पाकिस्तानतलं सैन्य आता हिंदू अधिकाऱ्यांच्या ऑर्डर्सवर काम करणार

पाकिस्तान सध्या कर्जबाजारी होणाच्या मार्गावर आहे, म्हणजे असंही म्हणायला काही हरकत नाही कि, कर्जबाजारी झालाय. बाकीच्या देशांकडून कर्ज मागून- मागून आपली अवस्था त्यानं पार बेकार करून टाकलीये.

आजकाल तर असं सुद्धा म्हणतात कि, पाकचे पंतप्रधान इम्रान खान एखाद्या देशाच्या दौऱ्यावर जाणार म्हणजे त्यांच्याकडून कर्ज देण्याची मागणी करणार हे फिक्स, त्यामुळे त्या देशांना आतल्या आत पाकला भेटण्याची इच्छा सुद्धा काही होत नाही. पण तरी सुद्धा पाकिस्तान बढाया मारणं काही सोडत नाही. आणि या बढाया सुद्धा कशाच्या आधारावर तर  सैन्य आणि दहशतवादी. असो.. पण आता विषय निघालायचं तर, जसं कि जगभरात स्पष्ट आहे.

 पाकिस्तान इस्लाम धर्मियांशिवाय कुणालाच आपल्या देशात मोठी संधी देत नाही. मग ते राजकारणात असो, कुठल्या मोठया सरकारी पदावर असो, अगदी सैन्यात सुद्धा. 

हिंदू धर्मियांविरुद्ध तर तिथं होणारे अत्याचार सगळ्यांना माहितेय. तसा पाकिस्तानमध्ये हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये सुमारे ७५ लाख हिंदू राहतात. पण त्यांना मोठ्या संधीपासून नेहमी लांब ठेवलं जात. 

पण अशात पाकिस्तानचा हा रेकॉर्ड म्हणा किंवा इतिहास मोडला गेलाय. कारण त्या देशात पहिल्यांदाच  दोन हिंदूंना लेफ्टनन कर्नल पद मिळालंय. डॉ.कैलाश कुमार या लष्कर अधिकाऱ्याने हा रेकॉर्ड मोडलाय. स्वतः पाकिस्तानच्या मीडियाने ही माहिती सांगितलीये. पाकिस्तानी लष्कराच्या प्रमोशन बोर्डाने डॉ. कैलाश कुमार यांना बढती देऊन लेफ्टनन कर्नल पदावर नियुक्त केलंय. 

जसं की आधीच सांगितलं हा एक इतिहास म्हणाला लागेल. कारण पाकिस्तानमध्ये हिंदू धर्माच्या व्यक्तीची लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

डॉ. कैलास कुमार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, कैलास सिंध प्रांतातील थार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. १९८१ साली त्यांचा जन्म झाला. लियाकत विद्यापीठातून त्यांनी एमबीबीएस केले आणि नंतर पाकिस्तान मिलिटरी अकादमीतून पास आऊट झाले. त्यानंतर २००८ मध्ये पाकिस्तानी लष्करात कॅप्टन म्हणून रुजू झाले. 

२०१९ मध्ये कैलाश कुमार पाकिस्तानमधील पहिले हिंदू बनले ज्यांना पाकिस्तानी सैन्यात मेजर म्हणून नियुक्त केले गेले. लेफ्टनन जनरल पदावर बढती मिळण्याआधी ते लष्कराच्या मेडिकल कॉर्प्समध्ये कार्यरत होते. 

महत्वाचं म्हणजे कैलाश कुमार हे एकटेच हिंदू नाही ज्यांना पाकिस्तानी सैन्यात बढती मिळाली त्यांच्यासोबत मेजर डॉ.अनिल कुमार यांचीही लेफ्टनंट कर्नल पदावर नियुक्ती करण्यात आलीये. माहितीनुसार अनिल कुमार सुद्धा सिंध प्रांतातील बदीन येथील रहिवासी आहेत. त्यांनी कैलास यांच्या एक वर्ष आधी  म्हणजे २००७ मध्ये आर्मी जॉईन केली होती. जरी ते कैलास यांच्यापेक्षा लहान आहेत. 

हा आता पाकिस्तानच्या मीडियाने जरी याबाबत माहिती दिली असली, तरी पाकिस्तानकडून या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. पण माहितीनुसार पाकिस्तानी सैन्यात २००० सालापर्यंत हिंदू किंवा इतर अल्पसंख्याकांना सैन्यात सामील होण्याची परवानगी नव्हती.  

आता तस पाहिलं तर कोणत्या जाती- धर्माचा आणि कामाचा काही समबंध नसतो. पण मुस्लिम बहुल पाकिस्तानात एखाद्या हिंदू व्यक्तीला संधी मिळतेय म्हंटल्यावर सोशल मीडियावर या गोष्टीची मोठी चर्चा होतेय. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.