भाजपचा माधव पॅटर्नच पंकजा मुंडेंना तारणार…!
“जनतेच्या मनातील मीच मुख्यमंत्री”, असे विधान करणाऱ्या पंकजा ताईंनी अलीकडेच थेट मोदींना आव्हान दिलं कि, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत”. यानंतर लागलीच दुसरं विधान आलं.. “सध्या मी बेरोजगारच आहे…
थोडक्यात असं वक्तव्य करून पंकजा मुंडेंनी आपल्याच पक्षाला टोमणा मारलाय… पण अशी विधानं करून पंकजा मुंडे कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न का करत असतील ?
वेळोवेळी राज्य नेतृत्वाला टोचून बोलण्याची पंकजा मुंडे एकही संधी सोडत नाहीत. त्यात बोलण्याच्या ओघा-ओघात थेट मोदींनाच त्यांनी आव्हान दिलं. इतकं सगळं होऊनही पक्षाकडून पंकजा मुंडे यांना महत्त्व दिलं जातं. त्यांच्या वादग्रस्त विधानांची पाठराखण केली जाते. राष्ट्रीय सचिवपदी संधी देण्यात येते. तेच महत्वाचे नेते असूनही एकनाथ खडसेंना भाजपने सपशेल बाजूला केलं तसं पंकजा मुंडेंबाबत झालं नाही.
पंकजा मुंडे दुखावणार नाहीत याची काळजी वेळोवेळी पक्षाकडून घेण्यात आणि त्यामागचं कारण आहे भाजपचा ‘माधव’चा प्रयोग. भाजपचा ‘माधव’चा प्रयोग काय आहे ? या प्रयोग पुन्हा राबवायचा असेल तर त्यासाठी पंकजा मुंडे महत्वाच्या ठरतात कशा ??? जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा.