ज्या पदावरून सिद्धू यांनी राजीनामा दिलेला आता तोच वापस घेतलाय .
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतलाय. हो, ज्या पदाचा त्यांनी राजीनामा देऊन पंजाब कॉंग्रेस मध्ये खळबळ माजवली होती तोच राजीनामा त्यांनी मागे घेतला आहे. राजीनामा देतांना सिद्धू म्हणाले, “ज्या दिवशी पंजाबला नवीन AG मिळेल, त्याच दिवशी पुन्हा पदभार स्वीकारणार”
नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्याच्या अवघ्या ७२ दिवसानंतर राजीनामा दिला होता. त्याच्या एक आठवड्या पूर्वी पंजाबमध्ये चरणजीतसिंग चन्नी यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं होतं. मात्र त्यानंतरच लगेचचं सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने देशभरात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहून हा राजीनामा पाठवला आहे. यात त्यांनी म्हंटलं होतं कि, मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. परंतु, पंजाब काँग्रेसच्या वाढीसाठी मी कार्यरत राहणार तसेच मी काँग्रेसचा विकासाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही”.
त्यामुळे सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तरी काँग्रेसमध्येच सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तसे ते आहेत देखील सक्रीय, आणि आत्ता राजीनामा मागे घेतल्यामुळे त्यांच्या पक्षांतरावर चर्चा देखील थांबल्या आहेत.
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी वाद झाल्यानंतर सरकार स्थापनेनंतर काही दिवसांनी सिद्धू यांनी राजीनामा दिला होता. यादरम्यान त्यांनी सांगितले की, ज्या दिवशी राज्याला नवीन एजी मिळेल त्याच दिवशी पंजाब प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.
चन्नी मुख्यमंत्री झाल्यानंतर काही दिवसांनी सिद्धू यांनी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस हायकमांडने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. पत्रकार परिषदेत बोलतांना, सिद्धू म्हणाले की ज्या दिवशी पंजाबला नवीन महाधिवक्ता (एजी) मिळेल, त्या दिवशीच ते पदभार स्वीकारतील. ते असेही म्हणाले की “तुम्ही सत्याच्या मार्गावर असता तेव्हा एका पोस्टने काही फरक पडत नसतो.
हे एजी भानगड काय आहे ?
अॅडव्होकेट जनरल एपीएस देओल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि पंजाब सरकारने पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती करणाऱ्या अशा १० नावांची एक लिस्ट केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवल्यानंतर सिद्धू यांचा निर्णय आला आहे.
सिद्धू यांच्या राजीनाम्यामागचे एक कारण म्हणजे काँग्रेस सरकारने ज्येष्ठ वकील एपीएस देओल यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली होती. यामुळे सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले, कारण देओल हे माजी डीजीपी सुमेधसिंग सैनी यांचे वकील होते. त्यामुळे याच मुद्द्यावरून संतापात सिद्धू यांनी राजीनामा थेट सोनिया यांना पाठवला होता.
सिद्धू यांची १९ जुलै रोजी पंजाब काँग्रेसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. कॅप्टन-सिद्धू वाद संपुष्टात आणण्यासाठी त्यांन पद देण्यात आलं होतं मात्र तरीही हा वाद कायम राहिला. त्यात आणखी एक भर त्याच्या काहीच दिवसांनी कॅप्टनने पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री केले. ह्या अशा पंज्ब कॉंग्रेस मध्ये घडामोडी घडत राहिल्या…
चन्नी सीएम झाल्यानंतर सिद्धू काही दिवस शांत होते, पण काही दिवसानंतरच त्यांचा चरणजीत सिंह चन्नी यांच्याशीही त्यांचा वाद झाला.
नव्या सरकारमध्ये मंत्र्यांना खात्यांचे वाटप केल्याने सिद्धू संतापले होते, त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते.
हे ही वाच भिडू:
- भाजप म्हणतंय राहुल गांधींच्या हातात पक्षाची कमान द्या, आम्हाला फायदा आहे
- एकेकाळी टीम राहुल गांधी म्हणून मिरवणाऱ्या तरुण तुर्कांचं सध्या काय चालू आहे?
- राहुल गांधी होणे सोपी गोष्ट नाही.