पण त्याला वाचवायला एकही जण पुढे आला नाही.

फोटो पाहिला ?

कसा वाटला? माणूसकी हरवल्याची जाणिव झाली. कोरोना काळात माणूसकी हरवण्याची गोष्ट सामान्य झाली आहे. एखाद दुसरं उदाहरणं अस दिसतं की आपण म्हणतो, वाह् काय चांगल काम केलय.

पण बहुतांश ठिकाणी लोक आपआपला स्वार्थ साधतानाच दिसत आहेत.

अशीच एक गोष्ट मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. आत्ता मध्यप्रदेश म्हणल्यानंतर तुम्ही लगेच राजकिय होणार. तिथे सत्तेत असणाऱ्या लोकांना पोटभरून शिव्या घालणार, पण भिडू लोकांनो हे सगळ्याच राज्यात चालू आहे. सत्तेत कोण आहे हे महत्वाचं नाही तर माणूस माणूसकी विसरून गेला आहे हे महत्वाच आहे.

तर हा एकंदरीत प्रकार काय आहे ?

सागर जिल्ह्यातल्या बुंदेलखंड मेडिकल कॉलेजचा स्टाफ कोरोना पेशंटला शिफ्ट करण्याच्या कामात गुंतला आहे. पीपीए किट घालून हा स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला जिल्हा रुग्णालयात भरती करण्याच काम करतो.

या स्टाफमध्ये नर्स असतात, डॉक्टर असतात, ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर असतात तसेच स्ट्रेचर उचलणारे कर्मचारी असतात.

असाच एक कर्मचारी हिरालाल प्रजापती गश.

उन्हाळ्याच्या ४५ डिग्री तापमानात हा व्यक्ती गंभीर असणाऱ्या कोरोना पेशंटला स्ट्रेचरवर ठेवण्याचं, ॲम्ब्युलन्स सोबत जिल्हा रुग्णालयात घेवून जाण्याच काम करतो.

झालं अस की रोजच्या प्रमाणे सर्व स्टाफ कोरोना पेशंटला रुग्णालयात भरती करत होता. दिवसभरात दोन पेशंटना भरती करण्यात आलं. दूपारी २ च्या दरम्यान अचानकपणे काम करत असताना हा व्यक्ती चक्कर येवून पडला.

PPE किट घालून अशा अवस्थेत काम केल्यामुळे या व्यक्तीला डिहायड्रेशनचा त्रास झाला. त्यामुळे चक्कर आली आणि तो रस्त्यावर कोसळला.

सुमारे २५ मिनीट हा रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत राहिला. या दरम्यान ॲम्बुलन्सच्या चालकाने सोबत असणाऱ्या डॉक्टरांना मदत मागितली. मात्र संपुर्णपणे PPE किट घालून सुरक्षित असणारे डॉक्टर देखील पुढे आले नाहीत. त्यानंतर चालकांने तिथे असणाऱ्या नागरिकांना मदत मागितली त्यांनी देखील हात वर केले.

dfd597df 6dcc 4b19 819d f74996b9a1d8

सोबत असणारा मेडिकल स्टाफच नकार देत असल्याने ड्रायव्हरने स्वत: निर्णय घेतला व बेशुद्ध व्यक्तिला उचलून तो जिल्हा रुग्णालयात पोहचला.

त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले व त्यांचा जीव वाचला.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.