पँडोरा पेपर्स लिक प्रकरणात नेमके अदानी-अंबानीचे भाऊच गोत्यात आलेत.

काही वर्षांपूर्वी पनामा पेपर्स लीक प्रकरणानंतर आता पँडोरा पेपर्स प्रकरण समोर आलं आणि या प्रकरणाने जशी जगभरात खळबळ माजवली आहे तशीच भारतात देखील खळबळ माजली आहे. मागच्या पनामा पेपर्स लिक मध्ये विजय माल्या तसेच अभिनेते अमिताभ बच्चन  याचं नाव समोर आलेलं. अन आता यात क्रिकेटर सचिन तेंडूलकरचं नाव देखील चर्चेत आहे.

ICIJ या संस्थने गौप्यस्फोट केलाय कि, भारतातील काही श्रीमंत लोकं यात गोवली आहेत. या पेपर्समध्ये ३८० भारतीयांची नावं आहेत. त्या ३०० नावांच्या यादीत सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव म्हणजे क्रिकेटर सचिन तेंडुलकर. पण यापेक्षाही जास्त चर्चेत आहे ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अदानी ग्रुप. 

मोठ्या उद्योगपतींच्या भावांची नावं या पँडोरा पेपर्स मध्ये आहेत.

या प्रकरणात, भारतातील दोन मोठ्या उद्योगपती घराण्यांशी संबंधित लोकांची नावे समोर आली आहेत. त्यापैकी एक म्हणजे विनोद अदानी जे अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांचे मोठे भाऊ आणि दुसरे म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक अनिल अंबानी. 

सुमारे १ कोटी २० लाख कागदपत्रांचा आधार घेत हे तपास करण्यात आला आणि पँडोरा पेपर्स हे प्रकरण समोर आणलं. जगभरातल्यावेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या समूहाने यात सहभाग घेतला होता आणि हे सत्य समोर आणलं. यात भारताच्या बाजूने इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाने सहभाग घेतला होता. कित्येक महिन्यांच्या तपासानंतर हा अहवाल जगभरातल्या वृत्तपत्रात तसेच भारतातल्या ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये सविस्तरपणे छापण्यात आला आहे. हा अहवाल आला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.  

‘टॅक्स हेवन’ म्हणजेच कमी कर असणाऱ्या तसेच करसवलत असणाऱ्या देशांमध्ये कंपन्या उघडून श्रीमंत भारतीयांनी मनी लॉन्ड्रिंग आणि कर “चोरी” केली आहे म्हणजेच थोडक्यात कर चुकवला आहे. या यादीत मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी आणि गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी यांचेही नाव त्यात असल्याचा गौप्यस्फोट या संस्थेने केला आहे.

दरवेळेस ‘मी कर्जबाजारी’ आहे असं जाहीरपणे म्हणणारे, अनिल अंबानी यांची परदेशात कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक आहे.

अनिल अंबानी याचं बोलायला गेलं तर, २०२० मध्ये चीनच्या तीन सरकारी बँकांनी त्यांच्यावर ब्रिटिश न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याच्या वेळेस न्यायालयाने अंबानींच्या परदेशी मालमत्तेबद्दल प्रश्न विचारले होते.  तेंव्हा त्यांनी न्यायालयात सांगितलं होतं कि, जगभरातील कुठल्याही कंपनीत आपली मालमत्ता किंवा आर्थिक हितसंबंध नाहीत.

यानंतर तीन महिन्यांनी, न्यायालयाने अनिल अंबानींना बँकांना ७१६ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ५३२  कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. पण त्याने तसे केले नाही आणि सांगितले की त्याच्याकडे ना परदेशात मालमत्ता ना कसले उत्पन्न मिळत आहे. त्यांनी असंही म्हणलं होतं कि, मी कर्जबाजारी आहे. मी दिवाळखोर झालो आहे इत्यादी. त्यांच्या या जबाबानंतर काहीच काळात त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, सायप्रस येथे १८ परदेशी कंपन्यांमध्ये कोटय़वधी डॉलर्सची गुंतवणूक केल्याचे समोर आलं होतं. 

पँडोरा पेपर्सचे खुलासे पाहता असं दिसतंय कि, कारण त्यांची परदेशात बरीच संपत्ती आहे, अनिल अंबानी यांनी न्यायालयाला जे सांगितले ते सपशेल खोटे सांगितले होते. 

पँडोरा पेपर्सच्या तपासात असं समोर आलंय कि, अनिल अंबानी ग्रुप चे अध्यक्ष अनिल अंबानी आणि त्यांचे प्रतिनिधींच्या नावे जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन बेटे आणि सायप्रससारख्या ठिकाणी किमान १८ विदेशी कंपन्या आहेत. त्यांची स्थापना २००७ ते २०१० दरम्यान झाली आणि यापैकी सात कंपन्यांनी कमीत कमी $ १.३ अब्ज म्हणजे सुमारे ९.६ हजार कोटींची गुंतवणूक आणि कर्ज घेतले होते.

