नीरव मोदीची बहीण म्हणते, माझे सगळे पैसे घ्या खरं शिक्षा काय देऊ नका.

पँडोरा पेपर्समध्ये सतत नवनवीन खुलासे होतायत. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र याची चौकशी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदी हिने पँडोरा पेपर्समध्ये नाव आल्यानंतर तिच्या स्विस बँक खात्यात असणाऱ्या सुमारे २७५ कोटी रुपयांची ऑफर भारत सरकारला दिली आहे.

अग्गाय्याय…भारत सरकारला ऑफर. ऐकलंय का कधी असं कुठं? की चोराने सावाला ऑफर दिलीय ते. विषय हार्ड केलाय नीरव मोदीच्या बहिणीने. भाई से बहन सवाई असचं म्हणायला पाहिजे आता. 

आणि विशेष म्हणजे  भारत सरकार पूर्वी मोदीच्या या ऑफरचा विचार करत आहे. सरकार तिच्या खात्यांची संपूर्ण माहिती तिच्याकडून घेईल. त्या बदल्यात तिला शिक्षेतून आंशिक किंवा पूर्ण माफी मिळू शकते.

इंडियन एक्सप्रेसने ४ ऑक्टोबर रोजी खुलासा केला होता की,

नीरव मोदी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळून जाण्याच्या काही महिन्यांपूर्वी, त्याची बहीण पूर्वीने ब्रिटिश व्हर्जिन बेटांवर ब्रूकटन मॅनेजमेंट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीने तिच्या सिंगापूरस्थित कंपनीच्या ठेवी ट्रस्टचे संरक्षक म्हणून काम केले.

म्हणजेच ती तिच्या सिंगापूर कंपनीचे पैसे या कंपनीकडे वळवत असे. मात्र, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समध्ये पूर्वीने दिलेल्या कागदपत्रांमध्ये असे म्हटले आहे की, ब्रूकटन कंपनीत जमा केलेले सर्व पैसे तिच्या वैयक्तिक उत्पन्नातून आणि तिच्या पगारामधून होते. फायरस्टार नावाच्या फर्मची क्रिएटिव्ह डायरेक्टर असताना तीने हे उत्पन्न मिळवलं होत असं ती म्हंटली. फायरस्टार ही तिचीच फर्म आहे. आणि या कंपनीवर पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मात्र, पूर्वी मोदीच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. आणि वरून काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.

आता ज्यांना पेंडोरा पेपर्स म्हणजे काय आहे हेच माहित नाही त्यांनी हे वाचा..

पेंडोरा पेपर्स हे बेसिकली लीक झालेल्या कागदपत्रांचे बंडल आहे. सुमारे १ कोटी २० लाख कागदपत्रे लीक झाली आहेत. यात ११७ देशांतील ६०० हून अधिक पत्रकारांनी या कागदपत्रांची तपासणी केली आहे.

या पत्रकारांनी इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्स, ICIJ अंतर्गत ही कागदपत्र १४ सेवा पुरवठादार कंपन्यांशी संबंधित स्त्रोतांकडून गोळा केली आहेत. ज्यांनी कर चुकवणाऱ्या या चोरांना ऑफशोर कंपनी स्थापन करण्यास मदत केली.

यावरून हे उघड झाल की जगातील भली भली, नावांजलेली श्रीमंत आणि शक्तिशाली लोक कर चुकवण्यासाठी आपली संपत्ती लपवत आहेत. ३८० भारतीयांची नावेही या यादीत आहेत. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने या यादीतील ६० प्रमुख कंपन्या आणि लोकांच्या नावांची पोलखोल केली आहे. या नावांत राजस्थानच्या दोन मोठ्या राजघराण्यातील लोकांची नावेही उघड झाली आहेत. त्यात जोधपूरचे माजी महाराजा गजसिंग, आणि दुसरे उदयपूरचे माजी महाराणा अरविंद सिंग यांची नाव आहेत.

पहिल्या टप्प्यात तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पण होता, बरं का ! नाही ते आपलं आठवलं म्हणून सांगितलं. आम्ही विसरत नाही तुम्ही पण विसरु नका म्हणजे झालं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.