पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांचा व्हायरल फोटो काय अभिमानाची नाही शरमेची बाब आहे.

स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्ष झाली आहेत. मात्र देशातील अनेक दुर्गम भागात बेसिक गोष्टींचा वणवा आहे. मात्र त्यातील एक गोष्ट गावापर्यंत पोचली की, लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करणारे बॅनर जागो जागी लावण्यात येते. ज्या गोष्टीची खंत वाटायला पाहिजे त्याबद्दल अभिमान बाळगणारा आपला समाज आहे.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत तर पंजाब हे राज्य हे सधन म्हणून गणले जाते. पंजाब कॉंग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून कॉंग्रेसचे दलित शीख नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री केले.

उत्तरप्रदेश मध्ये दलित मतदारांची संख्या अधिक आहे. देशभरातील सर्वच पक्षाचे लक्ष हे उत्तरप्रदेश विधनासभा निवडणुका लागले आहे. असं सांगण्यात येते की, आगामी काळात उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊनच चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्री निवड करण्यात आली आहे.

चन्नी पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यापासून सोशल मिडीयावर यांचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

त्यातील एका फोटो मध्ये चन्नी हे विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करत असल्याचे पाहायला मिळते.
पंजाब बरोबरच उत्तरप्रदेश मधील कॉंग्रेस नेत्यांनी हा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. तसेच उत्तरप्रदेश कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख शहनवाज आलम यांनी हा फोटो चन्नी यांना हा टॅग केला आहे. त्यात जनतेची सेवा कशी करावी हे पंजाबच्या मुख्यमंत्र्याकडून शिकायला हवी.

चरणजीत चन्नी यांनी जे काम करून दाखविले आहे ते आज पर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केले नाही. यालाच जनतेचा मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी तोडलेले विजेचे कनेक्शन स्वतःहा जोडून जनतेच्या घरात उजेड पाडला आहे. पंजाबच्या जनेतेचे अभिनंदन.

अशा प्रकारे अनेकांनी सोशल मिडीवर चन्नी यांचे अभिनंदन केले आहे. मात्र यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की, यात मुख्यमंत्र्याचे अभिनंदन करण्यासारखी कुठली गोष्ट आहे. जर एखाद्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना विजेच्या कनेक्शनसाठी खांबावर चढण्याची वेळ येत असेल तर ही बाब अभिनंदनाची कशी काय असू शकते.

मुख्यमंत्र्यांना केवळ एखाद्या दुसऱ्या खांबावर चढून कनेक्शन जोडता येतील. याचा असा अर्थ होतो की, पंजाब येथील वीज विभाग हा अकार्यक्षम आहे. अथवा या विभागावर मुख्यमंत्र्याचे नियंत्रण नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे विजेच्या खांबावर चढण्या ऐवजी त्यांच्या आदेशावर संबधित विभागाने त्वरित काम करायला हवे. मात्र या फोटो संदर्भात जोडण्यात येणारे संदर्भ पूर्णपणे चुकीचे आहे. विजेच्या खांबावर चढणारे व्यक्ती चन्नीचं आहेत.

मात्र तो व्हायरल झालेला फोटो हा पाच वर्ष जुना आहे.

चन्नी हा फोटो विधनासभा निवडणुकीपूर्वीचा आहे. तेव्हा चन्नी हे विरोधीपक्षनेता होते. त्यावेळी पंजाबच्या वीज विभागाने मोठ्या प्रमाणात गावातील वीज कनेक्शन तोडले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी चन्नी यांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यांनी कुराली या गावात विजेच्या खांबावर चढले होते आणि अकाली सरकारकडे शेतीसाठी मोफत वीज उपलब्ध करून दिली आहे.

त्याच प्रमाणे गावकऱ्यांना सुद्धा मोफत वीज द्यावी अशी मागणी केली होती. असं म्हणतात की, चन्नी यांचा निवडणुकीसाठी स्टंट होता. मात्र लोकांना याबाबत आस्था वाटली होती. त्यानंतर अकाली दल आणि भाजपचे सरकार गेले आणि त्याऐवजी कॉंग्रेसचे सरकार आले. आणि मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांची निवड झाली होती.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.