जर्सीमध्ये अनिल अंबानी यांच्या नावावर बॅटिस्टे अनलिमिटेड, रेडियम अनलिमिटेड आणि ह्युई इन्व्हेस्टमेंट अनलिमिटेड अशा तीन कंपन्या आहेत. ह्या सर्व कंपन्या २००७ आणि २००८ मध्ये तयार केल्या गेल्या आहेत.

यातली बॅटिस्टे अनलिमिटेड या कंपनीची मालकी रिलायन्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे. आणि या कंपनीची मालकी एडीए ग्रुपकडे आहे जी कि, अनिल अंबानी त्याचे मालक आहेत. अन दुसरी कंपनी म्हणजेच, ह्युई इन्व्हेस्टमेंट अनलिमिटेड ची मालकी एएए एंटरप्राइस लिमिटेडकडे आहे, याच कंपनीला २०१४ पासून रिलायंस इंसेप्टम प्रायव्हेट लिमिटेड म्हणूनही संबोधले जाते. आणि याचे प्रमोटर रिलायंस कॅपिटल आहे.

२००८ ला जर्सीमध्ये समरहिल लिमिटेड आणि डुलविच लिमिटेड अशा २ कंपन्या स्थापन केल्या होत्या. या अनूप दलाल या व्यक्तीच्या नावाने आहेत जे कि,अनिल अंबानींच्या कंपनीचे सदस्य असून  त्यांचा सल्लागार म्हणून गुंतवणुकीसाठी ऑफशोर कंपन्या स्थापन करायचे त्यांचे काम होते. या अहवालानुसार,अनूप दलाल यांनी रिलायन्ससाठी ९ कंपन्या स्थापन केल्या.

थोडक्यात मुद्दा हा आहे कि, या सर्व कंपन्या अनिल अंबानींशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंधित आहेत.

वॉशिंग्टनमधील इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्स (ICIJ) या संस्थेने  या तपासाचं मिशन हाती घेतलं होतं. या संस्थेने आतापर्यंत जागतिक पातळीवरचे अनेक मोठे  तपास पूर्ण केलेत.

विनोद अदानी जे कि, गौतम अदानीचे भाऊ आहेत यांचं देखील नाव या यादीत असल्याचं समोर आलं आहे. 

विनोद अदानी याचे नाव पनामा पेपर्स लीकमध्येही आले होते. इंटरेस्टिंग म्हणजे विनोद अदानी नाव एकाच आठवड्यात २ याद्यांमध्ये आलेय. पहिली यादी म्हणजे जलद कमावणाऱ्यांची आहे आणि दुसरी पँडोरा पेपरमधील ब्रिटिश व्हर्जिन बेटांमध्ये उघडणाऱ्या कंपन्यांच्या यादीत आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, २०२० मध्ये गौतम अदानीची संपत्ती ३२ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २४००  कोटींवर पोहोचलीये. त्याचबरोबर गौतम अदानीचा भाऊ विनोद यांची संपत्ती १२८ टक्क्यांनी वाढून ९.८ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ७२८ कोटी रुपये झाली.

त्यांचं पँडोरा पेपर मध्ये नाव येण्याचं कारण म्हणजे,

विनोद अदानी यांनी ३ वर्षांपूर्वी ब्रिटिश व्हर्जिन बेटांमध्ये एक कंपनी उघडली. मात्र, आता ते म्हणत आहेत कि, त्यांनी हि कंपनी केंव्हाच बंद केली आहे. २०१८ मध्ये त्यांनी ब्रिटिश व्हर्जिन बेटांमध्ये हिबिस्कस आरई होल्डिंग्स लिमिटेड नावाची एक कंपनी उघडली होती. या कंपनीत ते एकमेव हिस्सेदार होते. त्यांच्याकडे ५० हजार शेअर्स होते. तसेच २०१८ पर्यंत ते या कंपनीचे संचालकही होते.

कंपनी स्थापन करतांना विनोद अदानी म्हणाले होते की, कंपनीचे काम हे जागतिक बाजारपेठेत व्यापार आणि सेवा पुरवणे आहे. त्यावेळी कंपनीची एकूण मालमत्ता जवळपास १५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ८०  ते १०० कोटी रुपये होती. बर टॅक्स हेवन इन्व्हेस्टमेंट प्रकरणात विनोद अदानी यांचे नाव गोवल्याची   ही पहिली वेळ नाही. यापूर्वी पनामा पेपर्स लीकमध्येही त्यांचे नाव आले होते.  १९९४ मध्ये बहामासमध्ये स्थापन झालेल्या कंपनीमध्ये त्यांचे नाव सामील झाल्याचे इंडियन एक्सप्रेसने २०१६ मध्ये त्यांच्या एक वृतात माहिती दिली होती.

हि दोन घराणे तर यात गोवले गेलेत हे नक्कीच पब आणखी कुणा-कुणाचे नावं समोर येतात हे पाहणं आता महत्वाचं झालं आहे. 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.