अग्रवाल ट्विटरचे सीईओ काय झाले सिंगर श्रेया घोषाल ट्रेंड करू लागली

कायमच चर्चेत राहणारी वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरने कालच एक मोठी घोषणा केली. कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिल्याची खळबळजनक घोषणा केली….आणि लागलीच डॉर्सी यांच्यानंतरचा उत्तराधिकारी म्हणून एका भारतीयाची निवड केली…त्यांचं नाव म्हणजे सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पराग अग्रवाल यांना नियुक्त करण्यात येणार आहे.
मुळचे भारतीय असणारे पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतलीय. ट्वीटर व्यतिरिक्त त्यांनी याहू, माइक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपनीमध्ये काम केलंय.
आता या बातमीनंतर पराग अग्रवाल हे सोशल नेटवर तुफान चर्चा आहे. पण अचानक चर्चेत आलेले पराग अग्रवाल नक्की आहेत हे आता सर्वांना माहिती झालंय मात्र पराग अग्रवाल यांच्यामुळे आता आपली सर्वांची लाडकी श्रेया घोषाल चर्चेत आलीये..पराग यांची सीईओ नियुक्ती झाल्यानंतर दोघांचे जुने ट्विट व्हायरल होत आहेत.
ट्विटर युजर्सने पराग अग्रवालचे बॉलीवूड गायक श्रेया घोषालसोबतचे कनेक्शन शोधून काढले आणि त्यानंतर पराग आणि श्रेया घोषाल यांचे ११ वर्ष जुने ट्विट व्हायरल होऊ लागलेय.
नेमकं पराग अग्रवाल आणि श्रेया घोषाल कनेक्शन काय आहे हा प्रश्न तुम्हालाही पडला असणारे ?
सहजीकच आहे आता मोठ्या कंपनीचा पराग अग्रवाल जर सीईओ झाले तर सर्वच त्यांना अभिनंदन करणार, सुभेच्छा देणार..त्यातच त्यांची जुनी मैत्रीण श्रेया घोषाल सहभागी झाली. तिने एक ट्वीट करत पराग ला सुभेच्छा दिल्यात.,,”अभिनंदन पराग, आम्हाला तुझा अभिमान आहे. आमच्यासाठी हा एक महत्वाचा दिवस आहे”.
Congrats @paraga So proud of you!! Big day for us, celebrating this news♥️♥️♥️ https://t.co/PxRBGQ29q4
— Shreya Ghoshal (@shreyaghoshal) November 29, 2021
पराग आणि श्रेया लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यांचे जुने फोटो देखील आता ट्विटरवर व्हायरल झाले आहेत….या आधी देखील २०१० तिने दोघांचा फोटो ट्वीट केला होता. पराग अन श्रेया हे बचपन के दोस्त आहेत.
कोण आहेत पराग अग्रवाल ??
पराग अग्रवाल २०११ पासून ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ट्विटरसोबत काम करायला सुरुवात केली तेंव्हा ट्विटर कंपनीत हजाराहून कमी कर्मचारी होते. त्यांनी २०१७ मध्ये कंपनीचे सीटीओ म्हणजेच मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. आता पराग अग्रवाल हे ट्विटरचे नवे सीईओ असतील. पराग हे आयआयटी बॉम्बेचा पदवीधर आहेत आणि त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेटची पदवी घेतली आहे.
२०१९ मध्ये, ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी पराग यांना प्रोजेक्ट ब्लूस्कीचे प्रमुख म्हणून नियुक्त केले. त्यानंतर ते या मोठ्या पदापर्यंत पोहचले…याचा आपल्या सर्व भारतीयांना अभिमान आहे.
हे हि वाच भिडू :