“प्रधानसेवक” हा शब्द नेमका कोणाचा ?

काल नांदेड येथे झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मोदी आणि अमित शहा यांच्यावर तोफ डागली. राज ठाकरे आत्ता महाराष्ट्रभर सभा घेत असून त्यांना लोकांचा मिळणारा पाठिंबा देखील विलक्षण आहे असच म्हणावं लागतं. असो, तर या नांदेड येथील सभेत राज ठाकरे म्हणाले की,

मोदी स्वत:साठी वापरत असलेलं विशेषण देखील नेहरूचं असल्याचा दावा त्यांनी केला. सोशल मिडीयात देखील चर्चा झडू लागल्या की, प्रधानसेवक हा शब्द नेमका कोणाचा ? 

पण काळजी नको,

जिथे कमी तिथं आम्ही या तत्वावर आम्ही सांगत आहोत प्रधानसेवक शब्दाच्या मागचा खराखुरा इतिहास. 

२०१४ ला नरेंद्र मोदी सत्तेत येताच त्यांनी स्वत:ला प्रधानमंत्री नाही तर प्रधानसेवक म्हणण्यास सुरवात केली. शासकीय कारभारात देखील प्रधानसेवक असा उल्लेख करण्यात येवू लागला. आजवर प्रत्येक प्रधानमंत्र्याने स्वत:चा उल्लेख प्रधानमंत्री असाच करून घेतला अस सांगण्यात आलं. देशाच्या इतिहासात आजवर जे झालं नाही ते झालं, मोदींचे पाय जमिनीवर असल्याचे दाखले देण्यात येवू लागले. आणि “प्रधानसेवक” हा शब्द मोदींनीच वापरला असल्याचं सांगण्यात आलं.

पण तस नाही या शब्दाचा इतिहास जोडला गेला आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून.

दिल्लीतील त्रिमुर्ती भवन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच निवासस्थान. या निवासस्थानी एक पोटी लावण्यात आली आहे. खालील फोटोत ती पाटी तुम्ही पाहू शकता.

twitter

यात लिहलय की, 

“लोग मुझे भारत का प्रधान-मन्त्री कहते है ! लेकिन यह अधिक उचित होता यदि वे मुझे भारत का प्रथम सेवक समझते”

अर्थात “लोक मला प्रधानमंत्री म्हणून बोलवतात, पण त्याहून अधिक चांगल होईल जर ते मला प्रधानसेवक म्हणाले” अर्थात त्यांनीच प्रधानसेवक हा शब्द पहिल्यांदा सुचवल्याचे दिसून येते. प्रधानसेवक या शब्दावर नेहरूंचा जोर होता. मात्र दूसरीकडे हे देखील विसरून चालणार नाही की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पश्चात सत्तेवर आलेल्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या कोणत्याच नेत्याने प्रधानसेवक हा शब्द स्वत:साठी वापरून घेतला. याच कारणामुळे प्रधानसेवक हा शब्द लोकांच्या विस्मृतीत गेला. मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं विशेषण स्वत:च्या नावावर घेतलं जरी असेल तरी त्यासाठी सत्तेत आलेले कॉंग्रेस पक्षाचे इतर पंतप्रधान देखील त्यास कारणीभूत ठरलेत असच वाटतं.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.