गांगुली द्रविड सोबतच आलेल्या पारस म्हाम्ब्रेचं करियर ३ मॅचमध्ये संपलं

भारताच्या संघात प्रवेश मिळवण्यासाठी अनेक खेळाडू प्रयत्न करत असतात. काहींना संधी मिळते ते तिचं सोनं करतात आणि काहीजण संधी मिळूनही अपयशी ठरतात. त्यापैकीच आजचा किस्सा अशाच एका खेळाडूचा. ज्याची क्रिकेट कारकीर्द त्या संजय दत्तच्या मुन्नाभाई चित्रपटातील डायलॉगसारखी झाली कि भाई ये तो सुरू होते हि खतम हो गया…

पारस म्हांब्रे. २० जून १९७२ मध्ये पारसचा जन्म झाला. पारसचा क्रिकेट हा आवडता खेळ होता मात्र त्याच्या शाळेत हा खेळ शिकवला जात नसे. गल्लीतल्या मुलांसोबत तो क्रिकेट खेळायचा तेही टेनिस बॉलवर. क्रिकेटकडे पारस म्हांब्रे उशिराने वळला. वडिलांना त्याने आपली आवड सांगितली आणि वडिलांनी त्याला क्रिकेट शिबिरात दाखल केलं. 

तिथे पारसची ओळख रमाकांत आचरेकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि प्रवीण आम्रे अशा लोकांशी झाली. सराव सामन्यांमध्ये पारस चांगला खेळायचा. तासन्तास तो क्रिकेटच्या मैदानावर असायचा. १९८८ मध्ये त्याने मुंबईच्या अंडर १७ संघात प्रवेश मिळवला. पारस म्हांब्रे इथेही चमकला. वेगवेगळ्या वयोगटातून तो खेळत राहिला आणि यशस्वीही होत राहिला.

पुढे मफतलाल स्कीमने त्याला वर आणलं. फ्रॅंट टायसनच्या मदतीने बीसीए [ बॉंबे क्रिकेट असोसिएशन ] मधेही पारस म्हांब्रेने उत्तम कामगिरी केली. बॉलींग हि त्याची स्ट्रेंथ होती. १९९२ मध्ये रणजी स्पर्धेत उत्तर प्रदेशाविरुद्ध त्याच पदार्पण झालं. पण पावसामुळे केवळ ३ ओव्हरच त्याला बॉलिंग करता आली.

पुढच्या सिझनला त्याने ८ सामन्यांमध्ये ३० विकेट घेऊन आपल्या आगमनाचा बिगुल वाजवला. तेव्हा सचिन तेंडुलकर, मांजरेकर आणि दिलीप वेंगसरकर यांच्यासोबत त्याला खेळायची संधी मिळाली. महाराष्ट्राविरुद्धच्या एका सामन्यात त्याने ३५ धावांमध्ये ५ विकेट घेतल्या आणि विरोधी संघाला ७५ धावांवर गुंडाळले. मुंबईने तेव्हा आणखी एक रणजी विजेतेपद पटकावलं.

१९९५ मध्ये इंडिया अ संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला निवडले. पण भारताकडून खेळण्याची संधी काय पारसला मिळत नव्हती. वानखेडे स्टेडियमवर त्याने रेस्ट ऑफ इंडिया संघाकडून खेळताना ५ बळी घेतले आणि निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. कारण वर्ल्डकप साठी निवड होणार होती.

त्यावेळी चार गोलंदाज संघात हवे होते. जवागल श्रीनाथ, मनोज प्रभाकर, सलील अंकोला, व्यंकटेश प्रसाद आणि पारस म्हांब्रे. पण निवड समितीने पारस म्हांब्रेकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि इतर चार गोलंदाजांची निवड केली.

पुढे इंग्लंड दौऱ्यासाठी पारस म्हांब्रे या नावावरून मोठा वाद झाला. कारण पारस हा स्विंग बॉलर तर होताच शिवाय तो १४०च्या स्पीडने बॉलिंग करायचा. पण अगोदरच संघात चार बॉलर असल्याने पारस म्हांब्रेने त्याकडे दुर्लक्ष केले आणि स्थानिक सामन्यांकडे कूच केले.

पण एके दिवशी अचानक इंग्लंड दौऱ्यासाठी पारस म्हांब्रेची निवड झाली. या सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात सौरव गांगुली, राहुल द्रविड, वेंकटेश प्रसाद,सुनील जोशी असे अनेक खेळाडू पदार्पण करत होते. या सगळ्यांच फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये मोठं नाव होतं. त्यांच्या सोबत आलेल्या पारस म्हांब्रे कडून देखील मोठ्या अपेक्षा होत्या.

ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी त्याची निवड झाली. त्याने पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवली खरी पण नंतर त्याला ६९ धावा पडल्या. त्याने त्या सामन्यात २ विकेट मिळवल्या होत्या.

संधी मिळूनही पारस म्हांब्रेला विशेष काही करताच आलं नाही. कसोटी सामन्यांमध्येही त्याचा खेळाशी संघर्ष सुरूच होता. दोन कसोटी सामन्यात त्याला २ विकेट आणि केवळ ८ धावा करता आल्या. त्यामुळे लवकरच तो संघाबाहेर फेकला गेला.

या सिरीजमध्ये पहिल्याच मॅचमध्ये गांगुलीने शतक मारलं, त्याच मॅचमध्ये द्रविडने देखील नव्वदच्या वर धावा केल्या होत्या, तर वेंकटेश प्रसादने सुद्धा आपल्या पहिल्याच मॅचमध्ये ६ बळी घेऊन झोकात सुरवात केली होती. म्हांब्रेला मात्र संधीचा फायदा उठवता आला नाही.

१९९८ मध्ये तिरंगी मालिकेसाठी त्याला निवडण्यात आलं मात्र तिथेही तो अपयशी ठरला.

पण यानंतर पारस म्हांब्रेचा विचार करण्यात आला नाही. पारसनेही पुढे केवळ रणजी सामन्यांवर फोकस पक्क केलं. भारताकडून केवळ २ टेस्ट आणि ३ वनडे सामने इतकंच त्याला खेळता आलं. पुढे तो मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक बनला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने २८४ विकेट मिळवल्या होत्या. फक्त रणजीमधेच तो उत्तम खेळू शकला आणि भारतीय संघाकडून खेळताना तो विशेष चमक दाखवू शकला नाही. 

त्या फेमस सिरीजमध्ये आलेले गांगुली, द्रविड, प्रसाद यांच्यासारखे बरोबर सुरवात करणाऱ्या

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.