्यास पाकिस्तानची काय प्रतिक्रिया असेल ?

यावर जीना म्हणाले की, पाकिस्तानी सैनिक कोणत्याही आक्रमणकर्त्यांविरूद्ध त्यांच्या भारतीय भावांसोबत खांद्याला खांदा लावून लढतील. ‘लक्षात ठेव तरूण मित्रा, रक्त पाण्यापेक्षा कधीही दाटच असतं.’

त्यांचे भारतावर असलेले प्रेम द्वेष आयुष्यभर दिसून आले. पण हे व्यक्त करताना ते हे ही विसरले नाहीत की कोट्यावधी मुस्लिम भारतात राहतात.

अनेक वर्षांनंतर, जेव्हा लाल बहादूर शास्त्री गृहमंत्री होते आणि कुलदीप नायर शास्त्रीचें माहिती अधिकारी म्हणून काम करीत होते, तेव्हा शास्त्रींनी नायरांवर विश्वास ठेऊन एक गोष्ट सांगितली होती.

ती म्हणजे १९६२ च्या भारत चीन युद्धात पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून चिनी ड्रॅगनला भारताच्या भूमीतून हटविण्यासाठी मदत केली होते.

आणि त्याच दरम्यान जर पाकिस्तानने काश्मीरची मागणी केली असती तर त्यांना ‘नाही’ म्हणणे कठीण झाले असते.

१९६२ मधले पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयूब खान यांच्यापेक्षा जीनांनी वेगळी भूमिका घेतली असती का ? हे सांगणे कठीण आहे. जर ते असते तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा इतिहास वेगळा आणि मैत्रीपूर्ण झाला असता.

पाकिस्तान धर्मनिरपेक्ष राज्य व्हावे अशी जीनांची इच्छा होती. परंतु कट्टर धर्मांध माथी शांत करण्यात त्यांना यश मिळू शकले नाही. पाकिस्तानची स्थापना झाल्यानंतर, मुस्लिम बहुल धर्मनिरपेक्ष देश असण्याचे जीनांचे स्वप्न जमीनदोस्त झाले. यावेळी जमात-ए-इस्लामी धर्मांध लोक समोर आले आणि पाकिस्तानला मुस्लिम धर्मी देश बनण्यास भाग पाडले.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.