काँग्रेसनं तिकीट नाकारलं म्हणून मुख्यमंत्री चन्नी यांचा भाऊच अपक्ष लढणारंय

पंजाबमध्ये इलेक्शनचा वातावरण सेट झालंय. शेतकरी आंदोलन आणि अकाली दल आणि भाजप यांच्यात झालेली ताटातूट यामुळं खरा मुकाबला हा सत्ताधारी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोन पक्षांमध्येच असल्याचं जाणकार सांगतायत.

एकीकडे ही लढत असताना काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळं काँग्रेस VS काँग्रेस अशी फाईटही देशाचं लक्ष वेधून घेतेय. 

मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी विरुद्ध  मुख्यामंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे नवज्योतसिंग सिद्धू ही अशीच एक पक्षांतर्गत लढत.सुरवातीला नवज्योतसिंग सिद्धू यांनी चरणजित सिंग चन्नी हे काँग्रेस हायकमांडने पाठवलेले रबर स्टॅम्प मुख्यमंत्री असल्यासारखं वागण्यास सुरवात केली. मात्र चन्नी यांनी हा शिक्का पुसून टाकण्यास आणि आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यास यशस्वी झाले. वेळोवेळी त्यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांनाही हिसका दाखवला आहे. त्यामुळं हा वाद टोकाला पोचला आहे.

आता या मुकाबल्याचा पहिला राऊंड चालू झाला विधासभेच्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यावरून. 

आपापल्या समर्थकांची यादीत वर्णी लावून निवडणुकांनंतर आपली मुख्यमंत्री पदाची दावेदारी प्रबळ करण्याचा  नवज्योतसिंग सिद्धू आणि चरणजित सिंग चन्नी या दोघांचंही प्रयत्न चालू आहे. 

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पहिल्याच यादीती प्रमुख नावं वगळल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या राज्य युनिटमध्ये असंतोष निर्माण झाला. विशेषत: मानसा, मोगा, मलोत आणि बस्सी पठणा या विधानसभा मतदारसंघात असंतोष दिसून येत आहे. 

त्यापैकी बस्सी पठाण या आरक्षित मतदार संघातून मुख्यमंत्री चन्नी यांचे सख्खे भाऊ उत्सुक होते. 

मात्र मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांचे बंधू मनोहर सिंग यांना आगामी निवडणुका लढवण्यासाठी तिकीट नाकारण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमधून वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा दिलेले मनोहर सिंग हे बस्सी पठाणातून निवडणूक लढवण्याच्या इच्छेवर होते. त्याऐवजी काँग्रेसने बस्सी पठाना विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार गुरप्रीत सिंग जीपी यांना उमेदवारी दिली आहे. 

डॉ. मनोहर यांनी विद्यमान आमदार गुरप्रीत सिंग जीपी, पीपीसीसी प्रमुख नवज्योत सिद्धू आणि इतर काही जणांवर आपल्या विरोधात षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे.

 मुख्यमंत्री स्वतः आपल्या भावाच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होते.

एव्हढंच नाही तर गडशंकरमधून चन्नी यांनी पाठिंबा दिलेल्या निमिषा मेहता यांचाही टीकीट कापण्यात आलंय. निमिषा यांनी आज मग भाजपमध्ये प्रवेश केला आहे.बस्सी पठाणा आणि आदमपूरच्या बाबतीत, तिकिट वाटप हा चन्नी आणि सिद्धू यांच्यातील प्रतिद्वंद्वाचा परिणाम म्हणून पाहिला जात आहे. तर पक्ष उमेदवारांच्या निवडीचे कारण म्हणून “विनिबिलिटी सर्वे “असल्याचं सांगितलं जात आहे. 

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “दबाव निर्माण करून काँग्रेसला काही जागांवर, विशेषत: दोआबातील तिकीट वाटपाचा आढावा घेण्यास भाग पाडले जाऊ शकते.”

त्यामुळं या पक्षांतर्गत धुसपूसीची किती किंमत काँग्रेसला चुकवावी लागतेय हे येणाऱ्या निवडणुकांतच कळेल.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.